• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. gca board member to icc chairman jay shahs cricket administrator journey spl

Jay shah New ICC Chairman: गुजरात क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय ते आयसीसी अध्यक्षपदापर्यंत, जय शाह यांचा प्रवास कसा होता?

Jay shah New ICC Chairman: ३५ वर्षीय जय शाह यांची नुकतीच आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. जय शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. जय शाहांचा क्रिकेट व्यवस्थापनातील प्रवास कसा राहिला आहे? जाणून घेऊया.

August 29, 2024 12:28 IST
Follow Us
  • Jay Shah ICC New Chairman Journey in Marathi
    1/22

     जय शाह भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा युवा लीडर म्हणून उदयास आले आहेत. (फोटो-पीटीआय)

  • 2/22

    आपल्या बुद्धिमत्तेने आणि नेतृत्व क्षमतेच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो-एपी)

  • 3/22

    ३५ वर्षीय जय शाह यांची नुकतीच आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. जय शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. जय शाहांचा क्रिकेट व्यवस्थापनातील प्रवास कसा राहिला आहे? जाणून घेऊया. (फोटो-आयसीसी)

  • 4/22

    जय शाहांचा क्रिकेट व्यवस्थापनातील प्रवास २००९ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांनी जिल्हा स्तरावर सेंट्रल क्रिकेट बोर्ड अहमदाबाद (सीबीसीए) मध्ये काम करण्यास सुरुवात केली. (Photo: Indian Express)

  • 5/22

    त्यानंतर ते गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) मध्ये सामील झाले आणि २०१३ मध्ये संयुक्त सचिव झाले.

  • 6/22

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव म्हणून काम करताना जय शाह यांनी आपल्या कार्यक्षमतेने आणि कठोर परिश्रमाने सर्वांना प्रभावित केले. (Photo: PTI)

  • 7/22

    त्यांचे खेळाडूंशी असलेले चांगले संबंध आणि व्यवस्थापन कौशल्य यामुळे त्यांना या पदापर्यंत पोहोचवले आहे. (फोटो-बीसीसीआय)

  • 8/22

    जय शाहांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. (Photo: Indian Express)

  • 9/22

    त्यांनी महिला क्रिकेटच्या विकासासाठी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) सुरू केली, जी खूप यशस्वी झाली.

  • 10/22

    या लीगमध्ये महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक करार दिले जातात, ज्यामुळे महिला क्रिकेटला मोठी चालना मिळाली आहे. (Photo: Indian Express)

  • 11/22

    याव्यतिरिक्त, शाह यांनी भारतीय महिला क्रिकेट संघासाठी एकसमान सामना शुल्क लागू करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. (फोटो-पीटीआय)

  • 12/22

    कोविड-१९ महामारीच्या काळातही, जेव्हा जगभरात क्रीडा उपक्रम ठप्प झाले होते, तेव्हा शाहांनी आपल्या अचूक नियोजनाने आयपीएल आणि इतर स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.

  • 13/22

    त्यांनी बायो-बबलची निर्मिती आणि त्यामधील वैद्यकीय सुविधा व्यवस्थापित केल्या, ज्यामुळे स्पर्धा सुरक्षितपणे पार पडली. (Photo: Jay Shah/X)

  • 14/22

    जय शाहांनी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. (Photo: Indian Express)

  • 15/22

    त्यांच्या कार्यकाळात, भारताने १० कसोटी हंगाम खेळले, ज्यामध्ये खेळाडूंना अधिक प्रोत्साहन दिले गेले. (Photo: Jay Shah/X)

  • 16/22

     जय शाहांची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) ची नवीन निर्मिती. आता हे देशांतर्गत हंगामात एकाच ठिकाणी अनेक प्रथम श्रेणी सामने आयोजित करून अकादमी उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून काम करेल. (Photo: Jay Shah/X)

  • 17/22

    भारतीय क्रिकेटमध्ये जय शाहांचे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या नेतृत्व क्षमता, खेळाडूंशी चांगले संबंध आणि अचूकपणे घेतलेले निर्णय याने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे. (Photo: Jay Shah/X)

  • 18/22

    त्यांच्या या यशांनी त्यांना एक प्रभावी आणि यशस्वी प्रशासक म्हणून स्थापित केले. (Photo: Jay Shah/X)

  • 19/22

    रोहित शर्माने या वर्षी टीम इंडियाला टी-२० विश्वचषक जिंकून दिल्यानंतर जय शाह यांचे कौतुक केले होते. रोहित शर्मा म्हणाला होता, या जेतेपदाचे श्रेय जय शाह यांना ही जाते. (Photo: Jay Shah/X)

  • 20/22

    खरे तर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना भारतीय टी-२० संघातून वगळावे आणि बीसीसीआयने नवीन लोकांना संधी द्यावी, या बाजूने सारे जग होते. (Photo: Jay Shah/X)

  • 21/22

    त्यादरम्यान, जय शाह या गोष्टीच्या बाजूने होते की रोहित शर्मा टी-२० संघाचा कर्णधार असेल आणि भारत त्याच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक २०२४ खेळेल. रोहित शर्मानेही त्यांच्या शब्दांवर खरे उतरत आणि १७ वर्षांनंतर भारतासाठी टी-२० विश्वचषक जिंकला. (Photo: Jay Shah/X)

  • 22/22

    हेही वाचा : President Droupadi Murmu: “पुरे झाले, आता महिला अत्याचारांविरोधात जागृत व्हा!”, कोलका… 

TOPICS
आयसीसीICCक्रिकेटCricketक्रीडाSportsजय शाहJay ShahबीसीसीआयBCCIमराठी बातम्याMarathi News

Web Title: Gca board member to icc chairman jay shahs cricket administrator journey spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.