• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 vaibhav suryavanshi century sachin tendulkar yusuf pathan vicky kaushal priety zinta reactions spl

IPL 2025: वैभव सूर्यवंशीवर दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव; वादळी शतकी खेळीवर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा काय म्हणाले?

Vaibhav Suryavanshi IPL: वैभव सूर्यवंशीचे चाहते त्याच्या शतकाबद्दल सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर चित्रपट विश्वातूनही प्रतिक्रिया येत आहेत.

April 29, 2025 12:15 IST
Follow Us
  • ipl 2025 Vaibhav suryavanshi century Sachin Tendulkar Yusuf pathan Vicky Kaushal priety Zinta
    1/9

    आयपीएल २०२५ च्या ४७ व्या सामन्यात, असा चमत्कार घडला ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. (Photo: IPL/Social Media)

  • 2/9

    या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३५ चेंडूत तुफानी शतक झळकावले. (Photo: IPL/Social Media)

  • 3/9

    वैभवचे वय केवळ १४ वर्षे आहे. वैभवच्या या वादळी खेळीने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. (Photo: IPL/Social Media)

  • 4/9

    वैभव सूर्यवंशीचे चाहते त्याच्या शतकाबद्दल सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर चित्रपट विश्वातूनही प्रतिक्रिया येत आहेत. (Photo: IPL/Social Media)

  • 5/9

    जाणून घेऊयात कोण काय म्हणाले आहे? (Photo: IPL/Social Media)

  • 6/9


    सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया
    वैभव सूर्यवंशीच्या या शानदार शतकाने महान भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरलाही प्रभावित केले आहे. वैभवचे कौतुक करताना सचिन म्हणाला, ““वैभवची खेळण्याची निडर पद्धत, फटका मारतानाचा बॅटचा वेग, चेंडूचा टप्पा लवकर ओळखणं आणि चेंडूच्या मागे आपली संपूर्ण ताकद एकवटणं ही वैभवच्या या भन्नाट खेळीची रेसिपी होती. परिणाम… ३८ चेंडूंमध्ये १०१ धावा! मस्त खेळलास” (Photo: Sachin Tendulkar/Instagra)

  • 7/9

    प्रीती झिंटाने केले अभिनंदन
    आयपीएल संघ पंजाब किंग्जची सह-मालक प्रीती झिंटाने वैभवचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की, “वाह!!! वैभव सूर्यवंशी. किती अविश्वसनीय प्रतिभावान खेळ खेळला आहे. या १४ वर्षांच्या मुलाला ३५ चेंडूत शानदार शतक झळकावताना पाहणे खूप रोमांचक होते. यावर्षीचे आयपीएल शानदार आहे! भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे.” (Photo: Priety zinta/Instagra)

  • 8/9

    विकी कौशलने स्टोरी पोस्ट केली
    विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वैभव सूर्यवंशीसाठी एक स्टोरी लिहिली आहे. त्याने लिहिले, “युगांसाठी एक खेळी! खूप आदर, वैभव सूर्यवंशी.” अर्जुन कपूरनेही इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि लिहिले, “धन्यवाद तरुणा!!! अवास्तव!!! स्वप्न जगणारा १४ वर्षांचा मुलगा… वैभव सूर्यवंशी.” (Photo: Vicky Kaushal/Instagra)

  • 9/9


    रोहित शर्माकडून कौतुक
    रोहित शर्माने त्याच्या सोशल मीडियावर वैभवसाठी एक स्टोरी शेअर केली. त्याने “ क्लास..” असं लिहिलं आहे. भारतीय संघाच्या कर्णधाराने वैभवचे कौतुक करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. (Photo: Rohit shahrma/Instagram) हेही पाहा- Photos: RCB चा स्टार खेळाडू कृणाल पांड्याची पत्नी आहे खूपच ग्लॅमरस; लग्नाआधी काय करायची, नाव काय?

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsप्रीती झिंटाPreity Zintaरोहित शर्माRohit Sharmaविकी कौशलVicky Kaushalसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Ipl 2025 vaibhav suryavanshi century sachin tendulkar yusuf pathan vicky kaushal priety zinta reactions spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.