-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ‘कॅप्टन कूल’ या शब्दासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे.
-
खेळादरम्यान मैदानावर धोनीच्या शांत वर्तनामुळे त्याला ‘कॅप्टन कूल’ हे नाव मिळाले होते. ट्रेडमार्क रजिस्ट्री पोर्टलनुसार, धोनीच्या अर्जाची स्थिती वर्ग ४१ अंतर्गत ‘स्वीकारली आणि जाहीर केली’ अशी आहे.
-
एका अहवालात असे म्हटले आहे की, कॅप्टन कूलसाठी धोनीकडून ५ जून २०२३ रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु तो या वर्षी १६ जून रोजी अधिकृत ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित झाला.
-
नियमांनुसार, धोनीला आता १२० दिवस वाट पहावी लागेल. या चार महिन्यांच्या कालावधीत, जर कोणत्याही तृतीय पक्षाने ट्रेडमार्कवर कोणताही आक्षेप किंवा विरोध केला नाही, तर या कालावधीनंतर धोनीला तो मंजूर केला जाईल.
-
मनोरंजक गोष्ट म्हणजे, प्रभा स्किल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दुसऱ्या कंपनीने यापूर्वी याच शब्द/वाक्यांशासाठी असाच अर्ज दाखल केला होता. पण, प्रभा स्किल स्पोर्ट्सच्या अर्जाच्या स्थितीत आता ‘दुरुस्ती दाखल’ असे म्हटले आहे.
-
प्रत्येक ट्रेडमार्कसाठी अर्ज करणे किंवा एका विशिष्ट वर्गाअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक असते, ज्यामध्ये प्रत्येक वर्ग वस्तू किंवा सेवांच्या वेगळ्या श्रेणीचे प्रतिनिधित्व करतो.
-
धोनीने ज्या ट्रेडमार्क फाइलिंग वर्गीकरणात अर्ज केला आहे त्याचा वर्ग ४१ म्हणजे, शिक्षण; प्रशिक्षण, मनोरंजन, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम हा आहे.
-
७ जुलै २०२५ रोजी एमएस धोनी ४४ वर्षांचा होईल. त्याने अलिकडेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले. यामध्ये त्यांची कामगिरी खूपच खराब होती आणि ते १० संघांच्या यादीत तळाशी होते.
-
या महिन्याच्या सुरुवातीला धोनीचा २०२५ च्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला यांच्यासह सात क्रिकेटपटूंचा समावेश होता. (सर्व फोट सौजन्य: आयसीसी/एक्स)
MS Dhoni Captain Cool: ‘कॅप्टन कूल’ ट्रेडमार्क धोनीलाच मिळणार का? १२० दिवसांची वाट का पाहावी लागणार?
MS Dhoni Captain Cool: एका अहवालात म्हटले आहे की, कॅप्टन कूल ट्रेडमार्कसाठी ५ जून २०२३ रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु तो या वर्षी १६ जून रोजी अधिकृत ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
Web Title: Ms dhoni captain cool trademark approved aam