Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. flood situation in nanded due to heavy rain 293 people stuck in various villages spl

Photos : नांदेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत; लष्कराच्या चमुला केलं पाचारण

Nanded Flood Photos : नांदेडमध्ये पूरसदृष्य परिस्थिती; गावांमध्ये पाणी शिरल्याने २९३ नागरिक अडकले…

Updated: August 18, 2025 13:25 IST
Follow Us
  • marathwada life disrupted due to heavy rain 293 persons stuck in river
    1/10

    नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसामुळे चार ते पाच गावात पाणी शिरल्याने नागरिक अडकले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

  • 2/10

    रावणगाव २२५ , हसनाळ ७ ते ८ भासवाडी येथे २० भिंगेली ४० एवढे नागरिक अडकले असून छत्रपती संभाजीनगरहून लष्काराच्या एका चमूलाही बोलावण्यात आले आहे. 

  • 3/10

    आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल पथक पाठविण्यात आले आहे. दरम्यान इसापूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळेही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न सुरू झाले आहेत.

  • 4/10

    या तालुक्यातील भेडेगावला पाण्याने पूर्णत: वेढले आहे. अनेक घरांवरील पत्रे कोसळले आहेत. घरांमध्ये पाणी शिरले आहे.

  • 5/10

     नांदेड येथील आपत्ती निवारण चमू मुखेड येथे पोहचला उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

  • 6/10

    मुखेड तालुक्यातील बेरळी येथे जुन्या गावाला जोडणारा पुल वाहून गेला असल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. दरम्यान उदगीर तालुक्यातील पावसाचा कहर अधिक असून उदगीर -मुक्रमाबाद- देगलुर रोडवर धडकनाळ- रावी या रस्त्यावरील पुलावरुन एक कार वाहुन गेली आसल्याचे सांगण्यात आले.

  • 7/10

    रावणगाव २२५ , हसनाळ ७ ते ८ भासवाडी येथे २० भिंगेली ४० जण सुरक्षित स्थळी हलवली. एसडीआरफ प्रतिसाद, शिघ्र प्रतिसाद, शोध व बचाव, आर्मीची टीम मागवली. इसापूरचे दरवाजे उघडले.

  • 8/10

    रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
    रेणा नदीवरील रेणापूर, जवळगा, बंधारा येथील पाणी पातळी पूर्ण संचय पातळीला आला असून बांधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रेणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

  • 9/10

    नागरिकांनी दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये, असे अवाहन लातूर प्रशासनाने केले आहे.

  • 10/10

    यावेळी, मुकी जनावरे भीषण पूराच्या पाण्यात अडकली, त्यातील अनेकांचा मृत्यू झाला. (सर्व फोटो- लोकसत्ता टीम) हेही पाहा- Photos: मुंबईमध्ये सोमवारीही पावसाचा जोर कायम; उपनगरांत पहाटेपासून हजेरी…

TOPICS
छत्रपती संभाजीनगरChhatrapati Sambhaji NagarनांदेडNandedपाऊसRainपूरFloodफोटोPhotoमराठवाडाMarathwadaमराठी बातम्याMarathi NewsलातूरLatur

Web Title: Flood situation in nanded due to heavy rain 2 people stuck in various villages spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.