राज्यात ओमायक्रॉनच्या नव्ये व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाचे हे नवे रुप किती घातक आहे? तसेच रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा निर्बंध लागू होणार का? असे विचारले जात आहे. असे असतानाच करोनाचा नवा विषाणू राज्याची काळजी वाढविणारा आहे का? याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेऊनच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘हा धंदा खूप बेकार आहे पण…’, साखर कारखानदारीवरून नितीन गडकरींचं मोठं विधान

राज्यातील करोना रुग्णसंख्या या आठवड्यात अचानक वाढली असून करोना ओमायक्रॅान विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेले बीए ४ आणि बीए ५ चे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. या प्रकारचे सात रुग्ण पुणे शहरात सापडल्याने दक्षता घेण्यात येत आहे. यासंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, “नवा विषाणू राज्याची काळजी वाढविणारा आहे का याबाबत आरोग्य विभागाकडून सखोल चौकशी केली जात असून आरोग्यमंत्री राजेश टोपे आवश्यक माहिती घेत आहेत. नव्या विषाणूचे रुग्ण पुण्यात आढळून आल्यामुळे याबाबत काय उपाययोजना करणे आवश्यक आहे याविषयीचा निर्णय मंत्रिमंङळाच्या बैठकीत घेतला जाईल.”

हेही वाचा >>> …म्हणून डॉ. अनिल बोंडेंना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

तसेच, मुंबई महानगरपालिकेत करोना संसर्ग हाताळताना घोटाळा झाला आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याकडे लक्ष वेधले असता या आरोप करण्याला पुरावा काय आहे? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला. “एखाद्या संस्थेत घोटाळा झाला असेल तर त्या संस्थेची शहानिशा होणे गरजेचे आहे. त्यामध्ये काही तथ्य आढळले तर पाहणी करुन कारवाई करता येऊ शकते. मात्र, आरोपामध्ये तथ्य आढळून आलेच नाही आणि काही पुरावे सादर केले नाहीत तर कारवाई कोणावर करणार?” असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा >>> मोबाईल अॅपच्या माध्यमातून झाली होती मैत्री, दोघांनी मिळून युवकावर केला सामूहिक लैंगिक अत्याचार

मुस्लिम नेते नवाब मलिक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला विसर पङला आहे, असा आरोप एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केला. त्यासंदर्भात बोलताना आमच्या नेत्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवाब मलिक याचा विसर पङलेला नाही असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >>> फडणवीसांना काय सल्ला देणार विचारलं असता पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या “काही वाटत असेल तर…”

पावसाळा तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू देणार नाही, असे सांगताना अजित पवार यांनी राज्यामध्ये सध्या खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असेदेखील स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After getting information from experts about new corona virus will appropriate decision said ajit pawar prd