पिंपरी- चिंचवड शहरातील अवैध वृक्षतोडीच्या संदर्भात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊळ यांनी मंत्रालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून सायकलने ते मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत. उद्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्ताने ते शहरातील या अवैध वृक्षतोडीचा मुद्दा उपोषनाद्वारे मांडणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरण प्रेमी राऊळ म्हणाले, “मी आज पिंपरी- चिंचवड ते मंत्रालय सायकलने प्रवास करतो आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील अवैध वृक्षतोडीचे सत्र थांबायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची शक्ती आणि तुकाराम महाराजांची भक्तीची प्रेरणा घेऊन हे पाऊल उचलत आहे. वृक्ष आम्हा सोयरे वनचरी ही शिकवण संतांनी दिली.”

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमधील नाट्यगृहांची भाडेवाढ! १ जुलैपासून अंमलबजावणी

पुढे ते म्हणाले, “पिंपरी- चिंचवड शहरात संघटित वृक्ष तोडीची गुन्हेगारी सुरू आहे. याकडे महानगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या ५ जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मंत्रालयासमोर उपोषण करणार आहे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environment lovers will go on hunger strike in front of the ministry tomorrow against illegal tree cutting kjp 91 mrj
First published on: 04-06-2023 at 10:39 IST