पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात दरवाढ केली आहे. नवीन दरांची १ जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. कामगारनगरी, औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या शहरात सांस्कृतिक चळवळ रुजत असतानाच या केलेल्या भरमसाठ दरवाढीमुळे चळवळीला ‘खो’ बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि निगडी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर अशी पाच नाट्यगृहे महापालिकेने उभारली आहेत. या नाट्यगृहांत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. खासगी सभागृहांपेक्षा वाजवी दर आहेत. त्यामुळे या नाट्यगृहात व्यावसायिक नाटक, राजकीय कार्यक्रम, शैक्षणिक संस्थेचे स्नेहमेळावा, इतर मेळावे, समारंभ, स्पर्धा, खासगी कार्यक्रम होत असतात. खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याचे कारण देत महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी वाढ केली.

Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
Pune, ring Road Project, farmers, financial complaint, Land Acquisition, Collector Issues Warning, government Officers,
पुणे : ‘रिंगरोडचे भूसंपादन करताना तक्रारी आल्यास…’ जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

हेही वाचा – ओडिशातील भीषण अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया, लालबहादूर शास्त्रींचा उल्लेख करत म्हणाले, “राजीनामा…”

लांडगे नाट्यगृहाचे दर २०१२, अत्रे रंगमंदिराचे २००२ तर निळू फुले रंगमंदिराचे दर २०१७ पासून सुधारित करण्यात आलेले नाहीत. नाट्यगृहाचे वर्षाकाठी ५० ते ६० लाख उत्पन्न आहे, तर एक कोटी खर्च होत आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाड्यात १७ वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून नाट्यगृहांचे भाडेदर सुधारित केले आहेत. सुधारित दराची अंमलबजावणी १ जुलै २०२३ पासून केली जाणार आहे.

नवीन दर

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील वातानुकुलीत यंत्रणेसह मुख्य सभागृहासाठी तिकीट दर नसलेली मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी आठ हजार रुपये, तिकीट असलेल्या कार्यक्रमांसाठी १२ हजार रुपये दर आहे. शाळांसाठी तीन तासांसाठी ३० हजार रुपये, महाविद्यालयांसाठी पाच तासांसाठी ४८ हजार आणि इतर संस्थांसाठी ६० हजार रुपये दर असणार आहेत.

अंकुशराव लांडगे नाट्यगृह, आचार्य अत्रे सभागृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणेसह मोफत मराठी नाटके, ऑर्केस्ट्रॉच्या तीन तासांसाठी सात हजार २०० रुपये, तिकीट असलेल्या कार्यक्रमांसाठी दहा हजार ८०० रुपये, शाळांना तीन तासासाठी २७ हजार रुपये, महाविद्यालयांना पाच तासासाठी ४३ हजार २०० रुपये, इतर संस्थांसाठी ५४ हजार रुपये भाडे असणार आहे. नाट्यगृहात रंगीत तालीम, सरावाठीचे दर कमी असणार आहेत.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त; गुंडाविरोधी पथकाची कारवाई

गदिमा नाट्यगृह भाडेतत्वावर

निगडी प्राधिकरणात ६६ कोटी रुपये खर्च करून उभारलेले निगडी, प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (गदिमा) नाट्यगृह भाडेतत्वावर दिले जाणार आहे. हे नाट्यगृह भाडेतत्वावर देण्याची मागणी नागरिकांकडून ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाकडे केल्याचा दावा पालिकेने केला आहे. हे नाट्यगृह भाडेतत्वावर चालविण्यास देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

नाट्यगृह उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाहीत. सांस्कृतिक भूक अतिशय महत्त्वाची आहे. नाट्यगृहाचे भाडे लोकांना परवडेल. तज्ज्ञ लोकांशी चर्चा करूनच दरवाढीबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. प्रशासकांनी तुघलकी निर्णय घेऊ नयेत. – भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा

हेही वाचा – संजय राऊत ‘त्या’ खासदाराचं नाव घेताच ‘ऑन कॅमेरा’ थुंकले, शरद पवार स्पष्टच म्हणाले, “मी…”

नाट्यगृहांचे भाडे खूप कमी होते. त्यामुळे लोकांना आवश्यक सोई-सुविधाही मिळत नव्हत्या. अनेक वर्षांनी भाड्यात वाढ केली आहे. मराठी नाटके, प्रयोग, शाळांच्या कार्यक्रमासाठी दर कमी ठेवले आहेत. इतर संस्थांची, उद्योजकांची भाडे भरण्याची क्षमता आहे. त्यांनी क्षमतेनुसार भाडे भरलेच पाहिजे. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका