चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून पिंपरी- चिंचवड शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे. चिंडवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक लागली आहे.भाजपाकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप किंवा जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. असं असतांना जगताप कुटूंबीयांना आव्हान देण्यासाठी जगताप यांचे चुलत बंधू, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जगताप हे पोटनिवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील आणला असून जगताप कुटूंबाला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९८६ पासून कार्यरत असलेले राजेंद्र जगताप हे लक्ष्मण जगतापांच्या तालमीत तयार झाले असून निवडणूक कशी लढवायची आणि कशी जिंकायची हे माहिती असल्याचे ते सांगतात. “जगताप यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले आहेत, उमेदवारी द्यायची की नाही हा पक्षाचा निर्णय असेल ” असं राजेंद्र जगताप यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा… जगताप कुटुंबीयांच्या उमेदवाराचा विजय हीच खरी दिवंगत लक्ष्मण जगतापांना श्रद्धांजली!

हेही वाचा… पुण्यात तरुणीला विवस्त्र करुन मारहाण; विवस्त्रावस्थेतील ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित

अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपाने देखील अजुनही उमेदवार निवडीबाबत निर्णय घेतलेला नाही. सर्व राजकीय गणिते पाहता चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chinchwad by poll along with late lakshman jagtap family members relative also come forward to contest election kjp 91 asj
First published on: 02-02-2023 at 11:23 IST