तरुणीच्या भावाने एका तरुणीला पळविल्याच्या संशयातून बदला घेण्यासाठी केलेला प्रकार

प्रेमप्रकरणातून तरुणीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. अपहरण केल्यानंतर २४ वर्षीय बहिणीला विवस्त्र करुन खोलीत डांबून ठे‌वून मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. आरोपींनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी (सर्व रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीच्या बहिणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>जगताप कुटुंबीयांच्या उमेदवाराचा विजय हीच खरी दिवंगत लक्ष्मण जगतापांना श्रद्धांजली!

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
Fraud, Fraud with youth,
प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणाची दीड लाखांची फसवणूक
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित

तक्रारदार महिला आणि आरोपी नातेवाईक आहेत. आरोपी नंदकुमार माटे यांच्या नात्यातील तरुणीस तक्रारदार महिलेच्या भावाने पळवून नेल्याचा संशय आरोपींना होता. आरोपींनी तक्रारदार महिला आणि तिच्या बहिणीचे अपहरण केले. माटे यांनी नात्यातील तरुणीचा ठावठिकाणा विचारला. दोघींनी ठावठिकाणा सांगितला नाही. त्यामुळे आरोपींनी दोघींना गजाने मारहाण केली. एका खोलीत त्यांना दोन दिवस डांबून ठेवले.

तक्रारदार महिलेच्या बहिणीस विवस्त्र करुन तिचे मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. चित्रीकरण त्यांनी समाजमाध्यमात प्रसारित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळे तपास करत आहेत.