पुणे : निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगात शिवसेनेच्या दोन गटातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत दिली. जो पर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत जर-तर या प्रकाराला काही अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी सोमवारी पुण्यातील काही गणेश मंडळांना भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावेळी बारामती येथे होतो. तशी माहिती अमित शहा यांच्या कार्यालयाला दिली होती, असे सांगत त्यांच्या अनुपस्थितीचे पुन्हा स्पष्टीकरण त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाकडे शिवसेनेचे दोन्ही गट बाजू मांडतील. त्यानंतर अंतिम निर्णय होईल. जो निर्णय होईल तो मान्य असेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन १४ महिने होत आले आहेत. ज्या बातम्या येत आहेत. त्यामध्ये काही तथ्य नाही. अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत जर-तर या प्रकाराला काही अर्थ नाही, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहू दे, ही गणरायापुढे केली प्रार्थना – अजित पवार

राज्यातील सत्तासंघर्षानंतर येत्या मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, लोकसभेचा विचार केला नाही. एवढ्या लवकर त्याबाबत चर्चा करणे फायदेशीर नाही.

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय अस्थिरता…’

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. त्यासंदर्भात विनाशकाले विपरीत बुद्धी, वाचाळवीर अशा शब्दांत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मलाही बोलता येते. मात्र मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune deputy cm ajit pawar says will accept decision of election commission regarding the disqualification of shivsena mlas pune print news apk 13 css
Show comments