scorecardresearch

Premium

राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहू दे, ही गणरायापुढे केली प्रार्थना – अजित पवार

गणरायाचे आगमन होऊन सात दिवस झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले.

Ajit Pawar Kasba Ganpati
राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहू दे, ही गणरायापुढे केली प्रार्थना – अजित पवार (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

पुणे : गणरायाचे आगमन होऊन सात दिवस झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शहरातील अन्य प्रमुख मंडळाना भेट दिली.

हेही वाचा – पुणे: आळे फाटा परिसरात मोटारीच्या धडकेने तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

eknath shinde
“नांदेड अन् घाटी रूग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती, दोषींवर…”, मुख्यमंत्र्यांचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना ‘हे’ निर्देश
davos visit cost 32 crore says industry minister uday samant
पुणे: दावोस दौऱ्यात ३२ कोटींचा खर्च; उद्योगमंत्री सामंत यांची स्पष्टोक्ती
decoration Ganpati OBC Gondia
“हे गणराया! ओबीसींच्या मागण्या पूर्ण कर…”, गोंदियात देखाव्याच्या माध्यमातून साकडे
himanta biswa sarma
‘भाजपा, संघाचा बजरंग दलाशी दुरान्वये संबंध नाही’ आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचे विधान!

हेही वाचा – गुप्तधनाचा मोह अंगलट; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक

तुम्ही गणरायाकडे काय मागितले? यावर अजित पवार म्हणाले की, तुला संपादक कर म्हणून गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली. असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक भागांत अद्यापही पाऊस झाला नाही, त्यामुळे राज्यात जोरदार पाऊस पडू दे. पाऊस झाल्यावर बळीराजा सुखी झाला की वातावरण बदलून जाते. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहू दे हीच प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar visited kasba ganpati in pune svk 88 ssb

First published on: 25-09-2023 at 12:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×