पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता आज होणार आहे. विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीची सांगता २८ तास २९ मिनिटांनी झाली. यंदा विसर्जन मिरवणूक किती तास सुरू राहणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत प्रथमच दुपारी चार वाजता सहभागी होणार आहे. त्यामुळे यंदा मिरवणूक लवकर संपेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहा दिवस संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरणासह चैतन्य निर्माण करणाऱ्या गणरायाला विसर्जन मिरवणुकीने निरोप देण्यात येणार आहे. राज्यभरातील भाविक दाखल होतात. या सोहळ्यातील भव्य देखावे, आकर्षक रोषणाई, ढोल-ताशा पथकाच्या तालावर नाचणारी तरुणाई मिरवणुकीचे आकर्षण असते. मिरवणुकीत भव्य देखावे अनेक मंडळांकडून साकारण्यात येतात. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या मार्गांवरून मंडळे विसर्जन मिरवणूक सोहळ्यात दाखल होतात.

हेही वाचा : इटलीच्या अ‍ॅना मारा या तरुणीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर करत जिंकली पुणेकरांची मने

विसर्जन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंडळांचे रथ गुरुवारी रात्री नऊनंतर विसर्जन मार्गावर दाखल झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा विसर्जन मिरवणुकीत दुपारी चारला सहभागी होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाची रोषणाई प्रमुख आकर्षण असते. हे मंडळ दर वर्षी मध्यरात्री बेलबाग चौकात दाखल होते. यंदा मंडळाने विसर्जन सोहळ्यात लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने विसर्जन मिरवणूक किती तास चालणार, याची उत्सुकता आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, जिलब्या मारुती मंडळ विसर्जन मार्गावर रात्री दाखल होणार आहेत.

हेही वाचा : रोहित पवार आणि अजित पवार पाठोपाठ आता जयंत पाटील पिंपरी- चिंचवडमध्ये सक्रिय

पोलिसांकडून नियोजन

यंदा विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याने हे मंडळ बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या अन्य प्रमुख मंडळांना त्वरित मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले. विसर्जन सोहळा लवकर आटोपण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

हेही वाचा : विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ते बंद; पालकमंत्र्यांनी केला मेट्रोने प्रवास

विसर्जन मिरवणूक वेळ

वर्ष वेळ

२०१२ – २८ तास ५० मिनिटे
२०१३ – २७ तास २५ मिनिटे
२०१४ – २९ तास १२ मिनिटे
२०१५ – २८ तास २५ मिनिटे
२०१६ – २८ तास ३० मिनिटे
२०१७ -२८ तास ५ मिनिटे
२०१८ – २६ तास ३६ मिनिटे
२०१९ – २५ तास ३९ मिनिटे
२०२० – करोनामुळे मिरवणूक खंडित
२०२१ – करोनामुळे मिरवणूक खंडित
२०२२ – २८ तास २९ मिनिटे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune visarjan of srimant dagdusheth halwai ganpati starts from 4 pm onwards pune print news rbk 25 css