scorecardresearch

Premium

रोहित पवार आणि अजित पवार पाठोपाठ आता जयंत पाटील पिंपरी- चिंचवडमध्ये सक्रिय

पहाटे दोन पर्यंत जयंत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील गणपती मंडळाच्या भेटी घेतल्या

ajit pawar, rohit pwar, jayant patil, ncp, pimpari chinchwad
रोहित पवार आणि अजित पवार पाठोपाठ आता जयंत पाटील पिंपरी- चिंचवडमध्ये सक्रिय

रोहित पवार यांच्या पाठोपाठ आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील पिंपरी- चिंचवडमधील गणेश मंडळाच्या भेटी घेऊन आरती केली. पिंपरी- चिंचवड शहर हे अजित पवार यांचा गड मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यात शरद पवार गटाने ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचं चित्र बघायला मिळत आहे.

हेही वाचा… वाद टाळण्यासाठी अजित पवारांची विसर्जन मिरवणुकीला अनुपस्थिती ?

Cycle tour of Sharad Pawar group
पिंपरी- चिंचवड: अजित पवार गटाला शह देण्यासाठी शरद पवार गटाचा सायकल दौरा!
dr vijaykumar gavit surrounded by tribal activist
नाशिकमध्ये आदिवासी विकासमंत्र्यांना घेराव; महामंडळाच्या सभेत गोंधळ
Activists of Shri Hanuman Talewale Mandal
आई भवानी शक्ती दे, पुण्येश्वरला मुक्ती दे! श्री हनुमान तळेवाले मंडळ ट्रस्टचे कार्यकर्ते फलक घेऊन मिरवणुकीत सहभागी
nashik ganesh visarjan, nashik guardian minister dada bhuse, dada bhuse participated in ganesh visarjan
Nashik Ganpati Visarjan 2023 Live : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, पालकमंत्री दादा भुसेही ढोल वादनात मग्न

काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाला शहराध्यक्ष म्हणून तुषार कामठे हे युवा नेतृत्व मिळालं. तुषार कामठे यांनी पद मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहित पवार यांना पिंपरी- चिंचवड शहरात आणून शहरातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. रोहित पवार यांनी बाईक रॅली घेऊन शहरातील राजकीय व्यक्तींना सूचक इशारा दिला. आता शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देखील पिंपरी- चिंचवड शहराचा दौरा केला असून पहाटे दोन पर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळाला त्यांनी भेटी दिली आहेत. त्यामुळे एकीकडे अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड वर शरद पवार गटाने ताकद वाढवण्यास सुरुवात केली असून शरद पवार गटाचे नेते देखील पिंपरी-चिंचवडकडे लक्ष ठेवून असल्याचं बघायला मिळत आहे.

हेही वाचा… इटलीच्या अ‍ॅना मारा या तरुणीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर करत जिंकली पुणेकरांची मने

हेही वाचा… विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ते बंद; पालकमंत्र्यांनी केला मेट्रोने प्रवास

ऑक्टोबर महिन्यात शरद पवार यांचा मोठा मेळावा होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे. जयंत पाटील यांनी शहरातील समर्थ कॉलनी मित्र मंडळ दळवीनगर, नव तरुण मित्र मंडळ चिंचवडगाव, भाट समाज मित्र मंडळ पिंपरी, सिद्धी आनंद पार्क चिखली, कृष्णा नगर लाईन बॉयज,राजे प्रतिष्ठान, मोरया मित्र मंडळ भोसरी, शिवतेज मित्र मंडळ दिघी, मित्र सहकार्य तरुण मंडळ, साधू वासवाणी मंडळ, नानापेठ तरुण मंडळ पिंपरी आदी गणेश मंडळांना भेटी दिल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pimpri chinchwad politics after rohit pawar and ajit pawar now jayant patil is active kjp 91 asj

First published on: 28-09-2023 at 13:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×