मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागल्यानंतर आता त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रया देण्यात आल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आमचं दडपशाहीचं सरकार नाही. त्यामुळे कोणीही काही बोलावं त्याबद्दल काही हरकत नाही. ते बोलले म्हणजे काही सत्य होत नाही.” अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या विधानावर पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्रात जातीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जन्मानंतर मोठा झाला”, राज ठाकरेंचा थेट आरोप!

तसेच, मागील काही दिवसांमध्ये भाजपा व मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता असल्याच्या, चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणी युती करावी किंवा आघाडी करावी, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर त्यांनी केलीच तर माझ्या त्यांना शुभेच्छा असतील.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद वाढल्याच्या राज ठाकरेंच्या आरोपावर पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तर,राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याच्या आरोपावर उत्तर देताना शरद पवारांनी जोरदार टोला लगावला होता. राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असं खरमरीत उत्तर पवारांनी दिलं होतं. त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं.

राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या ‘त्या’ आरोपावर अजित पवारांचं उत्तर, म्हणाले…

”शरद पवारांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोक असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं करण नाही.” असं ते म्हणाले होते.

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीचं उत्तर, म्हणाले…

तर, “राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. “या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे”, असेही नवाब मलिक म्हणाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sules first reaction to raj thackerays statement about ncp said msr