पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांची उद्या बुधवारी (१३ नोव्हेंबर) भोसरीतील गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. तर, गुरुवारी (१४ नोव्हेंबर) पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात रोड-शो होणार आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भोसरीतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्राचारार्थ पवार यांची सभा होणार आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार असून पक्षाच्या पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत आणि चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. भोसरीत गव्हाणे आणि भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या सभेत शरद पवार काय बोलणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

पिंपरी-चिंचवड शहराला दूरदृष्टीने विकासाच्या उंचीवर नेण्याचे काम अण्णासाहेब मगर, प्रा.रामकृष्ण मोरे व त्यानंतर शरद पवार यांनी केले. शरद पवार यांनी या शहराला उद्योगनगरी म्हणून या नावारूपाला आणले. पवार यांच्या सभेमुळे भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या संघर्षाला आणखी बळ मिळेल असा विश्वास अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा…पीएमआरडीएच्या सदनिका लाॅटरी योजनेला मुदतवाढ

पिंपरी आणि चिंचवडमध्ये शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो

पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही सातत्याने शहरात येत आहेत. शरद पवार यांनी महाविकास आघाडीत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील जागा पक्षाला घेतल्या आहेत. आता तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. बुधवारी भोसरीत सभा घेणार आहेत. तर, गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचा रोड-शो होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पवार यांचा रोड-शो होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tomorrow sharad pawars meeting in bhosari first road show in pimpri chinchwad on thursday pune print news ggy 03 sud 02