पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील काळभोर नगर येथे पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले. या बसमध्ये 70 प्रवाशी होते, सुदैवाने या घटनेमध्ये कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास पुणे- मुंबई जुन्या महामार्गावर काळभोर नगर येथे फुटपाथवरील भलं मोठं झाड भरधाव पीएमपीएल बसवर कोसळलं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी नाही. या घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.
बस मधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, झाड बाजूला काढण्यात आला असून वाहतूक देखील सुरळीत झाली आहे. फुटपाच्या शेजारी केबल टाकण्याचे काम सुरू आहे. झाडाच्या बाजूला खोदण्यात आलं होतं. यामुळे झाडांची मूळ असैल झाली होती. याच दरम्यान भरधाव पीएमपीएल बस वर हे झाड कोसळलं. सुदैवाने प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने यात कुणीही जखमी झालं नाही किंवा जीवितहानी झालेली नाही.