ठाणे : ‌‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ असे शिवसैनिकांकडून म्हटले जाते. शिवसेना फुटी नंतर येथील शिवसैनिक नेमका कोणाच्या बाजूने कल देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शनिवारी प्रचाराचा शेवटचे काही तास शिल्लक असताना ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे ठाण्यात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. तसेच कळवा भागात वैशाली दरेकर यांच्यासाठी काढण्यात आलेल्या रोड शो मध्ये सहभाग घेतला होता. काही वेळात ठाणे लोकसभेसाठी युवा सेनेकडून काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीमध्येही ते सहभागी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : वळीवामुळे भाज्या कडाडल्या, दरात २० रुपयांनी वाढ; नाशिक, पुणे जिल्ह्यांत उत्पादनात घट

ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या जागेसाठी इंडिया आघाडीकडून खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर महायुतीकडून माजी महापौर नरेश म्हस्के रिंगणात उतरले आहेत. तसेच कल्याण लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीच्या वैशाली दरेकर आणि महायुतीचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये लढत आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. परंतु शिवसेनेत फुट पडल्यामुळे येथील राजकीय गणिते बदलली आहेत. महायुती आणि इंडिया आघाडीकडून जिल्ह्यात जोरदार प्रचार झाला आहे. या दोन्ही जागा कोणत्या शिवसेनेकडे राहणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

हेही वाचा : भाजप सत्तेत आल्यास मतदानाचा अधिकार संकटात – शरद पवार

प्रचार संपूष्टात येण्यास अवघे काही तास शिल्लक असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या सोबत बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. तर इंडिया आघाडीने देखील ठाण्यात बाईक रॅली आयोजित केली असून आदित्य ठाकरे या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरे हे शनिवारी सकाळी कळवा येथे वैशाली दरेकर यांच्या रोड शो मध्ये सहभागी झाले होते. ठाण्यात आल्यानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधी स्थळी गेले. तेथे त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray eknath shinde both shivsena factions road show and bike rally for thane lok sabha css
Show comments