Maharashtra Politics Updates महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिल्लीत अमित शाह यांच्यासह महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतं आहे. मात्र अद्याप याबाबत कुणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं. मुंबईत भाजपाची बैठक होईल या बैठकीनंतर इतर चर्चा होऊन निर्णय होईल असं सांगितलं. दुसरीकडे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. जे मिळेल ते त्यांना पदरात पाडून घ्यावं लागणार आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला. यासह सगळ्या राजकीय घडामोडींवर आपली नजर आजच्या ब्लॉगमधून असणार आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित? आज मुंबईत बैठका, राजकीय घडामोडींना वेग

10:44 (IST) 29 Nov 2024

सांगली जिल्हा बँकेच्या संचालकांपैकी केवळ एकांना विधानसभेत विजय अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य चार संचालक पराभूत

सांगली : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच संचालकांपैकी एक संचालक विजयी झाले असून अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य चार संचालक पराभूत झाले. तर संंचालक अमोल बाबर यांचे बंधू सुहास बाबर हे विजयी झाले. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यांपैकी बहुसंख्य मातब्बरांचे जिल्हा बँकेशी नाते असल्याचे दिसून येते.

10:43 (IST) 29 Nov 2024

एकनाथ शिंदे टीमच्या ‘धोनी’ला पराभवानंतरही मोठे सत्तापद मिळणार, शहाजीबापू पाटील यांचा दावा

सोलापूर :’काय झाडी, काय डोंगार, काय हॉटिल..समदं ओक्केमंदी ‘ या संवादामुळे गाजलेले आणि नुकत्याच झालेल्या सांगोला विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपण पराभूत झालो असलो तरी येत्या दोन महिन्यात महायुती सरकारमध्ये आपणास मोठे पद मिळणार असल्याचा दावा केला आहे.

10:42 (IST) 29 Nov 2024

खळबळजनक! मोठ्या भावाच्या बायकोशी जुळले सूत, कुऱ्हाडीने…

नागपूर : मोठ्या भावाचे लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच दीर आणि वहिनीचे सूत जुळले.तीसुद्धा पतीपेक्षा दिरालाच जवळ करायला लागली. पत्नीशी जवळीक साधताना लहान भावाला बघताच घरात वादाचा भडका उडाला. या वादातून लहान भावाने मित्राच्या मदतीने मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला.

सविस्तर वाचा…

सत्तास्थापनेवर मध्यरात्री दिल्लीत खलबते ( PC:TIEPL)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिल्लीत अमित शाह यांच्यासह महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतं आहे.