उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग भरला आहे. या निवडणुकीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे या चारही जिल्ह्यांमधील एकूण ३५ मतदार संघांपैकी १४ ठिकाणी महायुती आणि महाराष्ट्र विकास आघाडी यांना बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्याने धक्का बसला आहे. प्रतिस्पर्ध्यांसह बंडखोरांना पेलण्याचे आव्हान आता महायुती आणि मविआ यांना स्वीकारावे लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रिंगणातील प्रमुख बंडखोर कोणते?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सहा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी मविआने यश मिळविले. त्यामुळे विधानसभेसाठी त्यांच्याकडे प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक होती. दुसरीकडे महायुतीनेही लोकसभेतील अपयशानंतर विविध योजनांचा धडाका लावल्याने त्यांच्याकडूनही इच्छुक वाढले. उमेदवारी देताना सर्वच इच्छुकांचे समाधान करणे अशक्य झाल्याने महायुती आणि मविआ दोन्हींकडे मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. त्यातील प्रमुख बंडखोरांमध्ये नाशिक जिल्ह्यातून भाजपचे केदार आहेर, राष्ट्रवादी (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ, शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) माजी आमदार निर्मला गावित, जळगाव जिल्ह्यातून भाजपचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी उपमहापौर कुलभूषण पाटील. जिल्हाप्रमुख डाॅ. हर्षल माने, राष्ट्रवादीचे (शरद पवार) माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील, धुळे जिल्ह्यात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, नंदुरबार जिल्ह्यात भाजपच्या माजी खासदार डॉ, हिना गावित यांचा समावेश करावा लागेल.
बंडखोरांचा कितपत प्रभाव?
या विधानसभा निवडणुकीत प्रथमच तीन-तीन प्रमुख पक्षांचा सहभाग असलेल्या दोन प्रतिस्पर्धी आघाड्यांमध्ये सामना होत आहे. महायुती आणि मविआ यांचे बंडखोरही प्रबळ आहेत. अक्कलकुवा मतदारसंघातून बंड करणाऱ्या भाजपच्या माजी खासदार डाॅ. हिना गावित यांनी तर बंडखोरीनंतर पक्षाचा राजीनामा दिला. डाॅ. हिना या सलग दोन वेळा खासदार राहिल्या असल्यान. तसेच त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांचे कार्यकर्तेही नंदुरबार जिल्ह्यात पसरलेले आहेत. धुळे लोकसभा मतदार संघातून मविआकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांना शिंदखेडा विधानसभा मतदार संघातून उमेदवारीची आशा होती. परंतु, तीही न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी या मतदार संघात उमेदवारी गृहित धरून तयारी केली होती. गावित, सनेर यांच्याप्रमाणेच इतरही बंडखोरांचा त्यांच्या भागात प्रभाव असल्याने त्याचा फटका अधिकृत उमेदवारांना काही प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.
देवळालीत महायुतीचे दोघे!
देवळाली मतदारसंघात शिवसेनेने (एकनाथ शिंदे) राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात राजश्री अहिरराव यांना अखेरच्या क्षणी एबी अर्ज देत बंडखोरीचे निशाण फडकावले होते. माघारीची मुदत संपुष्टात येण्याच्या पूर्वसंध्येला महायुतीत अहिरराव यांची उमेदवारी मागे घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु, माघारीच्या अंतिम दिवशी अहिरराव यांच्याशी संपर्क न झाल्याने शिंदे गटातर्फे निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. अहिरराव यांना दिलेला एबी अर्ज मागे घेत असून त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवार न समजता त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली. परंतु, माघारीसाठी निवडणूक आयोगाच्या निकषानुसार उमेदवाराच्या स्वाक्षरीचा विहित नमुन्यात अर्ज प्राप्त होणे आवश्यक असते. उमेदवार स्वत: त्यांच्या वतीने लेखी प्राधिकृत केलेला सूचक किंवा निवडणूक प्रतिनिधी यापैकी एक जण तो अर्ज सादर करू शकतो. या प्रकरणात तसे काहीही घडले नसल्याने अहिरराव या शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून कायम राहिल्या. आता या मतदार संघात महायुतीचे सरोज अहिरे आणि राजश्री अहिरराव हे दोन अधिकृत उमेदवार आहेत. यामुळे निर्माण झालेला पेच सोडविण्याच्या दृष्टीने महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये अजूनही प्रयत्न सुरू आहेत. यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याने प्रचारातही गोंधळ निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>>ए. बी. फॉर्म म्हणजे काय? या फॉर्मला निवडणूक काळात इतके महत्त्व का?
नांदगावमध्ये समीर भुजबळ यांचे बंड…
नांदगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी जाहीर करणारे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात आल्यावर पक्षाचा राजीनामा दिला. या मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे हे उमेदवार आहेत. भुजबळ आणि कांदे यांचे संबंध कधीच सलोख्याचे राहिलेले नाहीत. समीर यांचे काका ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर कांदे यांनी अनेक वेळा टीका केली आहे. भुजबळ यांच्याकडूनही कांदे यांच्यावर गुंडगिरीचे आरोप करण्यात येतात. त्यामुळेच समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी उमेदवारी करीत असल्याचे जाहीर केले आहे. भुजबळ आणि कांदे दोन्ही उमेदवार सर्व दृष्टीने तुल्यबळ असल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.