IPL 2025 Schedule Matches Dates Updates : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा १३ ठिकाणी खेळवली जाईल. पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. हा सामना कोलकाता येथे खेळला जाईल. याशिवाय, दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचबरोबर ५ वेळचे विजेते चेन्नई सुपर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना २३ मार्च रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांचे चाहते प्रचंड आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे खेळला जाईल. या स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२३ मार्च रोजी पहिला सामना एसआरएच आणि आरआर यांच्यात खेळला जाईल. यानंतर, दुसरा सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल. या हंगामात लीग टप्प्यात सीएसके आणि चेन्नई दोनदा आमनेसामने येतील. त्याच वेळी, ७ एप्रिल रोजी आरसीबी आणि मुंबई यांच्यात फक्त एकच लीग सामना खेळला जाईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल. सुरुवातीचे आणि अंतिम सामने दोन्ही कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होतील.

स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले जाणार –

ही जगप्रसिद्ध लीग १३ शहरात आयोजित केली जाईल. आयपीएल २०२५ मध्ये ६५ दिवसांत एकूण ७४ सामने खेळवले जातील. आयपीएल २०२५ मध्ये, लीग सामने २२ मार्च ते १८ मे दरम्यान खेळवले जातील. यानंतर, २०, २१, २३ आणि २५ मे रोजी प्लेऑफ सामने आयोजित केले जातील आयपीएल २०२५ मध्येही गेल्या वर्षीप्रमाणेच फॉरमॅट आहे. या दोन महिन्यांच्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे १० आयपीएल संघ विजेतेपद जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.

आयपीएल २०२५ स्पर्धेचे स्वरूप –

आयपीएल २०२४ प्रमाणेच फॉरमॅट आहे. त्यानुसार १० संघांची दोन गटात विभागणी केली आहे. प्रत्येक संघ लीग टप्प्यात १४ सामने खेळेल. पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये भिडतील, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाईल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत संघ आणि एलिमिनेटरमध्ये जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये भिडेल. येथील विजेता संघ पहिल्या क्वालिफायरमधील विजेत्या संघाविरुद्ध अंतिम फेरीत पोहोचेल.

२ संघांच्या कर्णधाराची घोषणा अद्याप बाकी –

लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अलीकडेच त्यांचे कर्णधार जाहीर केले. २७ कोटी रुपयांना करारबद्ध झालेला ऋषभ पंत सुपर जायंट्सचे नेतृत्व करेल तर २६.७५ कोटी रुपयांना निवडलेला श्रेयस अय्यर किंग्जचे नेतृत्व करेल. आरसीबीने रजत पाटीदारला त्यांचा नवीन कर्णधार म्हणून घोषित केले. फक्त दोन संघ दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी अद्याप आयपीएल २०२५ साठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2025 schedule has been announced 1st match 22 march kkr vs rcb all you need to know about 18th season vbm