IPL 2025 Final Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Highlights : आयपीएल २०२५ या स्पर्धेतील अंतिम सामना आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांमध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरूने पंजाबवर सहा धावांनी मात करत आयपीेल चषक उंचावला आहे. या विजयासह बंगळुरूने १७ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. या दोन्ही संघांनी आजवर आयपीएल चषक उंचावला नव्हता. मात्र, आता क्रिकेटरसिकांना नवा आयपीएल चॅम्पियन संघ मिळाला. बंगळुरूने आतापर्यंत तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तिन्ही वेळा या संघाने पराभव पत्करला होता. तर पंजाब किंग्सने देखील एकदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना देखील पराभव स्वीकारावा लागला होता. पंजाबला आयपीएल चषकाचा दुष्काळ संपवता आलेला नाही.
या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निर्धारित २० षटकांत बंगळुरूने ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात पंजाबच्या काईल जेमिसन व अर्शदीप सिंगने प्रत्येक ३ बळी घेत RCB चं कंबरडं मोडलं. तर बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा जमवल्या. तर, त्याला कर्णधार रजत पाटीदार (२६), जितेश शर्मा (२४), लियाम लिव्हिंगस्टन (२५), मयंक अग्रवाल (२४) या चौघांनी चांगली साथ दिली.
दरम्यान, १९१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबच्या संघाला २० षटकांत ७ बाद १८४ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून एकट्या शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची खेळी करत शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. मात्र ही झुंज अपयशी ठरली. बंगळुरूकडून कृणाल पांड्याने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत १७ धावा देत दोन बळी घेतले. तर, भुवनेश्वर कुमारने चार षटकांत ३८ धावा देत दोन बळी घेतले. तसेच यश दयाल, जॉश हेझलवूड व रोमारियो शेफर्डने प्रत्येक एक बळी टिपला.
RCB vs PBKS IPL 2025 Live Match Updates : आरसीबी विरुद्ध पीबीकेएस संघात खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल फायनल सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एकाच क्लिकवर.
आरसीबीचा संघ पंजाब किंग्सविरूद्ध पहिलं आयपीएलचं जेतेपद जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान आरसीबीचा लकीचार्म खेळाडूही हा सामना खेळणार आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीत आजवर एकही फायनल गमावलेली नाही. कोण आहे हा खेळाडू? वाचा सविस्तर
RCB vs PBK Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड
RCB vs PBK Live: पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स आयपीएल २०२५ अंतिम सामन्याची नाणेफेक झाली असून संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर फायनलपूर्वी क्लोजिंग सेरेमनीला सुरूवात झाली आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या कार्यक्रम सुरू झाला आहे. ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या भारताच्या यशस्वी मोहिमेला आणि भारतीय लष्कराला मानवंदना देणारी गाणी सुरू आहेत.
Lighting up the #Final with an enthusiastic Tribute Ceremony ??#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile pic.twitter.com/b0WptvNnIO
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
आयपीएल २०२५ स्पर्धेतील फायनलच्या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्पेशल स्टोरी शेअर केली आहे.
RCB vs PBKS Live: आरसीबी चाहत्याच्या कारचा व्हीडिओ व्हायरल
आरसीबीच्या आयपीएल २०२५ च्या सामन्यापूर्वी संघाला नजर लागू नये यासाठी आरसीबीच्या चाहत्याने संपूर्ण कारला मिरची लिंबू लावलं आहे. ही कार बंगळुरूच्या रस्त्यावर दिसली. ज्याचा व्हीडिओही व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर बातमी
आरसीबी वि. पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचा पिच रिपोर्ट आणि नाणेफेकीविषयी माहिती, वाचा सविस्तर बातमी
RCB vs PBKS Live: रोहित शर्माचा व्हीडिओ
पंजाब किंग्सविरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतरचा ड्रेसिंग रूममधील रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रोहित शर्माच्या किटबॅगमध्ये फक्त २ च बॅट उरल्या आहेत. नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर
RCB vs PBKS Live: ख्रिस गेल अहमदाबादमध्ये
आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी आरसीबीचा माजी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल देखील अहमदाबादमध्ये पोहोचला आहे.
#WATCH | Former West Indies Cricketer Chris Gayle arrives in Ahmedabad, Gujarat to watch the #IPLFinal that will be played between Royal Challengers Bengaluru and Punjab Kings at Narendra Modi Stadium today. pic.twitter.com/KJ4Wtj9XQ5
— ANI (@ANI) June 3, 2025
रॅपर ड्रेकने RCB वर लावला ६,४१,०८,९७४ रुपयांचा सट्टा, विराटचा संघ जिंकल्यास मिळणार इतकी रक्कम
RCB vs PBKS, IPL 2025 : अशी असेल पंजाब व बँगलोरची प्लेइंग ११, कधी व कुठे पाहता येईल सामना?
RCB vs PBKS : आयपीएल फायनलमध्ये कोण मारणार बाजी? कोणाचं पारडं जड? पाहा आजवरची आकडेवारी
IPL 2025 Final: आयपीएल फायनलचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता होणार अंतिम सामना? जाणून घ्या
आज रंगणार अंतिम थरार
??? ?????? ??????????? ?
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
??? ?????? ?
The #Final act begins tonight ?
Who conquers #TheLastMile? ? #TATAIPL | #RCBvPBKS | @RCBTweets | @PunjabKingsIPL pic.twitter.com/VpTJpQRkkO
“बाहुबलीसारखं नेतृत्व, मकडी स्टाइल कमबॅक अन्…”, राजामौलींच्या IPL फायनलबाबतच्या पोस्टवर PBKS ची प्रतिक्रिया
RCB vs PBKS IPL 2025 Final : अहमदाबादेत संध्याकाळी वातावरण कसं असेल? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
कोणाचं पारडं जड
आजच्या अंतिम सामन्यात पंजाबविरोधात बँगलोरचं पारडं जड आहे. कारण यंदाच्या मोसमात दोन्ही संघ तीन वेळा भिडले आहेत. त्यापैकी दोन सामन्यांमध्ये बँगलोरने विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पंजाबच्या संघाची सरशी झाली होती. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात उभय संघात पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात बँगलोरने पंजाबवर १० षटके व ८ गडी राखून मात केली होती. तसेच गुणतालिकेतही बँगलोरचा संघ पहिल्या स्थानी तर पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानी होता.
अशी असेल पंजाब किंग्सची प्लेइंग ११ (RCB predicted 11 for IPL 2025 final)
विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार) लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड, सुयश शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर – मयांक अग्रवाल
अशी असेल पंजाब किंग्सची प्लेइंग ११ (RCB vs PBKS IPL 2025 final predicted XI)
प्रियांश आर्या, जॉश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, शशांक सिंह, अझमतुल्लाह ओमरझाई, काईल जेमिसन, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि इम्पॅक्ट प्लेअर – प्रभसिमरन सिंग
