IPL 2025 GT vs MI Highlights : आयपीएल २०२५ प्लेऑफमधील दुसरा सामना म्हणजेच एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या दोन्ही संघांमध्ये दमदार लढत पाहायला मिळाली. मुंबईने गुजरातसमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला २०८ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह मुंबईने हा सामना २० धावांनी आपल्या नावावर केला आहे.

Live Updates

IPL 2025 GT vs MI LIVE Cricket Highlights : मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स सामन्याचे हायलाईट्स 

23:40 (IST) 30 May 2025
GT vs MI LIVE: मुंबई इंडियन्सचा गुजरातवर दणदणीत विजय

मुंबई इंडियन्सने गुजरातचा एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये धडक मारली आहे. जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन यांनी अखेरच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या विजयाचा मार्ग सोपा केला.

23:32 (IST) 30 May 2025

GT vs MI LIVE: रूदरफोर्ड झेलबाद

बोल्टने १९व्या षटकात पहिल्याच चेंडूवर रूदरफोर्डला झेलबाद करवत मुंबईला महत्त्वाची विकेट मिळवून दिली.

23:16 (IST) 30 May 2025

GT vs MI LIVE: साई सुदर्शन क्लीन बोल्ड

मुंबईचा पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसन १६व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने साई सुदर्शनला क्लीन बोल्ड करत मोठी विकेट मिळवली. १६ षटकांत गुजरातने ४ बाद १७६ धावा केल्या आहेत. यासह गुजरातला विजयासाठी २४ चेंडूत ५४ धावांची गरज आहे.

23:06 (IST) 30 May 2025

GT vs MI LIVE: बुमराहने मिळवून दिली महत्त्वाची विकेट

१४व्या षटकात बुमराहला गोलंदाजीसाठी पाचारण केलं आणि बुमराहने विकेट मिळवून दिली. बुमराहने परफेक्ट यॉर्कर टाकत वॉशिंग्टनला क्लीन बोल्ड केलं. सुंदर २४ चेंडूत ५ चौकार ३ षटकारांसह ४८ धावा करत बाद झाला.

22:55 (IST) 30 May 2025

GT vs MI LIVE: साई-सुंदरची वादळी खेळी

साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जोडीने वादळी फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. दोघांनी ४० चेंडूत ८१ धावांची भागीदारी करत १३ षटकांत २ बाद १४८ धावा केल्या आहेत. साई ७७ धावा तर सुंदर ४७ धावांवर खेळत आहे.

22:23 (IST) 30 May 2025
GT vs MI LIVE: साई सुदर्शनचं अर्धशतक

साई सुदर्शनने गिलची विकेट लवकर गमावल्यानंतरही संघाचा डाव सावरला आहे. साईने २८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण करत गुजरातला सामन्यात कायम ठेवलं आहे.

22:22 (IST) 30 May 2025

GT vs MI LIVE: कुसल मेंडिस झाला बाद

पॉवरप्लेनंतरच्या मिचेल सँटनरच्या षटकात कुसल मेंडिस स्वत:चं बाद झाला. सँटरनच्या चेंडूवर खेळण्यासाठी कुसल विकेटच्या जवळ आतमध्ये सरकला. तो इतका आतमध्ये सरकला की त्याचा पाय सरकला आणि चेंडू खेळण्यापूर्वी त्याचा पाय विकेटला लागला आणि हिट विकेट होत बाद झाला. यासह ७ षटकांत गुजरातने २ बाद ७६ धावा केल्या आहेत.

22:17 (IST) 30 May 2025

GT vs MI LIVE: पॉवरप्ले

शुबमन गिलची विकेट गमावल्यानंतरही गुजरातने साई सुदर्शन आणि कुसल मेंडिसच्या फटकेबाजीच्या जोरावर १ बाद ६६ धावा केल्या आहेत. साई सुदर्शन ४३ धावा तर कुसल मेंडिस ९ चेंडू २० धावांवर खेळत आहे.

21:47 (IST) 30 May 2025

GT vs MI LIVE: गुजरात टायटन्सला पहिला धक्का

मुंबईने दिलेल्या २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शनची जोडी आहे. पण पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने गुजरातला मोठा धक्का दिला आहे. कर्णधार शुबमन गिल चौथ्या चेंडूवर पायचीत होत माघारी परतला.

21:44 (IST) 30 May 2025

Rohit Sharma Record: रोहित शर्मा रेकॉर्ड

मुंबईचा राजा रोहित शर्माचा अनोखा विक्रम, IPLमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा एकमेव भारतीय फलंदाज

21:30 (IST) 30 May 2025

Who is Raj Bawa: ‘करो या मरो’च्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून २२ वर्षीय ‘राज बावा’ला संघात स्थान; जाणून घ्या कोण आहे?

Who is Raj Angad Bawa: मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलमधील एलिमिनेटर सामन्यात मुंबईच्या संघाने तीन खेळाडूंना संधी दिली असून त्यात २२ वर्षीय भारतीय खेळाडू राज अंगद बावचा समावेश आहे. …वाचा सविस्तर
21:27 (IST) 30 May 2025
GT vs MI LIVE: मुंबईने गुजरातला विजयासाठी दिलं इतक्या धावांचं लक्ष्य

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना वादळी फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला आहे. मुंबईच्या प्रत्येक फलंदाजाने योगदान देत धावसंख्येत हातभार लावला आहे. रोहित शर्माने ८१ धावा, जॉनी बेयरस्टो ४७ धावा, सूर्यकुमार यादव ३३ धावा, तिलक वर्मा २५ धावा, तर हार्दिक पंड्याने ९ चेंडूत २२ धावा करत मुंबईला ५ बाद २२८ धावांवर नेऊन ठेवलं. गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये विजयासाठी २२९ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे.

21:18 (IST) 30 May 2025

GT vs MI LIVE: नमन धीर झेलबाद

१९व्या षटकात नमन धीरने एक षटकार लगावत पुढच्या चेंडूवर झेलबाद झाला. रोहित शर्मा झेलबाद झाल्यानंतर मुंबईने दोन विकेट्स गमावले आणि धावांनाही ब्रेक लागला आहे. मुंबईने १९ षटकांत ५ बाद २०६ धावा केल्या आहेत.

21:07 (IST) 30 May 2025

GT vs MI LIVE: तिलक वर्मा झेलबाद

रोहित शर्मानंतर पुढच्या षटकात तिलक वर्मा फटकेबाजी करत झेलबाद झाला. तिलक वर्मा १८व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तिलक ११ चेंडूत ३ षटकारांसह २५ धावा करत माघारी परतला.

21:02 (IST) 30 May 2025

GT vs MI Live: रोहित शर्माचं शतक हुकलं

रोहित शर्मा ८१ धावा करत १७व्या षटकात प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहित शर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू उंच गेला आणि राशीदने कोणतीही चूक न करता संघाला मोठी विकेट मिळवून दिली. रोहित शर्मा ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ८१ धावा करत बाद झाला. यासह मुंबईने १७ षटकांत ३ बाद १८८ धावा केल्या आहेत.

20:57 (IST) 30 May 2025

GT vs MI Live: सूर्यकुमार यादव झेलबाद

सूर्यकुमार यादव ३३ धावा करत साई किशोरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. १३व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर झेलबाद झाला.

20:25 (IST) 30 May 2025
GT vs MI Live: रोहित शर्माचं अर्धशतक

रोहित शर्माची बॅट एलिमिनेटर सामन्यात तळपली आहे आणि रोहितने २७ चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावलं आहे. गुजरातने रोहितच्या दोन कॅच ड्रॉप केल्या होत्या, रोहितने या मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलत अर्धशतकी कामगिरी केली आहे.

20:17 (IST) 30 May 2025

GT vs MI Live: जॉनी बेयरस्टो झेलबाद

८व्या षटकात साई किशोरने बेयरस्टोला पहिल्याच चेंडूवर झेलबाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. गुजरातने या चेंडूवरही झेल सोडला होता, पण साई सुदर्शनच्या हाताला चेंडू लागून कुत्सियाने झेल टिपला. यासह मुंबईने पहिली विकेट गमावली आणि जॉनी बेयरस्टोचं अर्धशतक ३ धावांनी हुकलं. बेयरस्टो २२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावा करत बाद झाला.

20:06 (IST) 30 May 2025

GT vs MI Live: पॉवरप्ले

रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टोने मिळून पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता ७९ धावांचा टप्पा गाठला आहे. रोहित शर्माने पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात साई किशोरच्या गोलंदाजीवर १४ धावा करत ७९ धावांचा पल्ला गाठला. बेयरस्टो ४४ तर रोहित शर्मा ३३ धावांवर खेळत आहे.

19:56 (IST) 30 May 2025

GT vs MI Live: बेयरस्टोची वादळी फटकेबाजी

जॉनी बेयरस्टोने चौथ्या षटकात प्रसिध कृष्णाची धुलाई करत २६ धावा कुटल्या. जॉनी बेयरस्टोने या षटकात या षटकात ३ षटकार आणि २ चौकार लगावत वादळी फटकेबाजी केली. यासह मुंबईचा संघ ४ षटकांत बिनबाद ५४ धावांवर पोहोचला आहे.

19:45 (IST) 30 May 2025
GT vs MI Live: कॅच ड्रॉप

दुसऱ्या षटकात प्रसिध कृष्णा गोलंदाजी करत असताना गेराल्ड कुत्सियाने रोहित शर्माचा झेल सोडला. पुल शॉटच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या बॅटची चेंडूने कड घेत हवेत उंच उडाला. तर तिसऱ्या षटकात रोहित शर्माचा अजून एक झेल विकेटकिपरने सोडला.

19:36 (IST) 30 May 2025

GT vs MI Live: सामन्याला सुरूवात

मुंबई इंडियन्सची नवी सलामी जोडी जॉनी बेयरस्टो आणि रोहित शर्मा फलंदाजीला उतरली आहे. तर गुजरातकडून मोहम्मद सिराजने गोलंदाजीला सुरूवात केली. यासह पहिल्या षटकात मुंबईने ६ धावा केल्या आहेत.

19:09 (IST) 30 May 2025

GT vs MI Live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन

19:08 (IST) 30 May 2025

GT vs MI Live: गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकिपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, गेराल्ड कुत्सिया, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

19:02 (IST) 30 May 2025
GT vs MI Live: नाणेफेक

मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स सामन्याची नाणेफेक मुंबईने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ बदल करण्यात आले आहेत. तर गुजरातच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल आहेत. जॉनी बेयरस्टो आणि राज अंगद बावा खेळणाना दिसणार आहेत. तर रिचर्ड ग्लीसन मुंबईकडून पदार्पण करत आहेत. तर गुजरातमध्ये कुसल मेंडिस आणि वॉशिंग्टन सुंदर परतले आहेत.

18:37 (IST) 30 May 2025

गुजरात टायटन्सचे बदली खेळाडू

गुजरात टायटन्सच्या ताफ्यातील जोस बटलर आणि कगिसो रबाडा मायदेशी परतले आहेत. यापैकी बटलरसाठी गुजरातने कुसल मेंडिसला बदली खेळाडू म्हणून ताफ्यात सामील केलं आहे.

18:02 (IST) 30 May 2025

मुंबई इंडियन्सचे बदली खेळाडू

मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमधील ३ महत्त्वाचे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशी परतल्याने प्लेऑफमध्ये खेळताना दिसणार नाहीत. रायन रिकल्टन, विल जॅक्स आणि कार्बिन बॉश यांच्या जागी जॉनी बेयरस्टो,रिचर्ड ग्लीसन व चरिथ असलंका यांना संधी दिली आहे.

17:28 (IST) 30 May 2025

गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ

शुबमन गिल (कर्णधार), रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, जेराल्ड कोएत्झी, आर साई किशोर, महिपाल लोमरोर, गुरनूर सिंग ब्रार, मोहम्मद खान, अरविंद खान, इशांत शर्मा, कुमार कुशाग्र, मानव सुथार, अनुज रावत, मानव सिंधू, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजुरालिया.

17:14 (IST) 30 May 2025

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार) जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा , रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन श्रीजीथ, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कार्बिन बॉश, विघ्नेश पुथूर

IPL 2025 GT vs MI LIVE Highlights : मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलमधील एलिमिनेटरचा सामना पार पडला.