Mumbai Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद अद्यापही पाहण्यास मिळत आहेत. या निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस चालू झाली आहे. मविआमधील नेते एकमेकांवरच टीका करू लागले आहेत. तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून तापलं आहे. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाचेही पडसाद उमटत आहेत. या दोन घटनांमुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. नव्या सरकारच्या पहिल्याच महिन्यात राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून काही विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, विरोधकांमध्येच अंतर्गत संघर्ष चालू असल्यामुळे त्यांच्या आंदोलनाची तीव्रता दिसून आलेली नाही. यासंदर्भात राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. तसेच इतर सामाजिक व राजकीय बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक बातम्या.
कल्याण : रस्त्यावरील किराणा सामान हटविण्यास सांगितले म्हणून दुकानदाराची मारहाण
रस्त्यावर ठेवलेले सामान वाहतुकीला अडथळा येत आहे. ते बाजुला घेण्यात यावे अशी सूचना एका दुचाकी स्वाराने एका दुकानदाराला केली.
Chhagan Bhujbal : “आज हवा तुम्हारी हैं, कल का तुफान…” छगन भुजबळांचा इशारा नेमका कोणाला?
Chhagan Bhujbal on Manoj Jarange : आरक्षण म्हणजे हमखास शासकीय नोकरी, असा त्यांचा समज असून उपोषण म्हणजे त्यांचा छंद असल्याची बोचरी टीकादेखील छगन भुजबळ यांनी केली.
“…हा महाराष्ट्राचा अपमान”, अमित शाहांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलेल्या टीकेला शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेवरील खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, “गद्दारांना सोबत घेऊन तुम्ही सरकार बनवलं आणि तुम्ही दगाफटक्याच्या गोष्टी करताय. गद्दारी व बेईमानीला या देशात कोणी खतपाणी घातलं असेल तर ते भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलं आहे. अमित शाह यांनी देखील गद्दारीला खातपाणी घालण्याचं काम केलं आहे आणि तेच अमित शाह या स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. शरद पवारांवर टीका करतात, उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणतात.हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. ज्यांच्या नावावर तुम्ही स्वतःचं पोट भरताय, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्यावर टाळ्या वाजवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीचा रंगणार फड, येणार नामवंत मल्ल
मराठी मातीला कुस्तीचे असलेले वेड लपून नाही. राज्यातील अनेकांनी राष्ट्रीय पातळीवर आपले डाव टाकून चीत केल्याचा इतिहास आहे.
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
Ajit Pawar NCP Municipal Elections : आधी घोषणा केल्याप्रमाणे अजित पवार गट स्वबळावर लढण्यावर ठाम आहे का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
Siddheshwar Yatra Festival : नऊशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला रविवारी सकाळी मानाच्या नंदीध्वजांच्या भव्य मिरवणुकीने आणि शहराच्या पंचक्रोशीतील ६८ शिवलिंगांच्या तैलाभिषेकाने प्रारंभ झाला.
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Uddhav Thackeray Shivsena Strength in Nagpur: लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर आघाडीविषयी वाढलेल्या अपेक्षा विधानसभा निवडणुकीतील अपयशामुळे फोल ठरल्या व आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली.
राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात मुंबई पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या स्थानावर
राज्यात महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात यावर्षीसुद्धा महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
ठाण्यात चिनी मांजाच्या जप्तीसाठी दुकानात धाडी, पालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी
Chinese Manja Thane : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन, प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांबरोबरच पक्ष्यांसाठी घातक ठरत असल्याने त्यांच्या जप्तीसाठी ठाणे महापालिकेच्या पथकाने दुकानांमध्ये धाडी सुरू केल्या आहेत.
Kisan Kathore : “ते बदलापूरचे नाही बेलापुरचे महापौर होतील”, आमदार कथोरे यांची वामन म्हात्रे यांच्यावर मार्मिक टीपणी
Kisan Kathore Vs Waman Mhatre : विधानसभा निवडणुकीनंतर बदलापूर शहरात आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यामधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.