Latest Marathi News, 12 June 2025 : हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध भागात पुढील चार-पाच दिवस मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, विदर्भ व मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे. पावसाच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच राज्यातील व देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असेल. जसे की, वेगवेगळ्या पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेक पक्ष निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करत आहेत. दरम्यान, राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. यावरही आपलं लक्ष असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दोऱ्यावरही आपलं लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today : राज्यातील, देशातील मान्सूनसह राजकीय व सामाजिक बातम्यांचा आढावा.

11:52 (IST) 12 Jun 2025

पनवेल : लाचखोर पोलीस निरीक्षकावर कारवाई, चौकशीत साडेतीन कोटींची संपत्ती उघड

नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिद भारंबे यांनी पदभार स्वीकारताच सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लाचखोरी बंद करण्याचे निर्देश दिले. …वाचा सविस्तर
11:47 (IST) 12 Jun 2025

कोकण रेल्वे मार्गावर श्री गणेश चतुर्थी सणात ५०० जादा फेऱ्यांची प्रवासी संघटनेने केली मागणी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवासी संघटनेने कोकण रेल्वे, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे विशेष गाड्यांची मागणी केली आहे. …सविस्तर बातमी
11:36 (IST) 12 Jun 2025

अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी उपस्थित, ईडीने बजावले होते समन्स

डिनो मोरिया युवा सेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती मानला जातो. …अधिक वाचा
11:10 (IST) 12 Jun 2025

मुंबई : तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

पीडित मुली बुधवारी राहत्या इमारतीच्या गच्चीवर गेल्या होत्या. दोन मुली ११ वर्षांच्या, तर एक मुलगी १० वर्षांची आहे. …अधिक वाचा
11:03 (IST) 12 Jun 2025

मुंबई : वातानुकूलित उपनगरीय रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

मध्य, पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड होत असल्याने, प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. …सविस्तर बातमी
10:53 (IST) 12 Jun 2025

मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्याला आजपासून सतर्कतेचा इशारा; राज्यात ‘या’ दिवशी पडणार मुसळधार पाऊस

यंदा नैऋत्य मोसमी वारे लवकर दाखल झाले असले तरी मागील दोन आठवड्यांपासून त्यांचा वेग मंदावला आहे. …वाचा सविस्तर
10:42 (IST) 12 Jun 2025

पहिल्या पावसात फुलते ‘ही’ वनस्पती… डोंगरमाथ्यावरील सौंदर्य खुलवते… या वनस्पतीचे वैशिष्ट्य काय…

मुख्यतः पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उमलणाऱ्या या फुलाचे परागीभवन पतंगांमार्फत होते. हे फुल रात्री पतंगांना आकर्षित करते आणि त्याच माध्यमातून त्याचे पुनरुत्पादन शक्य होते. …सविस्तर बातमी
10:39 (IST) 12 Jun 2025

राज ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये दाखल, मनपा निवडणुकीआधी राजकीय भेटीची चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसही काही वेळापूर्वी याच हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेदरम्यान, राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. हा योगायोग आहे की राजकीय भेट आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.

10:31 (IST) 12 Jun 2025

Nana Patole : “ऑपरेशन सिंदूर हे कम्प्यूटर गेमप्रमाणे…”, नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद

Nana Patole on Operation Sindoor : डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकावल्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध थांबलं असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. …सविस्तर बातमी
10:26 (IST) 12 Jun 2025

प्रभाग रचनेबाबतच्या आदेशानंतर मुंबई महापालिका प्रशासन लागले कामाला, कालमर्यादा न दिल्यामुळे संभ्रम

मुंबई महापालिका प्रशासनाने प्रभागांच्या सीमारेषांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे ठरवले आहे. त्याकरीता सध्या करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. …सविस्तर वाचा
10:13 (IST) 12 Jun 2025

आषाढी एकादशीनिमित्त सावंतवाडी-पंढरपूर रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी

कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गाने जवळ असले, तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो व प्रवास त्रासदायक होतो. …सविस्तर बातमी
10:09 (IST) 12 Jun 2025

सायबर फसवणुकीसाठी मधुजालाचा वापर; विवाहविषयक संकेतस्थळावरून सापळा रचून ३२ लाखांची फसवणूक

एका बहुराष्ट्रीय कंपनीत ते व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांनी लग्नासाठी एका विवाहविषयक संकेतस्थळावर नाव नोंदवले होते. …अधिक वाचा
10:05 (IST) 12 Jun 2025

बच्चू कडूंच्या आंदोलनाला हिंसक वळण, महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच महामार्गावर पोहचून टायर जाळण्यास सुरूवात केली. काही कार्यकर्त्यांनी झाडांच्या फांद्या रस्त्यावर आणून टाकल्या. …वाचा सविस्तर
09:56 (IST) 12 Jun 2025

पीओपी विरुद्ध शाडूमाती! उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी ठोस यंत्रणेची मागणी… नैसर्गिक स्रोतांत विसर्जनास पर्यावरणपूरक मूर्तिकारांचा विरोध

पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता सार्वजनिक गणेश मंडळांच्या उंच मूर्तींची परंपरा कायम राहावी अशी अपेक्षा पीओपीच्या मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा…

09:56 (IST) 12 Jun 2025

सौंदर्याला भुलून अनोळखी तरुणीबरोबर फेसबुकवर केली मैत्री… अन् काय झाले ते वाचा…

फिर्यादी ४४ वर्षांचे असून चांदिवली येथे राहतात. त्यांना १४ मे रोजी फेसबुकवर प्रिया कुमारी नावाच्या एका तरुणीची मैत्रिची विनंती आली होती.

सविस्तर वाचा…

09:55 (IST) 12 Jun 2025

व्हॉट्सॲपवरील ग्रुप ठरले धोकादायक… शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसणूक

स्मार्ट फोनधारकामंध्ये व्हॉट्स ॲप सर्वाधिक लोकप्रिय आहे. याच व्हॉट्स ॲपचा वापर करून फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत.

सविस्तर वाचा...

09:25 (IST) 12 Jun 2025

छ. संभाजीनगर व वाशिममध्ये मुसळधार पावासाला सुरुवात

छत्र्पती संभाजीनगरमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. तर वाशिममध्ये मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. मात्र, काही भागात वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

09:24 (IST) 12 Jun 2025

अमरावतीमधील दर्यापूरमध्ये ढगफुटी

अमरावतीमधील दर्यापूरमध्ये ढगफुटीसदृष्य स्थित निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असून शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. स्थानिकांनी सरकारकडे मदतीची याचना केली आहे.

09:22 (IST) 12 Jun 2025

मान्सून सक्रीय होणार! हवामान विभागाकडून राज्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा

देशात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असून महाराष्ट्रासाठी पुढील चार पाच दिवस महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने पुढचे चार-पाच दिवस राज्यात मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्र व घाटमाथ्यावर पावसाचा जोर पाहायला मिळेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.