Latest Marathi News Update, 30 November 2023: राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा आरक्षणाचा वाद चालू असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर चालू असलेल्या आमदार अपात्रता सुनावणीचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातच दत्ता दळवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण सुरू झालं आहे.
Today’s Breaking News Updates: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद चिघळला.
पालिकेने हा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
ही नौटंकी आहे. पण ज्यांचा राजाच नौटंकी आहे, त्यांचे सरदार नौटंकी असणारच. विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षांचे नेते दोन दिवसांपासून गावागावात जाऊन फिरत आहेत. पण मुख्यमंत्री व त्यांचे सरकार आज जागे झाले आहे – संजय राऊत
अवकाळीचं संकट आस्मानातून कोसळत असताना आपले सुलतान आणि डेप्युटी सुलतान प्रचारात व्यग्र होते. कुणी छत्तीसगडमध्ये, कुणी तेलंगणात होते. जणूकाही ते गेले नसते तर तिथे निवडणुका थांबल्या असत्या. त्यांची मुख्य जबाबदारी होती इथून खोके नेऊन तिथल्या लोकांना सुपूर्त करायची. पण आपली ११ कोटी जनता संकटात असताना त्याबाबतीत त्यांना चिंता नाही – संजय राऊत
महाराष्ट्र लाइव्ह अपडेट
Today’s Breaking News Updates: दत्ता दळवींच्या अटकेनंतर महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप.
