Maharashtra News Updates, 30 September 2025 : गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसाचा जोर आता राज्यातील काही भागांमध्ये ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम असेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे व साताऱ्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. तर, उर्वरित भागांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळेल.

दरम्यान, आज (३० सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरकारकडून काय मदत मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसऱ्या बाजूला, सरकार जी काही मदत जाहीर करेल ती दिवाळीपूर्वी मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुका असत्या तर महाराष्ट्रात पैशाचा पूर आला असता : ठाकरे गट

शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या नुकसानभरपाईवरून शिवसेनेने (ठाकरे) राज्य सरकारला टोला लगावला आहे. “महाराष्ट्रात आत्ता निवडणुका असत्या तर मदतीसाठी केंद्राकडून व राज्य सरकारकडून पैशांचा पूर आला असता”, अशा शब्दांत आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तर, “महाराष्ट्रावर आभाळ फाटलं आहे, राज्य सरकारने खजिन्याची खिडकी उघडावी”, अशी मागणी ठाकरे गटाने दैनिक सामना या त्यांच्या मुखपत्राद्वारे केली आहे.

Live Updates

Marathi News Live Today : राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

14:19 (IST) 30 Sep 2025
“आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही”, फडणवीसांचं रोखठोक मत; म्हणाले, “सवलती लागू करणार”

मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालं आहे. लोकांच्या घरांचं, पिकांचं नुकसान पाहून शेतकऱ्यांसमोर आता जगायचं कसं? असा प्रश्न उभा राहिला आहे. हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. अशा स्थितीत शेतकरी व विरोधक राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. अशातच मुसळधार पावसामुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत सरकार शेतकऱ्यांसाठी व नुकसानग्रस्तांसाठी काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सरकार ओला दुष्काळ जाहीर करतंय का याकडेही सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान, राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही. मात्र, दुष्काळ पडल्यानंतर जशा सवलती दिल्या जातात तशाच सवलती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

२२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ती मदत वितरीत केली जात असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

13:19 (IST) 30 Sep 2025

‘रामसेतू’ पाडणार…आता पादचाऱ्यांसाठीही बंद होणार…नवीन पूल कुठे उभारणार ?

गोदावरीला आलेल्या पुरामुळे २०१६ नंतर प्रथमच रामसेतू पाण्याखाली गेला. पुरामुळे आधीच कमकुवत झालेल्या रामसेतूची अवस्था अधिकच वाईट झाले. पुलावरुन वाहने जाऊ नयेत म्हणून उभारलेले खांबांचे अडथळे उखडले गेले. …वाचा सविस्तर
13:16 (IST) 30 Sep 2025

तापट स्वभावामुळे डोंबिवलीतील तरूणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

ऋषिकेश चारूदत्त परब (२२) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो आपल्या कुटुंबीयांसह राहुलनगर मधील सुदामा रेसिडेन्सी इमारतीच्या सहाव्या माळ्यावर राहत होता. …वाचा सविस्तर
12:59 (IST) 30 Sep 2025

आनंदवार्ता! उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार;  विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या नेमकी योजना काय?

विविध परीक्षांच्या शुल्कांमध्ये मोठी वाढ झाल्याने विद्यार्थी, पालकांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र, शासनाच्या एका निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. …सविस्तर वाचा
12:59 (IST) 30 Sep 2025

bribery case: गट क्रमांकाच्या दुरुस्तीसाठी हवे लाख;  शेती खरेदी केल्यानंतर….

शासकीय कार्यालयातील लाचखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले असून किरकोळ कामांसाठी देखील लाखो रुपयांची लाच मागितली जाते. …सविस्तर बातमी
12:56 (IST) 30 Sep 2025

सप्टेंबरमध्ये पावसाने झोडपलं, आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट

बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून पुढचे चार दिवस महाराष्ट्रात काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला ाहे. ३ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. आज केवळ नांदेड जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्यापासून कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच १, २ व ३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी व साताऱ्यासह विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

12:55 (IST) 30 Sep 2025

जळगाव ते कॅनडा आंतरराष्ट्रीय रॅकेट चालविणारे ललित कोल्हे आहेत तरी कोण ?

जळगाव ते कॅनडा व्हाया ममुराबाद फार्म हाऊस आंतरराष्ट्रीय रॅकेट चालविणारे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या धाडसामुळे जळगावचे नाव सगळीकडे चर्चेत देखील आले आहे. …सविस्तर वाचा
12:43 (IST) 30 Sep 2025

फडके रोडवरील कोंडी सोडविण्यासाठी चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर बस उभ्या करण्यास प्रतिबंध…

एका पाठोपाठ बस बापूसाहेब फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीच्या प्रवेशव्दारावर थांबल्या की दररोज फडके रोडवर वाहनांच्या रांगा लागतात. …सविस्तर वाचा
12:26 (IST) 30 Sep 2025

Uday Samant : दादागिरी करून माझ्या खात्यात हस्तक्षेप केला तर खपवून घेणार नाही… संतप्त उदय सामंत यांनी कोणाला इशारा दिला?

नवी मुंबईतील वाशी येथे शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी मेळावा आणि अंकुश कदम यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उदय सामंत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. …सविस्तर वाचा
12:12 (IST) 30 Sep 2025

लोकलमधून भिरकावल्या जाणाऱ्या निर्माल्याचा धोका ! तरुणाच्या मृत्यूनंतर नागरिकांमधून संताप

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान नायगाव भाईंदर खाडी, वैतरणा खाडी लागते. या खाडीत धावत्या लोकल मधून निर्माल्य टाकून देण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. …वाचा सविस्तर
12:06 (IST) 30 Sep 2025

राज्यातील तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयांना कोट्यवधींचा निधी… काय आहे योजना?

केंद्र सरकारने राज्याला ३५० कोटी रुपये दिले. त्यातून ४२ तंत्रनिकेतन, ८ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नवोपक्रम केंद्राची (इनोव्हेशन सेंटर) स्थापना करण्यात येणार आहे. …अधिक वाचा
11:50 (IST) 30 Sep 2025

अनैतिक मानवी वाहतूक शाखा बरखास्त, महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाची स्थापना

निकेत कौशिक यांनी तिसरे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारला आहे. कौशिक यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यास सुरवात केली आहे. …सविस्तर वाचा
11:49 (IST) 30 Sep 2025

MSCEP Online Exam: राज्यात २ हजार ४१० पदांसाठी डिसेंबरमध्ये ऑनलाइन परीक्षा… अर्ज भरण्याची मुदत काय, कोणाला संधी?

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) केंद्रप्रमुख किंवा समन्वयक पदासाठी ‘समूह साधन समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’ ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. …सविस्तर वाचा
11:04 (IST) 30 Sep 2025

चिमण्याच्या मिरवणुकीत कोण, कोण…नाशिक पोलिसांकडून वरात…

वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक दहशतीखाली असताना कारागृहातून सुटलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील संशयिताची टोळक्याने मिरवणूक काढण्यापर्यंत हिंमत गेली. …सविस्तर वाचा
10:40 (IST) 30 Sep 2025

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी हिंदू मंदिरं पुढे, मग दर्गे-मशिदी मागे का? भाजपचा सवाल

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, ” अतिवृष्टी आणि महापूराच्या वेढ्यात सापडलेल्या महाराष्ट्रात लाखो कुटुंबे संकटात सापडली, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा कठीण प्रसंगी तुळजाभवानी मंदिर, शेगाव गजानन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या हिंदू मंदिरांनी कोट्यवधी रुपयांची पारदर्शक मदत सरकारकडे पाठवली. कितीतरी मंदिरे, ट्रस्ट, सार्वजनिक मंडळांनी आपापल्या परीने अन्न, निधी आणि जीवनावश्यक वस्तू संकटग्रस्तांपर्यंत पोहोचवून माणुसकीचे दर्शन घडविले. पण राज्यातील अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्गा-मशिदी मागे का आहेत? त्यांच्या व्यवस्थापनाकडे कोट्यवधींचा निधी असतानाही, एकही ठोस मदतीची जाहीर घोषणा, निधीची उघड माहिती किंवा पूरग्रस्तांसाठी दिलासा का नाही?”

उपाध्ये म्हणाले, “कधी बोगस हिंदुत्वाचे बेगडी मुखवटे चढवून तर कधी गंगाजमनी तहजीबचे प्रेम दाखवत मंदिरांची टिंगल आणि हिंदूंवर टीका करणाऱ्या लांगूलचालनवादी नेत्यांनी व विचारवंतांनी हे प्रश्न आज स्वत:ला विचारायला हवेत. प्रश्न हिंदू-मुस्लिमचा नाही प्रश्न संवेदनशीलतेचा आहे.”

10:15 (IST) 30 Sep 2025

Maharashtra Weather : मुंबईसह राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार; मात्र ‘या’ दिवशी पुन्हा पाऊस पडणार

IMD Forecast : गेल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाचा जोर मुंबईसह राज्यात आजपासून ओसरणार असून, अधूनमधून हलक्या सरी बरसतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. …वाचा सविस्तर
10:14 (IST) 30 Sep 2025

RSS Prayer: ‘नमस्ते सदा’ नव्हे, ‘ही ‘ होती संघाची प्रार्थना; १४ वर्ष चालली, बदलण्याचे कारण…

वर्धा जिल्ह्यात १९३९ साली फेब्रुवारी महिन्यात संघाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. १९२६ ते १९३९ दरम्यान झालेल्या संघ कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच मराठी संघ प्रार्थना बदलून ती संस्कृतमध्ये करण्याचा निर्णय झाला. …सविस्तर बातमी
10:12 (IST) 30 Sep 2025

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची भाषा… गिरीश महाजन काय म्हणाले ?

शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) दसरा मेळावा रद्द करून उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करायला हवी, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. …अधिक वाचा
10:12 (IST) 30 Sep 2025

अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत; विभागीय आयुक्तांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी विभागातील पाचही जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. …वाचा सविस्तर
10:11 (IST) 30 Sep 2025

ठाणे ते तळकोकणात आठ महिन्यात ६८ लाचखोरीची प्रकरणे; सर्वाधिक प्रकरणे ठाणे परिक्षेत्रातील

ठाणे विभागामध्ये १ जानेवारी ते २४ सप्टेंबर या कालावधीत लाचेची ६८ प्रकरणे समोर आली असून एक प्रकरण अपसंपदाचे दाखल आहे. …सविस्तर वाचा
10:11 (IST) 30 Sep 2025

घातक गोगलगायीचा अंबरनाथमध्ये प्रादुर्भाव; अंबरनाथ पूर्वेतील अटल उद्यानात शेकडो गोगलगायी, वनसंपदेलाही धोका

जायंट अफ्रिकन लॅंडस्नेल असे या गोगलगायीचे नाव आहे. पूर्व अफ्रिकेत १८ व्या शतकात ही गोगलगाय आढळून आल्याचे पुरावे आहेत. मात्र भारतात ही मॉरिशियसमधून १८४७ च्या सुमारास आल्याचे बोलले जाते. …सविस्तर वाचा
10:11 (IST) 30 Sep 2025

ठाणे : पुन्हा पाऊस, पुन्हा खड्डे, पुन्हा कोंडी

ठाण्यात शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस पडला. या दोन दिवसांच्या पावसामुळे शहरात पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. …अधिक वाचा
10:10 (IST) 30 Sep 2025

दिव्यांगांना शासकीय योजना, मार्गदर्शन, सेवा आता एका छताखाली; ठाण्यात ‘वन स्टॉप’ सक्षमीकरण केंद्र सुरु

एका ठिकाणी सर्व माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. या कार्यालयामार्फत दिव्यांग नागरिकांना विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, लाभ मिळविण्यासाठी सहाय्य आणि समस्या निवारण यासाठी मदत केली जाणार आहे. …वाचा सविस्तर
10:10 (IST) 30 Sep 2025

ठाण्यात विसर्जनासाठी कृत्रिम तलावाऐवजी लोखंडी टाक्या उभारल्या; मनसेने केली चौकशीची मागणी

ठाणे महापालिकेने गणेश मुर्ती तसेच देवी मुर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने कृत्रिम तलावांसह लोखंडी टाक्यांची उभारणी केली होती. तसेच छटपूजेच्या विधीसाठी महापालिकेमार्फत कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात येते. …वाचा सविस्तर
10:10 (IST) 30 Sep 2025

नवी मुंबईतील नाॅलेज पार्कची इतक्या कोटींना विक्री… पार्कची मालकी पंचशील रिअल्टीकडे

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, पुणेस्थित रिअल इस्टेट डेव्हलपर पंचशील रिअल्टी यांनी कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया (फ्रेंच आयटी कंपनीची भारतीय शाखा) यांच्याकडून ठाणे नॉलेज पार्क खरेदी करत करार केला आहे. …अधिक वाचा
10:09 (IST) 30 Sep 2025
“शक्तिशाली लॉबी माझी बदनामी करतेय”, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींचं उत्तर, रोख कोणाकडे?

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यावरून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. यावर गडकरी म्हणाले, माझ्या निर्णयामुळे नाराज झालेली शक्तिशाली आयात ‘लॉबी’ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. जीवाश्म इंधनाच्या आयातीवर जवळपास २२ लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. माझ्या निर्णयामुळे काही लोकांच्या व्यवसायांना फटका बसला आणि ते रागाने माझी बदनामी करू लागते आहेत.