Maharashtra News Highlights: २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने एकीकडे सणासुदीचं वातावरण असताना दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा नेस्को सेंटरला होणार आहे. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त दसऱ्याला होणाऱ्या मेळाव्याचीही चर्चा आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये या मेळाव्यांवरून जुंपली असून मेळाव्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या आकडेवाऱ्या दोन्ही बाजूंनी दिल्या जात आहेत.

Live Updates

Marathi News Live Update: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा…

20:09 (IST) 1 Oct 2025

दीक्षाभूमीवरील तयारीत हलगर्जीपणा; प्रशासनाला उच्च न्यायालयाचे खडेबोल, म्हणाले “लाखो अनुयायी…”

धम्मचक्र दिनानिमित्त लाखो अनुयायी येत असताना प्रशासनाचा हलगर्जीपणा योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवित रात्रीपर्यंत सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. …सविस्तर बातमी
19:55 (IST) 1 Oct 2025

दसरा २०२५ : रावण दहनामुळे लाखो ब्राह्मणांचा अपमान, ‘या’ राज्यात रावण दहनाच्या परंपरेवर बंदीची मागणी…

ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी रावण दहनाला नेमका कोणकोणत्या राज्यात आणि कसाकसा विरोध झाला, याविषयी माहिती दिली. …अधिक वाचा
19:40 (IST) 1 Oct 2025

‘आरएसएस’च्या कार्यक्रमाला जाणार नाही, अखेर कमलताई गवईंनी मौन सोडले, म्हणाल्या…

अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना निमंत्रित करण्यात आल्यानंतर उद्भवलेल्या वादावर खुद्द कमलताईंनी प्रथमच भाष्य केले आहे. …वाचा सविस्तर
19:40 (IST) 1 Oct 2025

इराणी चषक क्रिकेट लढत : तायडेचे संयमी शतक; राठोडची साथ; पहिल्या दिवसअखेर विदर्भ ५ बाद २८०

गेल्या काही हंगामांत विदर्भाचा आधारस्तंभ म्हणून समोर आलेला करुण नायर आता कर्नाटकाकडे परतला आहे. त्यामुळे मधल्या फळीत विदर्भाची भिस्त प्रामुख्याने यश राठोडवर असून त्याने आपली जबाबदारी चोख बजावली. …वाचा सविस्तर
18:57 (IST) 1 Oct 2025

नक्षलवाद्यांची ‎दोन स्मारके उद्ध्वस्त; अतिदुर्गम कटेझरीत गडचिरोली पोलिसांची कारवाई…

नक्षलवाद्यांकडून दुर्गम भागात दहशत निर्माण करून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मारकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. …वाचा सविस्तर
18:50 (IST) 1 Oct 2025

नामफलकांचा ठावठिकाणा नाही; लाखोंचा निधी वाऱ्यावर, वसई-विरार महापालिकेचे दुर्लक्ष

शहरातील महत्त्वाचे चौक आणि रस्त्यांवरील नामफलकांची दुरावस्था झाल्याने  नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. …सविस्तर बातमी
18:50 (IST) 1 Oct 2025

आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकार्पणाआधी नामकरणाचा वाद पेटला; “दि.बा. पाटील” नाव न दिल्यास लाखोंचा मोर्चा – सुरेश म्हात्रे

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे अशी मागणी ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील भूमिपूत्र करत आहेत. …अधिक वाचा
18:40 (IST) 1 Oct 2025

विजयादशमी विशेष : ‘या’ ठिकाणी दशानन रावणाचे दहन नव्हे तर पूजन; सद्गुणांसाठी! २१२ वर्षांची अनोखी परंपरा….

भारतात श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणे, ही सर्वसामन्य बाब; परंतु, ‘एका ठिकाणी रावणाची पूजा होते, तीही सद्गुणांमुळे’ हे सांगितले तर खरे वाटणार नाही. …सविस्तर वाचा
18:04 (IST) 1 Oct 2025

संतनगरीत कंत्राटदाराचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला; घातपात की…

विदर्भ पंढरी शेगाव परिसरात एका कंत्राटदाराचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. …सविस्तर बातमी
17:56 (IST) 1 Oct 2025

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ४ वर्षे आमदार, अधिकाऱ्यांचे वेतन थांबवा; रविकांत तुपकर म्हणतात, ‘मंत्र्यांचे चोचले…’

रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अफलातून उपाय सुचविला आहे. सरकारने आमदार, मंत्री यांचे, थेट प्रधान सचिवासह जिल्हाधिकारी आदि वरिष्ठ अधिकाऱ्याचे महिन्याचे वेतन चारवर्षे थांबवावे. …वाचा सविस्तर
17:44 (IST) 1 Oct 2025

नागपुरात येताच रामनाथ कोविंद पोहोचले आरएसएस संस्थापक हेडगेवारांच्या घरी, झोपाळ्यावर आनंद घेत…

बुधवारी सायंकाळी रामनाथ कोविंदयांचे नागपूर मध्ये आगमन झाले असून त्यानंतर रामनाथ कोविंद यांनी संघाचे पहिले सरसंचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या महाल परिसरातील घराला भेट दिली. …सविस्तर बातमी
17:12 (IST) 1 Oct 2025

धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२५ निमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन

दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचंड वाढणाऱ्या गर्दीचा विचार करता, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. …सविस्तर वाचा
17:10 (IST) 1 Oct 2025

दसऱ्यासाठी नागरिकांनी ही चूक केल्यास होणार लाख रुपयांचा दंड!

विजयादशमी (दसरा) हा हिंदू संस्कृती मधील प्रमुख सण असून तो आश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जातो. …सविस्तर वाचा
17:08 (IST) 1 Oct 2025

महाराष्ट्रातील सरकारी शाळेला ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ पुरस्कार ; शिक्षण मंत्र्यांकडून कौतुकाची थाप

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. …सविस्तर वाचा
16:48 (IST) 1 Oct 2025

VIDEO : ‘१७५० रुपयांचा तुकडा नकोच’ शासनाचे अनुदान परत; शेतकऱ्यांचे ‘ताट वाटी आंदोलन’

अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचे झालेले १०० टक्के नुकसान, त्यातच शासनाने दिलेले तुटपुंजे १७५० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले आहे. ही मदत अपमानास्पद असल्याचे सांगून या विरोधात चांदूरबाजारमध्ये ‘ताटवाटी आंदोलन’ केले. …सविस्तर वाचा
16:38 (IST) 1 Oct 2025

नवनीत राणांनी अनवाणी पायी चालत घेतले अंबादेवी, एकविरा देवीचे दर्शन; शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी साकडे…

नवरात्रोत्सवाच्या पर्वावर भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी यंदाही अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी बुधवारी पारंपरिक पदयात्रा केली. …अधिक वाचा
16:28 (IST) 1 Oct 2025

आरएसएसचा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा उद्या, सरसंघचालक डॉ. भागवत कुठल्या मुद्यांना स्पर्श करणार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा उत्सव गुरुवार, २ ऑक्टोबरला रेशीमबाग मैदानावर साजरा होणार आहे.सरसंघचालक डॉ. भागवत कोणत्या मुद्यांना स्पर्श करतात, याकडे लक्ष राहणार आहे. …वाचा सविस्तर
15:46 (IST) 1 Oct 2025

परभणी जिल्ह्यातील ८५ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण; सरसकट ५२ मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर

परभणी जिल्ह्यातील एकूण ५२ महसूल मंडळात या पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. काही महसूल मंडळात तीन वेळा तर काही महसूल मंडळात चार वेळा अतिवृष्टी झाली आहे. …सविस्तर बातमी
15:43 (IST) 1 Oct 2025

Today Gold Price : दसऱ्याच्या एक दिवसापूर्वीच सोन्याच्या दराने वाढवली चिंता… नवीन दर बघून…

दसऱ्याच्या एक दिवसापूर्वी सोन्याच्या दराने सर्वसामान्य ग्राहकांना धडकी भरली आहे. सराफा दुकानदारांनाही सोन्याच्या दरामुळे विक्रीवर परिणामाची चिंता आहे. …सविस्तर वाचा
15:33 (IST) 1 Oct 2025

केंद्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन कायदा रद्द करण्याची किसान सभेची मागणी

परभणी जिल्हयात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अनेकवेळा अतिवृष्टी व त्यानंतर पूरस्थितीमुळे हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. …सविस्तर बातमी
15:32 (IST) 1 Oct 2025

गोंदिया : बाजारपेठेत निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली

दुकानाची भिंत अचानक येथे काम करत असलेल्या मजुराच्या अंगावर कोसळली असल्यामुळे या भिंतीच्या ढिगार्‍ यात दबून येथे काम करत असलेल्या दोन मजुरा पैकी एकाच्या मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. …सविस्तर बातमी
15:19 (IST) 1 Oct 2025

चुकीच्‍या खतांचा वापर आता कसा टळणार? शेतकऱ्यांसाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञान…

शेतकऱ्यांसाठी एक मोठी डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ नावाचे अत्याधुनिक अप्लिकेशन विकसित केले आहे. …सविस्तर वाचा
15:10 (IST) 1 Oct 2025

दसऱ्याला ‘सोन्या’त फसवणूक? सोनं वाटताय ते शमी, आपटा की…

देशात दसरा सण मोठया प्रमाणात साजरा केल्या जातो. ज्येष्ठ मंडळीस ‘ सोनं ‘ देत आशीर्वाद घेतल्या जातात. हे सोनं म्हणजे शमी वृक्षाची पानं.शमी वृक्षाचे पूजन करीत सिमोलंघन केल्या जाते व आपट्याची पाने वाटल्या जातात. …सविस्तर वाचा
14:57 (IST) 1 Oct 2025

व्हाट्सअप चॅटबाॅट प्रणालीमुळे पोलीस तपास सुलभ ; तीन प्रकरणांचा छडा

या प्रणालीच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींनुसार जिल्ह्यातील तीन प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. …सविस्तर वाचा
14:14 (IST) 1 Oct 2025

टीईटी परीक्षा सक्तीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करणार ?

यासंदर्भात सर्व शिक्षकांना आता महाराष्ट्र सरकार हा एकमेव आधार वाटत आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे निवेदनाव्दारे सर्व परिस्थिती मांडली आहे. …वाचा सविस्तर
13:54 (IST) 1 Oct 2025

VIDEO: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला, अदानींची पोस्ट चर्चेत…

Gautam Adani Post : उद्घाटनापूर्वी गौतम अदानी यांनी अपंग, बांधकाम कामगार, महिला कर्मचारी आणि अभियंत्यांना भेटून भावनात्मक पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली. …सविस्तर वाचा
13:53 (IST) 1 Oct 2025

Video: संतापजनक : भररस्त्यात तरुणीला मारहाण, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

पुणे शहरातील के.के मार्केट ते चव्हाणनगर रोड दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास भररस्त्यात तरुणीला एकजण लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असल्याची घटना घडली आहे. …वाचा सविस्तर
13:47 (IST) 1 Oct 2025

जळगावात अजित पवार गटाच्या ताब्यातील जिल्हा बँकेचा मालमत्ता विकण्याचा धडाका…!

एकनाथ खडसे यांच्यासारख्या विरोधी पक्षातील ज्येष्ठ संचालकांनी जिल्हा बँकेच्या निर्णयाला कडाडून विरोध सुद्धा केला आहे. …सविस्तर वाचा
13:31 (IST) 1 Oct 2025

नवरात्रात नवा थरार; ‘अवकाश स्थानका’च्या दर्शनाचे ‘चार वार’

अवकाशात नवरात्रात नवा थरार अनुभवण्याची संधी उपलब्ध होत आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे सलग चार दिवस दर्शन होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाश प्रेमींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली. …सविस्तर वाचा
13:29 (IST) 1 Oct 2025

मुंबईकरांसाठी भाताची लोंबी… सोनालूची फुले…

दररोज पहाटे नाशिकहून रेल्वेने निघालेल्या काही महिला हातात भाताच्या लोंबी आणि सोनालूच्या फुलांच्या जुड्या घेऊन दसऱ्यानिमित्त दादर फुलबाजारात दाखल होत आहेत. …वाचा सविस्तर

बीड जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शाळा आणि पोलीस ठाण्यातही पुराचे पाणी (संग्रहीत छायाचित्र)

Marathi News Live Update: मराठवाड्यातील पूरस्थितीसंदर्भातील सर्व महत्त्वाच्या बातम्या.