Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. तसेच पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आल्याच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा आणि २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या मागण्यांसाठी आज नागपूर येथे ओबीसी समाजाकडून मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Live Updates
Maharashtra Mumbai News Live Updates : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
15:46 (IST) 10 Oct 2025
Nagpur OBC Reservation Protest Video : ओबीसींंच्या मोर्चात तुफान गर्दी, संविधान चौकात वाहतूक ठप्प!
मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत २ सप्टेंबर रोजी शासनाने जारी केलेला जीआर (शासन निर्णय) रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी आज नागपुरात ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. …सविस्तर वाचा
15:46 (IST) 10 Oct 2025
बीकेसी, नरिमन पॉईंटच्या धर्तीवर ठाण्यात उभे राहणार भव्य ग्रोथ सेंटर ! ग्रोथ सेंटरला समृद्धी महामार्गाची असणार जोडणी
ठाणे जिल्ह्यात आमने येथे समृद्धी महामार्गाची सुरुवात होते. याठिकाणी आता राज्य शासनाकडून एक मोठे ग्रोथ सेंटर उभारण्यात येत आहे. …सविस्तर बातमी
15:40 (IST) 10 Oct 2025
नवी मुंबई विमानतळ परिसरात सिडकोची कारवाई; नियोजनबद्ध विकासासाठी अनधिकृत बांधकामांवर गंडांतर
सिडकोकडून पाच किलोमीटरच्या परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची तयारी आहे, जेणेकरून विमानतळ परिसराचे सौंदर्य आणि सुरक्षितता अबाधित राहील. …वाचा सविस्तर
15:36 (IST) 10 Oct 2025
उल्हासनगर शहरात खड्डेभरणीला वेग; कोंडीमुक्त प्रवासाची आशा, डांबरीकरण सुरू
यंदा पाच महिने लांबलेला मोसमी पाऊस आणि त्यातही संततधार पावसामुळे सर्वच शहरातील डांबरी रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. उल्हासनगर शहरात बहुतांश डांबरी रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळाली. …सविस्तर बातमी
15:26 (IST) 10 Oct 2025
अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गिरवतायंत जर्मन भाषेचे धडे
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी ते विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी तयार व्हावेत यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिशा उपक्रम सुरु केला. …अधिक वाचा
15:19 (IST) 10 Oct 2025
प्रॅक्टिस चालत नसलेले वकील, आर्किटेक्ट सरकारकडे… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले…
शासकीय उपक्रमातील अभियंत्यांचे नितीन गडकरी यांनी कान टोचत म्हणाले, सरकारी अभियंते असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चल जाता है वृत्ती खूपच धोकादायक आहे. …अधिक वाचा
14:54 (IST) 10 Oct 2025
मोठी बातमी ! राज्यातील विद्युत कर्मचारी २४ तासातच संपावरून कामावर, कृती समिती म्हणते….
संप स्थगित झाल्याने राज्यावरील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका टळला आहे. या घडामोडीबाबत आपण जाणून घेऊ या. …सविस्तर वाचा
गुप्ते रस्ता हा बाजारपेठेचा भाग आहे. गेल्या दोन वर्षापासून घनश्याम गुप्ते रस्त्याची चाळण झाली आहे. …वाचा सविस्तर
14:34 (IST) 10 Oct 2025
मुंबई महानगरपालिकेतील १५०० शिक्षकांची दिवाळी होणार गोड; भविष्य निर्वाह निधीसह निवृत्ती वेतनाचा मार्ग मोकळा
मुंबई महानगरपालिकेने २००७ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार डीसी-१ ही निवृत्ती योजन लागू केली. …वाचा सविस्तर
14:34 (IST) 10 Oct 2025
लढल्या शिवाय काही मिळत नाही…..दि. बा. पाटील यांच्या वक्तव्याची पुन्हा उजळणी… भूमिपत्रांमध्ये तीव्र प्रतिक्रिया.
केंद्र आणि राज्य सरकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाची घोषणा करणार याकडे भूमीपुत्रांचे लक्ष लागून राहिले आहे. …सविस्तर बातमी
14:32 (IST) 10 Oct 2025
वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; १४, १५ ऑक्टोबर रोजी सरकारसोबत होणार चर्चा
महावितरण, महापारेषण, महानिर्मितीचे अधिकारी- कर्मचारी विद्युत क्षेत्रातील खाजगीकरणासह इतर मागणीसाठी बुधवारी मध्यरात्री १२ वाजतापासून संपावर गेले होते. ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांच्या संपाला सुरवात केली होती. अखेर हा संप मागे घेण्यात आला आहे. सरकारने वाटाघाटी करण्यासंदर्भात अनुकूलता दाखवल्याने संप स्थगित करण्यात आला. मागण्यांसदर्भात १४, १५ ऑक्टोबर रोजी सरकारसोबत कर्मचाऱ्यांची चर्चा पार पडणार आहे.
14:24 (IST) 10 Oct 2025
Nagpur OBC Protest : ओबीसी प्रश्नावरून लक्ष्मण हाके यांचे विखे पाटील यांना नागपुरातून आव्हान
विखे पाटील यांनी ओबीसींच्या हितासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेसमोर त्यांचा निषेध केला जाईल, असा इशाराही हाके यांनी दिला आहे. …वाचा सविस्तर
14:13 (IST) 10 Oct 2025
Video: आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्ताने तमन्ना भाटिया, विक्रांत मेस्सीचा खास संदेश; म्हणतात…
विजयादशमीच्याच दिवशी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने संघाने नुकताच आपला शताब्दी सोहळा साजरा केलेला आहे. …वाचा सविस्तर
जयस्वाल केवळ विकासकामच नव्हे तर अधिकाऱ्यांवरही दबाव टाकत असल्याचा आरोप आत्राम यांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. …सविस्तर वाचा
डॉ. तायवाडे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर रोजी जो निर्णय (जीआर) जाहीर केला, त्यामध्ये ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही. …सविस्तर बातमी
13:12 (IST) 10 Oct 2025
Nagpur OBC protest : अभूतपूर्व! एक हजार बसेस अन् ५ हजार चारचाकी, ६० हजारांवर ओबीसी रस्त्यावर; एकच मागणी, जरांगे…
एक हजाराहून अधिक बसेस, पाच हजाराहून अधिक चार चाकी वाहनाने आंदोलन नागपुरात दाखल झालेले आहेत. …सविस्तर बातमी
13:08 (IST) 10 Oct 2025
मध्यवर्ती कारागृहातून चार दिवसांत सहा मोबाईल जप्त, ‘सुरक्षा’ वारंवार भेदली..
गेल्या चार दिवसांत कैद्यांकडून तब्बल सहा अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आल्याने कारागृहाच्या कार्यप्रणालीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. …सविस्तर बातमी
13:07 (IST) 10 Oct 2025
अजित पवार गटाकडून शरद पवार गटाचे नेते अरूण गुजराथी यांची मनधरणी…?
जिल्ह्यात राष्ट्रवादीला (शरद पवार) अलीकडे मोठी गळती लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. …अधिक वाचा
13:00 (IST) 10 Oct 2025
“शेतकऱ्यांचा नाद करू नका, अन्यथा…”, बाबासाहेब पाटलांच्या कर्जमाफीबद्दलच्या विधानानंतर रोहित पवारांची थेट इशारा
‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडून येण्यासाठी आश्वासन द्यावी लागतात,’’ असं वक्तव्य करून राज्याच्या सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं. हे अत्यंत संतापजनक विधान आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद नाहीय तर नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं शेतकरी उध्वस्त झालाय, त्यामुळं कर्जमाफी करून दिलासा द्यावा, ही शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.
मंत्री महोदयांच्या अहमदपूर मतदारसंघात अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं. त्या भागात मी स्वतः दौरा केलाय. या भयानक संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी कर्जमाफीची अपेक्षा तिथल्या शेतकऱ्यांनी केली होती. यात तुम्हाला ‘नाद’ दिसत असेल तर हे दुर्दैव आहे. या राज्यकर्त्यांना मला एकच सांगायचंय शेतकऱ्यांचा नाद करू नका, अन्यथा खूप महागात पडेल…! , अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.
‘‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडून येण्यासाठी आश्वासन द्यावी लागतात,’’ असं वक्तव्य करून राज्याच्या सहकारमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं. हे अत्यंत संतापजनक विधान आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद नाहीय तर नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या चुकीच्या… pic.twitter.com/WbmibXqyiO
पत्नी ज्या मुलासोबत पळून गेली, त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने चिडलेल्या पतीने आपल्या मित्रांसह पत्नीच्या प्रियकराच्या वडिलांचा खून केला. …सविस्तर बातमी
12:38 (IST) 10 Oct 2025
‘त्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या लाभाची वसुली…बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय! होणार काय?
दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. …सविस्तर बातमी
12:23 (IST) 10 Oct 2025
पक्षांतर्गत वैर विसरून ओबीसींसाठी काँग्रेस नेते एकवटले! वडेट्टीवार-धानोरकर एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता….
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे संकेत दिले असून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील सहभागी होण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. …वाचा सविस्तर
12:19 (IST) 10 Oct 2025
म्हाडा अभियंत्याला ४० हजारांची लाच घेताना अटक… कारवाई न करण्यासाठी मागितली ४ लाखांची लाच
तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. …सविस्तर बातमी
12:18 (IST) 10 Oct 2025
माझ्याशी लढायची ताकद नाही..म्हणून माझ्या आईला मध्ये आणत आहेत… – आमदार रोहित पवार भाजपावर संतापले
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार) आमदार रोहित पवार यांच्या आईचा एका कार्यक्रमातील निलेश घायवळ समवेतचा फोटो समाजमाध्यमांवर टाकून रोहित पवार यांना लक्ष्य करण्यात आले होते. …वाचा सविस्तर
म्हाडा रिक्त घरांची विक्री ‘प्रथम प्राधान्य’ तत्वाने करण्यावर भर देत आहे. त्यानुसार कोकण आणि पुणे मंडळातील हजारो घरांची या तरतुदीनुसार विक्री सुरू आहे. …वाचा सविस्तर
12:08 (IST) 10 Oct 2025
वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयात बॉम्बची अफवा… अज्ञात ई-मेल धारकाचा शोध सुरू
न्यायालय परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, तपासात कोणतेही स्फोटकं अथवा संशयास्पद गोष्ट आढळली नाही. …वाचा सविस्तर
12:08 (IST) 10 Oct 2025
गोवंडीतील जैववैद्यकीय कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पाचे अद्याप स्थलांतर नाहीच… स्पष्टीकरण देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
महापालिका एन्व्होक्लेन प्रायव्हेट लिमिटेडसह हा प्रकल्प राबवत आहे. तथापि, प्रदूषणाच्या कारणास्तव हा प्रकल्प स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले होते. …अधिक वाचा
12:07 (IST) 10 Oct 2025
अश्लील संदेश ‘मस्करीत’ पाठवले, पण परिणाम गंभीर; अल्पवयीन विद्यार्थिनीवर पोक्सोखाली गुन्हा
तक्रारदार अल्पवयीन मुलीला अज्ञात भ्रमणध्वनी क्रमांकावरून संदेश येत होते. त्यात, तिच्या प्रेमात पडल्याचा दावा करणाऱ्या अश्लील संदेशांचा समावेश होता. …सविस्तर बातमी
Maharashtra Mumbai News Live Updates : दिवसभरातील सर्व