Maharashtra News Highlights: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रमुख वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेल्या ‘देवाभाऊ’ या जाहिरातीचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ही जाहिरात नेमकी कोणी दिली यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच परकीय थेट गुंतवणुकीत (एफडीआय) महाराष्ट्राला मागे टाकून कर्नाटकने पहिला क्रमांक पटकाविला आहे. केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) आकडेवारीचा हवाला देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात आज सरकारकडून भूमिका जाहीर केली जाते का हे पहावे लागणर आहे. याबरोबरच राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील नजर असणार आहे.

Live Updates

Marathi News Live Updates :  मुंबईसह राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या घडामो़डी वाचा एका क्लिकवर…

13:59 (IST) 8 Sep 2025

नाशिकच्या खड्ड्यांचा गिरीश महाजन यांना अधिक त्रास; महायुतीचे स्थानिक आमदार, पदाधिकारी…

सत्ताधारी महायुतीकडून कोणीही खड्ड्यांविषयी आवाज उठविण्यासाठी पुढे आले नसल्याने नाशिकची गणेश विसर्जन मिरवणूकही खड्डेमय रस्त्यांतूनच नेण्याची वेळ आली. …सविस्तर वाचा
13:35 (IST) 8 Sep 2025

Navi Mumbai Metro Passengers : नवी मुंबई मेट्रोने २० महिन्यात १ कोटी प्रवाशांचा प्रवास नोंदवला

Navi Mumbai Metro 1 Crore Passengers: १७ नोव्हेंबर २०२३ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश सिडकोला दिले. …सविस्तर बातमी
13:35 (IST) 8 Sep 2025

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नोकर भरतीसाठी मंगळवारपासून परीक्षा

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment Exam : कल्याण डोंबिवली पालिकेतील २१ संवर्गातील ४९० पदांसाठी सरळसेवेने नोकर भरती करण्यात येणार आहे. …अधिक वाचा
13:31 (IST) 8 Sep 2025

पिंपरी- चिंचवड: संगीता वानखडे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल; मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्याबद्दलच वक्तव्य..

मराठा नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आणि मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या संगीता वानखेडे यांच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी तक्रार दिली आहे. वानखेडे या सतत मराठा बांधव आणि आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप ही सतीश काळे यांनी केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर अनके मराठा बांधव आणि भगिनी जमल्या होत्या. “रविवारी मराठा बांधव आणि भगिनी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांची तक्रार घेण्यात आली आहे. मराठा समाजाबद्दल त्यांनी काही विधान केलेलं आहे.” –बापू बांगर- पोलीस उपायुक्त

13:25 (IST) 8 Sep 2025

भंडारा : भरधाव कारची ई-रिक्षाला धडक; ९ महिला मजूर जखमी

मोहघाटा येथील महिला मजुर हे साकोली शेतशिवारात पोद्दार शाळेजवळ एका शेतात निंदणाच्या कामाला आले होते. …वाचा सविस्तर
13:16 (IST) 8 Sep 2025

नागपूरमध्ये १३० वर्ष जुनी भिंत कोसळली… ३ कार दबल्या…

नागपुरातील एम्प्रेस मिल परिसरातील घटनास्थळी भिंत कोसळताना एवढा मोठा आवाज झाला की, परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. …अधिक वाचा
13:07 (IST) 8 Sep 2025

गडकरी म्हणाले, “मी सरकारमध्ये असलो तरी सांगतो, सरकार सोबत जोडून कुठलेही काम करू नका”

भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर केवळ ‘सोन्याची चिडीया’ बनून हे शक्य नाही. तर त्याला गुरूत्व दाखवावे लागेल. …सविस्तर बातमी
12:57 (IST) 8 Sep 2025
मराठा आरक्षणाच्या मुंबईतील लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत; नागरिकांकडून जल्लोषात स्वागत

मुंबईतील उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पहिल्यांदाच जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. यावेळी फुले आणि गुलालाची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.

12:49 (IST) 8 Sep 2025

कामोठ्यातील खूनप्रकरणाचा शेवट; ६ वर्षानंतर फरार आरोपी अटकेत

जुई गावातील एका भाड्याच्या घरात मनोहर सरोदे आणि त्याची पत्नी आणि मुले असे कुटूंबिय राहत होते. ४ डिसेंबर २०१९ रोजी मनोहरने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला रॉकेल ओतून पेटवून टाकले. …सविस्तर बातमी
12:21 (IST) 8 Sep 2025

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याबाबत मोठी अपडेट! दीक्षाभूमी स्मारक समिती म्हणते…

यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र, दीक्षाभूमी परिसरात सोहळ्याची तयारी सुरू झालेली नाही. …वाचा सविस्तर
12:08 (IST) 8 Sep 2025

परळीत पुन्हा झळकले वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर

बीड – जिल्ह्यात लावण्यात येणाऱ्या बॅनरवर अनधिकृत मजकूर, गुन्हेगारांचे फोटो छापण्याबाबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आदेश जारी केले होते. हा आदेश 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे उल्लंघन परळीत केल्याचे दिसून आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याचा फोटो ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा बॅनरवर तसेच स्वागत कमानीवर झळकल्याचे दिसून आले आहे. या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा देखील फोटो दिसून येत आहे.

विशेष म्हणजे हे बॅनर शहर पोलीस व संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या समोरच्या भागातच लावण्यात आले असून, येथूनच हाकेच्या अंतरावर नगरपरिषद देखील आहे. आता यावर जिल्हाधिकारी व प्रशासन काय कारवाई करते ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

11:55 (IST) 8 Sep 2025

गणेश मूर्तींसंदर्भातील ‘धिवरे पॅटर्न’ची चर्चा

धुळे शहरातील बहुतेक भाग संवेदनशील आणि काही भाग अतीसंवेदनशील आहे. यामुळे प्रामुख्याने दोन्ही समाजांवर आणि काही कार्यक्रमांवर पोलिसांना विशेष लक्ष केंद्रित करावे लागते. …अधिक वाचा
11:35 (IST) 8 Sep 2025

नागपूर : दागिने चोर नोकर पश्चिम बंगालमध्ये सापडला

गणेशपेठ पोलीस हद्दीत गितांजली चौकातील सारडा निकेतन संकुलात दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. …अधिक वाचा
11:30 (IST) 8 Sep 2025

Railway Jobs in Nagpur Division: रेल्वेमध्ये ३० हजार जागांवर जम्बो भरती, बारावी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी…

Nagpur Railway Recruitment 2025 : रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरअरबी) द्वारे एनटीपीसी भरती २०२५ अंतर्गत ३०हजार पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
11:12 (IST) 8 Sep 2025

संघर्षाच्या दहशतीचे विघ्न हरले ; नागपुरात विसर्जन शांततेत

गणपती विसर्जनानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून ढोल ताशांच्या गजराने अवघी उपराजधानी निनादून गेली आहे. …सविस्तर बातमी
10:51 (IST) 8 Sep 2025

घर खरेदीदारांसाठी आनंदवार्ता… ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ दरम्यानच्या काळात महारेराने…

महारेराने ऑक्टोबर २४ ते जुलै २०२५ या दरम्यान घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत तब्बल ५,२६७ तक्रारी निकाली काढल्या आहेत. …अधिक वाचा
10:18 (IST) 8 Sep 2025

देवाभाऊसाठी दररोज ५० कोटी खर्च करणारा दानशूर कोण? फडणवीसांच्या जाहिरातीबाबत संजय राऊतांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘देवाभाऊ’ असा आशय असलेल्या जाहिरातीवरून सध्या राज्यात राजकारण चांगलेच पेटले आहे. राज्यातील सर्व अग्रणी मराठी व इंग्रजी दैनिकांसह टीव्हीवरील चॅनल्सवर दिलेल्या या जाहिराती फडणवीसांना न सांगता दिल्या का? यावर बोलताना संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “याबद्दल मला माहिती नाही. या जाहिरातीवर ५० कोटी रुपये खर्च झाला आणि तो अज्ञात व्यक्तीने केला आहे. ही अज्ञात व्यक्ती कोण? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती असले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल होर्डिंग्ज, वृत्तपत्रात हिंदी, मराठी, इंग्रजी अशा सर्व भाषेतील जाहिराती… टीव्हीवरील जाहिराती, हा साधारण एका दिवसाचा खर्च ५० कोटी आहे. हा दाता कोण आहे? हा दानशूर कर्ण कोण आहे? जो देवाभाऊसाठी रोज ५० कोटी खर्च करतो आहे आणि त्याचा भाजप आणि सरकारकडून असा काय लाभ झाला आहे की तो अशी जाहिरातबाजी करतो आहे?” असे प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.