Maharashtra Politics : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याला हात लावू देणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला दिला आहे. मंदिराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली इथले पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व नष्ट होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करु असंही आव्हाड म्हणाले आहेत. आता या आरोपांना सरकार काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. मनोज जरांगेंनी २७ ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत येणार आणि मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार असं म्हणत आंदोलनाची हाक दिली आहे. २७ ऑगस्टला आम्ही गाडीवर गणपती बसवणार. मुंबई आमचीही आहे आम्ही विसर्जनासाठी मुंबईतल्या अरबी समुद्रावर येणार असंही जरांगे म्हणाले आहेत. तसंच मी ठरवून आणि मॅनेज आंदोलन करत नाही असंही जरांगेंनी म्हटलं आहे. दादर येथील कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे. यानंतर जैन मंदिराचं दार बंद करण्यात आलं आहे. यासह महत्त्वाच्या बातम्या आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Live Updates

Mumbai Maharashtra  दादर कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीची आंदोलनाची हाक, यासह महत्त्वाच्या बातम्या

20:32 (IST) 13 Aug 2025

क्रिकेटवीर सुनील गावसकर यांना व्दिशतकापेक्षा मोठा आनंद कशात वाटतो…

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टने हृदयविकाराने त्रस्त मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी उभारलेल्या १० कोटी रुपयांचा निधीतून ६१९ बालकांवर शस्त्रक्रीया करता आल्याने रोटरी क्लब संस्थेच्या कार्याविषयी क्रिकेटवीर गावसकर यांनी कौतुक केले.   …सविस्तर वाचा
20:14 (IST) 13 Aug 2025

गणेशोत्सवासाठी नवी मुंबई पालिका सज्ज; आयुक्तांकडून सुव्यवस्थेचे निर्देश

नवी मुंबईत श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि सुनियोजित साजरा व्हावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यावतीने विविध निर्देश श्रीगणेशोत्सव मंडळांच्या नियोजन बैठकीत देण्यात आले आहेत. …सविस्तर वाचा
20:11 (IST) 13 Aug 2025

मांस विक्रीवरून शिंदेसेनेच्या आमदाराची अजित पवारांना साथ; म्हणाले, “प्रत्येकवेळी खाटिक समाजावर अन्याय का?”

स्वातंत्र्य दिनी राज्यात मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर ते -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत असल्याची टीका केली आहे. …अधिक वाचा
20:10 (IST) 13 Aug 2025

अवजड वाहनबंदीचा उद्योगांना फटका; उद्योगाच्या पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे

पिंपरी-चिंचवड शहरालगत चाकण, भोसरी, म्हाळुंगे, तळेगाव दाभाडे, रांजणगाव अशा प्रमुख औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणच्या हजारो कंपन्यांमध्ये कच्चा माल आणणे आणि तयार झालेला माल नेण्यासाठी रस्त्यामार्गे वाहतूक केली जाते. …अधिक वाचा
19:54 (IST) 13 Aug 2025

उत्सवकाळातील रक्तदान शिबिरांवर चाप; अतिरिक्त रक्त संकलित न करण्याचा एसबीटीसीचा रक्तपेढ्यांना इशारा

स्वातंत्रदिन, गणेशोत्सव व नवरात्रौत्सव या कालावधीत अनेक मंडळे, राजकीय नेते, धार्मिक संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्त संकलित केले जाते. …अधिक वाचा
19:41 (IST) 13 Aug 2025

गडचिरोली : खाणप्रभावीत क्षेत्रासाठी १५० कोटींच्या खनिज निधीचे नियोजन, ४० किमी परिसरातील दुर्गम गावांचा कायपालट होणार…

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पदभार स्वीकारताच जवळपास १५० कोटींची प्रस्तावित कामे रद्द केली होती. …सविस्तर बातमी
19:29 (IST) 13 Aug 2025

नव्या पाटीसाठी जादा पैसे? ‘एचएसआरपी’ला मुदतवाढ, की जादा दंड आकारणी, याचा निर्णय राज्य शासनाकडे

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्याबाबत परिवहन विभागाकडून डिसेंबर २०२४ मध्येच आदेश काढून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. …सविस्तर बातमी
19:29 (IST) 13 Aug 2025

“मी काँग्रेसमधून बाहेर पडण्यास हे सर्व कारणीभूत…”, प्रतिभा शिंदेंनी थेट नावे घेतली

जळगावमध्ये एका वृत्त वाहिनीशी बोलताना प्रतिभा शिंदे यांनी आपल्या राजीनाम्याची कारणीमिमांसा करताना काँग्रेसमधील राज्याच्या धुरिणांवर जोरदार टीका केली. …सविस्तर वाचा
19:09 (IST) 13 Aug 2025

पुण्यातील वीजवितरण क्षेत्रात आता थेट टाटांची उडी!

टाटा पॉवरने स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष योजना जाहीर केली आहे. …सविस्तर वाचा
19:05 (IST) 13 Aug 2025

सिंधुदुर्ग:​करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

सावंतवाडी : गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली असून, यामुळे सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्ते बंद झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

​तरेळे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ चेकनाका ते भट्टीवाडी स्टॉपदरम्यान रस्त्यावर दरडीचा मोठा भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार आर. बी. वेल्हाळ कंपनी यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे दोन्ही बाजूला अडकलेल्या वाहनांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

18:57 (IST) 13 Aug 2025

शालार्थ आयडीसाठी आता ई-ऑफिसचा वापर बंधनकारक; शिक्षण आयुक्तांचे निर्देश

सुधारित कार्यपद्धतीनुसार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्तावासह मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनाने शालार्थ मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील. …अधिक वाचा
18:46 (IST) 13 Aug 2025

सरन्यायाधीश गवई आणि कवाडेंची दिल्लीत भेट; आंबेडकर यांची टीका अन् भेटीची वेळ…

भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर आंबेडकरी समाजातील एक नवीन वादाचा विषय समोर आला आहे. …अधिक वाचा
17:56 (IST) 13 Aug 2025

स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात संताप… मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात २.७८ लाखाहून अधिक मीटर…

राज्यातील औद्योगिक ग्राहकांना मर्यादित असलेली ‘टाईम ऑफ डे’ वीजदर सवलत १ जुलैपासून घरगुती ग्राहकांनाही लागू झाली आहे. …सविस्तर वाचा
17:31 (IST) 13 Aug 2025

पालघरमधील शेकडो खलाशी पोटासाठी गुजरातकडे रवाना; जीव धोक्यात घालून करतात मासेमारी

महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये अधिक पगार आणि चांगल्या सोयी सुविधा मिळत असल्याने पालघर मधील खलाशांचा ओढा गुजरातच्या दिशेने वाढत असल्याचे दिसून येत आहे. …अधिक वाचा
17:12 (IST) 13 Aug 2025

नागपूर: सेतूबंधन प्रकल्पाअंतर्गत रेल्वे उड्डाणपुलाचे काम; छत्तीसगडला जाणारी गाडी १७, १८ ऑगस्टला रद्द

रेल्वेने मानवरहित रेल्वे क्रॉसिंग संपवण्याचा आणि त्यानंतर रेल्वे क्रॉसिंग ही संकल्पनाचा बाद करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गंत रेल्वे भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. …अधिक वाचा
17:00 (IST) 13 Aug 2025

‘एचएसआरपी’ मुदत दोन दिवसांवर, अमरावतीत ८३ टक्के वाहनांवर अजूनही जुन्याच नंबरप्लेट

जिल्ह्यात एप्रिल २०१९ पुर्वी नोंदणी झालेली सुमारे ४ लाख ६५ हजार ४९० इतकी वाहने आहेत. …सविस्तर वाचा
16:39 (IST) 13 Aug 2025

“आम्ही काय खायचं हे सरकार ठरवणार का?”, सुप्रिया सुळेंचा सवाल; स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीबाबत मांडली भूमिका

राज्यातील काही महापालिकांनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे. स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा निर्णय काही महापालिकांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. या निर्णयावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आम्ही काय खायचं हे आता सरकार ठरवणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

16:38 (IST) 13 Aug 2025

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…

केंद्र सरकारने २०१९ पूर्वीच्या सगळ्याच संवर्गातील वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले आहे. …सविस्तर बातमी
16:37 (IST) 13 Aug 2025

आज डावखुऱ्यांचा दिवस, अशा व्यक्तीची तुम्हाला माहिती आहे का? ते मेंदूच्या उजव्या बाजूचा….

डाव्या हाताच्या व्यक्तींची खासियत आणि वेगळेपण साजरं करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस’ साजरा केला जातो. …अधिक वाचा
16:29 (IST) 13 Aug 2025

कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसवण्यास ४३ लाखांचा खर्च; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कार्यवाही

कृष्णा पुलावरून गेल्या काही वर्षांत अनेकांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या तसेच नदीत निर्माल्य टाकल्याच्या घटनांमुळे हे आत्महत्यांचे केंद्र (सुसाईड पॉईंट) म्हणून ओळखू जाऊ लागले. …सविस्तर बातमी
16:25 (IST) 13 Aug 2025

यूपीएससी, एमपीएससी, लष्कर भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

राज्यातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व प्रतिष्ठित सेवांच्या दिशेने वाट मोकळी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. …अधिक वाचा
16:17 (IST) 13 Aug 2025

बालाघाट जिल्ह्यातील रामपायली तालुक्यात वैनगंगा नदीत ३ तरुण बुडाले

मंगळवारी सायंकाळी या घटनेची बातमी गावात पसरली, त्यामुळे गावकऱ्यांचा जमाव नदीकाठी जमला. …अधिक वाचा
16:16 (IST) 13 Aug 2025

“…तर आम्ही एकत्र येण्याचा विचार करू”, अजित पवारांबाबत शरद पवारांच्या नेत्याचं मोठं विधान; पण ठेवली ‘ही’ अट

Rohit Pawar On Ajit Pawar and Sharad Pawar NCP : महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगताना पाहायला मिळतात. या चर्चांचं कारण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून करण्यात येणारे सूचक विधाने. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लावले जातात. तसेच या चर्चांमागचं आणखी एक कारण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे अनेकदा एका व्यासपीठावर आल्याचंही पाहायला मिळालं होतं. एवढंच नाही तर दोघांमध्ये अनेकदा संवादही झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासंदर्भात काही नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जातात.

सविस्तर वाचा

15:59 (IST) 13 Aug 2025

भंडारा : बेड्या ठोकलेल्या मनगटांवर बांधली राखी; कारागृहातील रक्षाबंधनाने कैदीही भारावले

बहिण भावाच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक समजला जाणारा रक्षाबंधन हा सण भंडारा जिल्हा कारागृहात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. …सविस्तर वाचा
15:52 (IST) 13 Aug 2025

धक्कादायक! स्लॅब टाकतांना १४ मजुरांना विजेचा धक्का , अल्पवयीन मजुराचा…

जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या वडगाव रोठे गाव येथील रहिवासी वसंता बरिंगे यांच्या घरी स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. …सविस्तर वाचा
15:39 (IST) 13 Aug 2025

रोहित पवार हे तर बेकायदेशीर… माजी खासदार कडाडले आणि म्हणतात….

राज्य कुस्तीगीर परिषद पुन्हा एकदा वादाच्या वाळणावर गेली आहे. राज्यातील या बलाढ्य संघटनेवर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व राहले. …सविस्तर बातमी
15:23 (IST) 13 Aug 2025

भात, मक्याचे क्षेत्र वाढले, तेलबियांचे घटले; जाणून घ्या, देशात खरीप पेरण्याची स्थिती

गतवर्षी ९५७.१५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदाच्या खरीप हंगामात अकरा ऑगस्टअखेर ९९५.६३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. …सविस्तर बातमी
14:51 (IST) 13 Aug 2025

पोलिसांनी हीच तत्परता कबुतरखान्याच्या आंदोलनाच्या वेळी का दाखवली नाही… मराठी एकीकरण समितीचे १५ ते २० कार्यकर्ते आंदोलनापूर्वीच ताब्यात

आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. सकाळी ११ नंतर आंदोलक जमू लागले, यानंतर तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. …वाचा सविस्तर
14:38 (IST) 13 Aug 2025

आंध्र प्रदेशमधील किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मोसमी पावसाचा जोर वाढणार

यामुळे राज्यात महिनाअखेरीस चांगल्या पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून घाटमाथ्यावर आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडेल. …वाचा सविस्तर
14:24 (IST) 13 Aug 2025

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडणारे थर रचले जाणार, मालाडमधील (पूर्व) शिवसागर गोविंदा पथकाकडून देखावा

चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडला जाणार आहे. त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून बलिदानापर्यंतचा इतिहास मांडला जाणार आहे. …सविस्तर बातमी

 

दादर कबुतरखाना व्हिडीओ (फोटो – dadarmumbaikar / Insta)

 

दादर येथील कबुतरखान्याबाहेर मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार आहे.