Maharashtra News Updates, 25 August 2025: राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांनी या दृष्टने तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आज मुंबई विभागाचे अध्यक्ष म्हणून आमदार अमित साटम यांची नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री अशिष शेलार यांच्या उपस्थितित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

याचबरोबर गेल्या १० दिवसांपासून राज्यात सुरू असलेला पाऊस हळू हळू कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. पण, मुंबईत मात्र अजूनही जोरदार पाऊस कोसळत आहे. आज, मुसळधार पावसामुळे विले-पार्लेत वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच सततच्या पावसामुळे सध्या हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे आणि विमान सेवेवर किरकोळ परिणाम होत आहे, त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सने सोमवारी मुंबईतील विमानांसाठी प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. यासह राज्यातील विविध घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Mumbai Breaking News Live Update

11:09 (IST) 25 Aug 2025

प्रभाग रचनेवरून महायुतीमध्ये धुसफुस, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरघोडीचे प्रयत्न

मुंबई वगळता अन्य २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. मुंबईत २२७ प्रभाग कायम ठेवण्यात आल्याने प्रभागांच्या रचनेत फारसे बदल झालेले नाहीत. …सविस्तर वाचा
11:08 (IST) 25 Aug 2025

“नाचता येईना अंगण वाकडे…” गिरीश महाजन यांचा ठाकरे बंधुंना टोला

भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे बंधुंवर सडकून टीका केली आहे. तसेच नाचता येईना अंगण वाकडे, अशी त्यांची अवस्था झाल्याचा खोचक टोला त्यांनी दोघांना हाणला आहे. …अधिक वाचा
11:07 (IST) 25 Aug 2025

वाहतुक कोंडी टाळण्‍यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत; मुंबई गोवा महामार्गावर पोलिस प्रशासन सज्ज ….

एआय तंत्रज्ञानाची मदत घेण्‍यासाठी मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा आणि खोपोलीकडून येणारया मार्गावर पाली या ठिकाणी ए आय कॅमेरे बसवण्‍यात आले आहेत. …वाचा सविस्तर
11:01 (IST) 25 Aug 2025

Marathi News Live Updates : मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष: देवेंद्र फडणवीस

अमित साटम यांची मुंबई भाजपा अध्यक्ष म्हणून घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सिद्ध केले की, आम्हीच मुंबईतील सर्वात मोठा पक्ष आहोत. मुंबई भाजपाची जबाबदारी एका नवीन नेत्याकडे सोपवण्यात आली आहे, सर्वांनी एकत्रितपणे अमित साटम यांचे नाव निवडले आहे.”

गेल्या १० दिवसांपासून राज्यात सुरू असलेला पाऊस हळू हळू कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. पण, मुंबईत मात्र अजूनही जोरदार पाऊस कोसळत आहे. आज, मुसळधार पावसामुळे विले-पार्लेत वाहतूक विस्कळीत झाली होती.