Marathi News Updates : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने रविवारी ईश्वरी भिसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. ईश्वरी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले त्या दिवशी नेमके काय घडले, हे समितीने नातेवाइकांकडून जाणून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत आरोप केलेत. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये द्वंद्व सुरू आहे.
Mumbai-Maharashtra News Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
होय डॉक्टरांनी डिपॉझिट मागितले होते”, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची कबुली; म्हणाले, “त्या दिवशी…”
आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांना नाही. खर्चाचे अंदाजपत्रक प्रत्येक रुग्णाला दिला जातो. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही. त्यादिवशी कोणत्या कारणाने राहू केतू काय डोक्यात मध्ये आला, त्या डॉक्टरांनी चौकोनात १० लाखांचं डिपॉझिट लिहिलंय आहे. ही गोष्ट खरी आहे. यापैकी तुम्ही कोणालाही विचारू शकता. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असं लिहून दिलं नाही – डॉ. धनंजय केळकर,
राजीनाम्याने प्रश्न सुटत नाही. आम्हाला राजीनामा नकोय, आम्हाला कारवाई हवीय. घटनेचा अहवाल आलेला आहे, यात रुग्णालयाची चूक आहे हे समोर दिसतंय. त्यात पूर्णपणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. २४ तासांच्या आत कारवाई झाली पाहिजे. ही हत्या झालेली आहे – सुप्रिया सुळे
"हा देश संविधानाने चालतो आणि त्याच्यातील नियम-कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजेत, ही आमची आग्रहाची भूमिका आहे", असे परखड मत ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधताना… pic.twitter.com/bYFMGEXynR
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 7, 2025
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर
चंद्रपूर : कर्जमाफीची रक्कम शेतकरी लग्नसमारंभावर उधळतात,’’ अशा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या विधानानंतर विरोधात जिल्हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.मंत्री कोकाटे यांच्या विधाना विरोधात कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी आणि राज्य सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत निषेध व्यक्त केला आहे.
गर्भवती तनिशा भिसे मृत्यू प्रकरणी : डॉ.सुश्रुत घैसास यांचा राजीनामा
गर्भवती तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ.सुश्रुत घैसास यांनी 10 लाख रुपये भरण्यास सांगितले होते.त्यांच्या कुटुंबियांकडे पैसे नसल्याने त्यांना दुसर्या रुग्णालयात दाखल करावे लागले. उपचारमध्ये दिरंगाई झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.त्यामुळे घैसास डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी होत होती.त्यानंतर अखेर डॉ.सुश्रुत घैसास यांनी मंगेशकर हॉस्टीटलचा राजीनामा दिला आहे.या एकूणच प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन आज पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.
ना परीक्षा, ना मुलाखत, गुणवत्तेनुसार नोकरीची संधी; महानिर्मितीमध्ये १४० पदे…
अकोला : बेरोजगार उमेदवारांना महानिर्मिती कंपनीमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महानिर्मितीच्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रामध्ये विविध १४० पदांवर आयटीआय शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. उमेदवारांना ९ मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत महानिर्मितीच्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या आस्थापनेवर २०२५-२६ या सत्रासाठी आय.टी.आय. शिकाऊ उमेदवारांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
सविस्तर वाचा…
बांदा जवळील गाळेल येथे कालव्यात बिबट्या मृत अवस्थेत आढळला
सावंतवाडी : उष्णतेची लाट उसळली असल्याने पशु पक्षी पाणवठे शोधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राणी विहिरीत,कालव्यात कोसळल्याने वन विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जंगलात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात असलेल्या प्राण्यांना जीव गमवावे लागत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील बांदा गाळेल येथे कालव्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे.
रत्नागिरीत ७७ हजार ५०० रुपयाचा ब्राऊन हिरोईन सदृश पदार्थासह एकाला पकडले
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जयस्तंभ येथे ७७ हजार ५०० रुपयाचा ब्राऊन हिरोईन सदृश पदार्थासह एकाला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरीत रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने शहरात गस्त घालत असताना जयस्तंभ येथील खाना खजाना हॉटेल ठिकाणी एक इसम एका दुचाकी वाहनावर संशयित हालचाली करीत असताना दिसून आला. त्याचा संशय आल्याने त्याच्या ताब्यातील पिशवीची खात्री करण्याकरिता दोन पंचांना समक्ष बोलावून पोलिसांनी तपासणी केली.
स्वराज्याच्या राजधानीची सुरक्षा धोक्यात, रायगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही यंत्रणा नादुरूस्त
अलिबाग : रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण झाला असतांनाच, आता किल्ल्यावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची बाब समोर आली आहे. सीसीटिव्ही यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वराज्याच्या राजधानीची सुरक्षा धोक्यात आली आहे.
साधी रेल्वे पहिली नाही, आता थेट विमान प्रवास…. ४० विद्यार्थिनी निघाल्या ‘इस्रो’ भेटीला…
भंडारा : दुर्गम भागातील आणि अनेकदा परिस्थितीमुळे कित्येक प्रतिभावान विद्यार्थी सरकारी शाळेत शिक्षण घेतात. त्यांनी साधी रेल्वे कधी बघितली नसते. एवढेच काय तर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा ते कधी गेलेले नसतात. अशाच सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या ४० विद्यार्थिनीना थेट विमानात बसायला मिळणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच विमानातून प्रवास करून या विद्यार्थिनींना इस्रोची सारख्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप, तरुणांना प्रशासनासोबत कामाची संधी, ६० हजार रुपये मासिक वेतन
नागपूर : राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६’ जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षकेतर पदभरतीद्वारे २ हजार कोटींचे टार्गेट?, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप
अमरावती : खासगी अनुदानित शाळांमधील लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक इत्यादी शिक्षकेतर पदे सरळसेवा परीक्षेद्वारे न भरता नामनिर्देशाने भरण्यात येणार आहेत. याची स्पर्धा परीक्षा शासन स्वतः घेणार किंवा नाही याबद्दल अजूनही स्पष्टता नाही. म्हणजे संस्थाचालक भरगच्च पैसा घेऊन आपल्या मर्जीच्या व्यक्तीला नोकरी देणार आहेत का?, असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे.
चमकोगिरी भोवली! शस्त्रासह समाजमाध्यमात चित्रफित…
अमरावती : घातक शस्त्र बाळगून समाजमाध्यमात चित्रफिती प्रसारित करून चमकोगिरी करणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी अटक केली.संशयिताकडून धारदार कोयता आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.संशयित घातक शस्त्र बाळगून समाजमाध्यमात चित्रफिती प्रसारीत करीत होता.
सविस्तर वाचा…
सुवर्णवार्ता! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर निचांकावर
नागपूर : करोनानंतर सातत्याने सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे बघता- बघता हे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु मागील काही दिवसांपासून आता सोन्याचे दर घसरत आहे. दरम्यान आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (७ एप्रिल २०२५ रोजी) सोन्याचे दर आणखी घसरलेले दिसत आहे.
रेल्वेत तब्बल साडेसात लाख फुकटे प्रवासी, ५६ कोटींचा दंड
अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल साडेसात लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला. या फुकट्या प्रवाशांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ५६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. विविध रेल्वेस्थानकांसह गाड्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या आर्थिक वर्षात भुसावळ मंडळाने तिकीट तपासणी चमूद्वारे विविध तपासणी मोहिमांचे आयोजन केले. या मोहिमांच्या अंतर्गत, एकूण साडेसात लाख प्रकरणांमध्ये ५६ कोटीची रक्कम वसूल केली गेली.
तब्बल ३४० स्टार कासव निर्सगमुक्त !
चंद्रपूर :अवैद्य वन्यजीव व्यापारातून किंवा बंदीवासातून मुक्त करण्यात आलेल्या स्टार कासवांवर महाराष्ट्रातील कासव पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत उपचार जिवनदान देण्यात येते.अशाच ४४१ स्टार कासवांपैकी मध्य चांदा वनविभागांतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात आज शनिवारी (५ एप्रिल) ३४० स्टार कासवांवर उपचार करून निसर्गमुक्त करण्यात आले. महाराष्ट्र वनविभाग आणि रेस्क्यू (RESQ) चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात कासव पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये अवैध व्यापारातून किंवा बंदिवासातून मुक्त झालेल्या कासवांना ठवेल्या जाते.
बल्लारशाह-गोंदिया दुहेरी रेल्वेमार्गावरून श्रेयवाद; काँग्रेस, भाजप नेत्यांकडून दावे-प्रतिदावे
चंद्रपूर : बल्लारशाह-गोंदिया या चार हजार ८१९ कोटी रुपये खर्चाच्या २५० किलोमीटरच्या दुहेरी रेल्वेमार्गावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाचा भडका उडाला आहे.या कामाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या रेल्वेमार्गाला आपल्याच प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपचे माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी केला आहे. तर, काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व खासदार नामदेव किरसान यांनीही हे आपल्याच पाठपुराव्याचे फलित असल्याचे म्हटले आहे.
महापालिका, नगरपालिका आर्थिक संकटात, १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानाअभावी…
चंद्रपूर : मागील दीड-दोन वर्षांपासून स्थानिक महापालिका व नगरपालिकेला १५व्या वित्त आयोगाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. ही थकीत रक्कम ३० कोटींच्या घरात आहे. यामुळे महापालिका आणि नगरपालिका आर्थिक संकटात सापडली आहे. पैशांअभावी बहुसंख्य विकासकामे थंडबस्त्यात आहेत. जिल्ह्यातील अनेक नगर नगरपालिकांकडे वीज देयके भरण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे विकासकामे करायची कशी, असा प्रश्न महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
चंद्रपूर भाजपमध्ये आलबेल नाहीच! मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्याकडून…
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर भाजपमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून प्रत्येक कार्यक्रमाचे स्वतंत्ररित्या दोनवेळा आयोजन केले जात आहे. याचेच पडसाद भाजपच्या स्थापनादिनीही उमटले. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्याकडून भाजप स्थापनादिन दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात आला.
‘चमड्याचा बेल्ट लावलेला पुजारी चालतो, पण…’ संतप्त आमदाराने खडसावले; आता ऑडिट…
वर्धा :मंदीर प्रवेश नाकारण्याचे कृत्य आता देशभर गाजू लागले आहे. रामनवमीस व ते सुद्धा भाजपचा स्थापना दिन साजरा होत असतांना भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना वाईट अनुभव आला. देवळी त्यांचा गढ समजल्या जात असतांना देवळीतील जुने मंदीर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध राम मंदिरात तडस यांना गाभाऱ्यात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता.ही बाब उजेडात आणताच सर्वत्र संताप व्यक्त करणे सूरू झाले.
वन्यपर्यटकांसाठी आनंदवार्ता! “ताडोबा”साठी लवकरच “क्रूझर सेवा”…
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प जागतिक स्तरावरील पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. चंद्रपूरपर्यंत येणाऱ्या पर्यटकांना येथून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या अडचणी आता लवकरच दूर होणार असून पर्यटकांसाठी चंद्रपूरवरून ताडोबाला जाण्याकरिता “क्रूझर सेवा” सुरू केली जात आहे.
“साडेपाच तास तनिषा भिसेंवर कोणतेही उपचार झाले नाहीत, रक्तस्राव होत असताना…”, रुपाली चाकणकर यांनी सांगितला घटनाक्रम!
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला असून, अंतिम अहवालाविषयी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती दिली. या अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन
Mumbai-Maharashtra News Today, 7 April 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा