Maharashtra Breaking News Updates, 08 October 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज (बुधवार, ८ ऑक्टोबर) उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असून यानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित असतील. या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेल. या कार्यक्रमात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा, भाषणांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दुसऱ्या बाजूला, शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून दोन्ही गटांमध्ये (ठाकरे व शिंदे) चालू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याचा निर्णय आज होऊ शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडेही आपलं लक्ष असेल. यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वक्तव्यांचा आढावा आपण घेणार आहोत.
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
सावधान…पुण्यात बेकायदा फलक लावताय किंवा छापताय होईल ही कारवाई !
“दिल्लीतला लाल्या महाराष्ट्रातील नेत्यांना सांगतो…”, मनोज जरांगेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल; वडेट्टीवार म्हणाले, “लहान वयातील बाल्या…”
पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल… आकडेवारीतून आले समोर
Navi Mumbai Airport Inauguration: नवी मुंबई विमानतळाच्या उद्धाटनापुर्वी लोकनेते दि.बा.पाटीलांचे चिरंजीव काय म्हणाले?
Navi Mumbai Airport Inauguration: नवी मुंबई विमानतळाच्या उद्धाटनापुर्वी लोकनेते दि.बा.पाटीलांचे चिरंजीव काय म्हणाले?
नवी मुंबई विमानतळावर पहिली घोषणा कोणती होणार ? पंतप्रधानांच्या स्वागताची सज्जता कशी असेल…
नवी मुंबई विमानतळावर पहिली घोषणा कोणती होणार ? पंतप्रधानांच्या स्वागताची सज्जता कशी असेल…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबई विमानतळ उद्घाटन दौऱ्यापूर्वी सुरक्षेत वाढ; युनायटेड किंगडमचे पंतप्रधानही मुंबईत
नवी मुंबई विमानतळ आधी या ठिकाणी होणार होते…मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे राज्यसरकारने जागा बदलली
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर स्थानिकांना काम मिळणार का ? काय म्हणाले दिबांचे सुपुत्र…
शिवसेना विरुद्ध शिवसेना सुनावणी पुढे ढकलली, ‘धनुष्यबाणा’चा निर्णय आता १२ नोव्हेंबरला
शिवसेना विरुद्ध शिवसेना सुनावणी पुढे ढकलली, ‘धनुष्यबाणा’चा निर्णय आता १२ नोव्हेंबरला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वकिल कपिल सिब्बल यांनी पुढची तारीख मागितली होती. न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी ही मागणी मान्य करत १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचं जाहीर केलं.
नवी मुंबई विमातळामुळे अटलसेतुला जोडणाऱ्या जासई मार्गिकांची आवश्यकता ; विधानसभेत प्रश्न उपस्थित करूनही प्रतिक्षाच
लबाड मुख्यमंत्री, खोटारडे पंतप्रधान?, मोदींच्या निकटवर्तीयांच्या घशात मुंबई घालायची आहे का ? हर्षवर्धन सकपाळ काय म्हणाले …
ओमानमध्ये अडकलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुटका; नोकरीच्या शोधात गेले होते परदेशात
भूषण गवई यांच्यावरील हल्ला; कोल्हापूर, इचलकरंजीत निदर्शने
गुंड टिपू पठाणचे बँक खाते गोठविले; जमीन व्यवहाराच्या कागदपत्रांसह, मोटार, गृहोपयोगी वस्तू जप्त
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या व्हीआयपीसाठी हे रुग्णालय केलय आरक्षित….. आरोग्यव्यवस्थेची मदार कोणाच्या खांद्यावर?
समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजना आता ‘एका’ क्लिकवर; पिंपरी महापालिकेकडून वेबपेजचे अनावरण
न्यायालयातून पसार झालेला आरोपी गजाआड; वेशभूषेत बदल करुन पोलिसांना गुंगारा
हिंजवडी आयटी पार्कमध्ये बड्या आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना डांबून जबरदस्तीने राजीनामे
पुण्याचा अपघातांचे सत्र सुरूच: कोंढवा, हडपसरमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू
वैभव नाईक प्रकरणी मराठा समाज एकजूट; अटकेविरोधात कोल्हापूर खंडपीठात जाण्याचा इशारा
मिरजेत वादग्रस्त वक्तव्यामुळे दोन गटांत तणाव; दगडफेक, पोलिसांचा लाठीमार
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आधुनिकतेचा साज
नवी मुंबई विमानतळामुळे पुण्यातील आयटी, औद्योगिक क्षेत्रांत चालना… गुंतवणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
सांडपाणी प्रक्रिया, पुनर्वापर धोरण जाहीर; ४२४ नागरी संस्थांना लाभ होणार, मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई: राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. या धोरणाच्या अंमजबजावणीसाठी नगरविकास विभाग समन्वयक म्हणून काम करेल. त्यासाठी या विभागाला ५०० कोटी देण्याच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.
न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा प्रयत्न, हल्लेखोरांवर कारवाई करा; सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याविरोधात काँग्रेसची निदर्शने
मुंबई: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच वकिलाने केलेला हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे व्यक्तीवरचा किंवा पदावरचा हल्ला नाही, तर तो संविधानावरचा हल्ला आहे. देशात सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय. हा न्यायव्यवस्थेलाच धमकावण्याचा प्रयत्न असून हल्लेखोरांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करा, अशी मागणी करीत काँग्रेसकडून मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.
मुंबई मेट्रो-३ च्या अखेरच्या टप्प्याचं आज लोकार्पण, आरे ते कफ परेड भाडं किती? कसं असेल वेळापत्रक?
आरे ते आचार्य अत्रे चौकापर्यंतची (२२.४६ किमी) मेट्रो सेवा सध्या चालू असून यासाठी १० रुपये ते ५० रुपये भाडं आकारलं जात आहे. पूर्ण लाइन सुरू झाल्यानंतर आरे ते कफ परेड प्रवासासाठी ७० रुपये भाडं आकारलं जाईल. आरे ते अत्रे चौकापर्यंतचं अंतर पार करण्यासाठी सध्या मेट्रोने ३६ मिनिटे लागतात. आरे ते कफ परेडपर्यंत प्रवास करण्यास आता १ तास लागेल. हेच अंतर कारने पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागतात.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ व मुंबई मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज (बुधवारी) दुपारी २.४० वाजता नवी मुंबई विमानतळावर आगमन होईल. विमानतळाचे उद्घाटन झाल्यावर मोदी मुंबईत दाखल होतील. राजभनावर त्यांचा मुक्काम असेल. गुरुवारी ब्रिटनच्या पंतप्रधानांशी त्यांची चर्चा होणार असून, ते फिनटेक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ या मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन वर्ष पूर्ण होत आहे. आता गुरुवारपासून मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.