Maharashtra Breaking News Updates, 08 October 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज (बुधवार, ८ ऑक्टोबर) उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असून यानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित असतील. या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेल. या कार्यक्रमात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा, भाषणांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

दुसऱ्या बाजूला, शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून दोन्ही गटांमध्ये (ठाकरे व शिंदे) चालू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याचा निर्णय आज होऊ शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडेही आपलं लक्ष असेल. यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वक्तव्यांचा आढावा आपण घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

20:50 (IST) 8 Oct 2025

राज्यातील नवनियुक्त शिक्षकांना ऐन दिवाळीच्या सुटीतही काम…नेमके काय होणार?

‘एससीईआरटी’ने याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ५० तासांचे प्रशिक्षण २५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. …वाचा सविस्तर
20:38 (IST) 8 Oct 2025

प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांतही त्रुटी; सीएचबी, कंत्राटी शिक्षक, नवे पात्रताधारक वंचित राहण्याचा आक्षेप

प्राध्यापक भरतीप्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या निर्देशांनुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक या पदांच्या निवडीचे निकष नव्याने जाहीर केले आहेत. …सविस्तर बातमी
20:22 (IST) 8 Oct 2025

पुण्यातील बंद भिडे पूल दिवाळीत खुला करण्याची कोणी केली मागणी ?

मेट्रोच्या कामासाठी हा पूल ९ सप्टेंबरपासून एक महिन्यासाठी बंद करण्यात आला आहे. त्याची मुदत १० ऑक्टोबर रोजी संपणार आहे. …सविस्तर बातमी
20:09 (IST) 8 Oct 2025

आठवड्याची मुलाखत : मानसिक आरोग्यासाठी मनाचे ऐकणे महत्त्वाचे!

शरीर आणि मन हे दोन शब्द दिसतात वेगवेगळे; पण तरीही ते एकमेकांशी संलग्न आहेत. शरीर थकले, पण मनाची उभारी असेल, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही बाहेर पडण्याचे सामर्थ्य मिळू शकते. …अधिक वाचा
19:20 (IST) 8 Oct 2025

PM Modi Mumbai Visit : मोदींनी मांडला स्वस्तात विमान प्रवासाचा मुद्दा, २०१४ च्या स्वत:च्याच विधानाचा केला उल्लेख; म्हणाले…

Navi Mumbai International Airport Inauguration 2025 : नवी मुंबई विमानतळामध्ये विकसित भारताची झलक दिसत असल्याचं म्हणत मोदींनी स्वस्तात विमान प्रवासाचा मुद्दा मांडत २०१४ सालच्या त्यांच्याच विधानाचा उल्लेख केला. …अधिक वाचा
19:00 (IST) 8 Oct 2025

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत ५१६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, आमदारांच्या आरोपाने खळबळ

शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदभरतीसह, कर्ज वितरण, कर्ज बुडीत प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात झाल्याचा खळबळजनक आरोप यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी केला. …अधिक वाचा
18:40 (IST) 8 Oct 2025

नवी मुंबई विमानतळ चमकले, नागपूर रखडले, विमानतळ विकासाला ब्रेक कुणाचा?

नागपूरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधांनांनी भूमिपूजन केले आणि त्यांचे मंत्रिमंडळ जमीन हस्तांतरणाच्या प्रस्तावाला विलंब लावत असल्याचे विचित्र निर्माण झाले आहे. …अधिक वाचा
18:36 (IST) 8 Oct 2025

महाबळेश्वरमधून आंबट-गोड गुजबेरीची आवक; किरकोळ बाजारात ४०० ते ६५० रुपये किलो

‘गुजबेरीचा हंगाम मे महिन्यापर्यंत सुरू राहतो. हंगामाचा दुसरा टप्पा डिसेंबर महिन्यात सुरू होतो. डिसेंबर महिन्यात गुजबेरीची आवक वाढते. …वाचा सविस्तर
18:34 (IST) 8 Oct 2025

Gautami Patil : गौतमी पाटील का म्हणाल्या, ‘मंत्री चंद्रकांत पाटील यांना ‘ते’ प्रकरण….

नवले पुलाजवळ झालेल्या अपघात प्रकरणात गौतमी पाटील यांना समाजमाध्यमांमध्ये ट्रोल करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. …सविस्तर बातमी
18:30 (IST) 8 Oct 2025

महिलांचेच वर्चस्व! भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिकांचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या चार नगरपालिकांचे प्रभाग निहाय आरक्षण बुधवार ८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. …सविस्तर बातमी
18:20 (IST) 8 Oct 2025

शिरूर-कर्जत- उरण नव्या रस्त्याला गती; पुण्यासह पिंपरी-चिंचवडची वाहतूक कोंडी फुटणार

शिक्रापूर-चाकण-तळेगाव-लोणावळा मार्गावरील मोठ्या प्रमाणावरच्या औद्योगिक क्षेत्रामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुकीचा ताण असतो. त्यामुळे हा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. …अधिक वाचा
17:58 (IST) 8 Oct 2025

मुंबईतील व्यापाऱ्यांचा मराठवाड्यातील पूरग्रस्तांना हात

नुकतेच राज्य सरकाने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांची शेती वाहून गेल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजारात येणारा भाजीपाला तसेच इतर कृषी उत्पादनाची आवक देखील घटली आहे. …वाचा सविस्तर
17:57 (IST) 8 Oct 2025

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी! राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन…

एमएसआरडीसी आणि एनएचएआयसह विविध संस्थांच्या रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क व संचलन करण्याचा आरोग्य विभागाचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये जलद सेवा मिळेल. …वाचा सविस्तर
17:54 (IST) 8 Oct 2025

१९ ते २३ जानेवारी दरम्यान ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धा

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुण्यात प्रथमच होत असून, स्पर्धा देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. तिच्या आयोजनासाठी दर १५ दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. …वाचा सविस्तर
17:39 (IST) 8 Oct 2025

Pune Crime News: पिंपरी : खेडमध्ये तरुणावर कोयत्याने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे मागील पंधरा दिवसांपूर्वी फिर्यादी यांच्या भावासोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी ओंकार यांना वासुली फाटा येथे बोलावून घेतले. …अधिक वाचा
17:29 (IST) 8 Oct 2025

पूरग्रस्तांसाठी डोंबिवलीतील गणेश मंदिरातर्फे मदतीचे आवाहन; कल्याण, डोंबिवलीतून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ

हा आपत्कालीन निवारण निधी राज्याच्या विविध भागातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य नियोजन करून वाटप केला जाणार आहे. …सविस्तर बातमी
17:17 (IST) 8 Oct 2025

वायू प्रदुषणामुळे अंबरनाथकरांचा श्वास गुदमरला; रात्रीच्या वेळी रायासनिक दुर्गंधीमुळे खिडक्या लावण्याची वेळ

अंबरनाथ शहराच्या मोरिवली परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतून सातत्याने रासायनिक वायू सोडला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिमेतील बहुतांश भागाला दुर्गंधीचा सामना करावा लागतो. …सविस्तर बातमी
17:08 (IST) 8 Oct 2025

ठाणे : वागळेतील कोंडी टाळण्यासाठी वाहतुक बदल

काही हरकत किंवा सूचना असल्यास लेखी स्वरुपात तीन हात नाका येथील ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त कार्यालय येथे पाठविण्याचे आवाहन केले आहे. …वाचा सविस्तर
16:48 (IST) 8 Oct 2025

“नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई, तर चौथी मुंबई…”, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; वाचा नेमकं काय म्हणाले

Devendra Fadnavis at Navi Mumbai International Airport : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढवेल. त्यानंतर आपण वाढवण बंदराजवळही एक नवं विमानतळ उभारणार आहोत.” …वाचा सविस्तर
16:11 (IST) 8 Oct 2025

अगोदर हात ओले करा…मगच मालमत्तांना कर लावून घ्या; कल्याण डोंबिवली पालिका काही प्रभागांमधील कर विभागातील परिस्थिती

प्रभागांमधील मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांच्या या टंगळमंगळ कारभारामुळे प्रभागांमधील मालमत्ता कर विभागात कर लावण्याच्या नस्तींचे ढीग झाले आहेत. …वाचा सविस्तर
15:37 (IST) 8 Oct 2025
नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटातील अभिनेत्याची निर्घृण हत्या

नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील नारा वस्ती परिसरात प्रियांशू ठाकूर उर्फ बाबू छत्री (छेत्री) याची मंगळवारी (७ ऑक्टोबर) रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. प्रियांशूने नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेल्या झुंड चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशूवर काही अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात प्रियांशू गंभीर जखमी अवस्थेत, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रियांशूचा स्थानिक पातळीवर काही गुन्हेगारी घटकांशी वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, हत्येमागील नेमका हेतू अजून स्पष्ट झालेला नाही. पोलिसांनी याप्रकरणी ध्रुव शाहू याला अटक केली असून घटनेचा सर्वांगाने तपास करत आहेत, अशी माहिती जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण क्षीरसागर यांनी दिली.

15:23 (IST) 8 Oct 2025

एक मंत्री स्वतःला शेतकरी म्हणवतो आणि कल्याणला जायचे असेल तर हेलिकॉप्टर मधून फिरतो, राजन विचारे यांची टीका

पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवारी शिवसेना ठाकरे गटाने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. …अधिक वाचा
14:57 (IST) 8 Oct 2025

कर्मचाऱ्यांची पाठ, पंतप्रधानांचे निमित्त आणि कल्याण डोंबिवली पालिकेचा वर्धापनदिन रद्द

पालिका सेवेत २५ ते ३० वर्ष सेवा केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना अनेक वर्षानंतर प्रथमच पदोन्नत्ती मिळाल्याने अनेक कर्मचारी, अधिकारी आनंद उत्साहात आहेत. तर काही कर्मचाऱ्यांवर या पदोन्नत्ती प्रकरणात अन्याय झाल्याने ते नाराज आहेत. …अधिक वाचा
13:50 (IST) 8 Oct 2025

जळगाव बाह्यवळण महामार्गावरील पथदिव्यांमुळे अपघाताचा धोका… वाहनधारकांना मनस्ताप

ममुराबाद येथील उड्डाणपुलाखाली पथदिव्यांचे खांब रस्त्यांच्या बरोबर मध्यभागी उभे करण्यात आल्याने दोन्ही बाजुने अपघातप्रवण क्षेत्र आता निर्माण झाले आहे. …वाचा सविस्तर
13:48 (IST) 8 Oct 2025
गुंड निलेश घायवळ प्रकरणात ट्विस्ट, रवींद्र धंगेकरांचा ‘या’ भाजपा नेत्यावर आरोपीला पाठीशी घालण्याचा आरोप

कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला आहे. परंतु, घायवळला पुण्यातून परदेशात पळून जायला कोणी रसद पुरवली यावर चर्चा चालू आहे. अशातच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की भाजपाच नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घायवळला रसद पुरवली होती.

धंगेकर म्हणाले, कोथरूडमधील गुन्हेगारी, निलेश घायवळ प्रकरणी, पासपोर्टची छेडछाड, सरकारी कागदपत्रांमध्ये छेडछाड करणाऱ्यांना समीर पाटील मदत करतोय. हा समीर पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबुड करणारा आहे.

13:46 (IST) 8 Oct 2025

निर्भय बनो संस्थेची ‘ईडी’कडे धडक; डोंबिवलीत १०६ बेकायदा इमारती; ४२४ भूमाफियांविरुद्ध चौकशीची मागणी

दहा वर्षापूर्वी डोंबिवली जवळील २७ गावांमधील जमीन भूमापन सर्व्हे क्रमांक ७१, ६८, ६३ जमिनींवर ८४ भूमाफियांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे बनावट नावाचे सही शिक्के तयार केले. …वाचा सविस्तर
13:46 (IST) 8 Oct 2025

निर्भय बनो संस्थेची ‘ईडी’कडे धडक; डोंबिवलीत १०६ बेकायदा इमारती; ४२४ भूमाफियांविरुद्ध चौकशीची मागणी

दहा वर्षापूर्वी डोंबिवली जवळील २७ गावांमधील जमीन भूमापन सर्व्हे क्रमांक ७१, ६८, ६३ जमिनींवर ८४ भूमाफियांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे बनावट नावाचे सही शिक्के तयार केले. …वाचा सविस्तर
13:43 (IST) 8 Oct 2025

“अजित पवारांचं मराठ्यांविरोधात षडयंत्र”, मनोज जरांगेंचं ‘त्या’ मोर्चावरून टीकास्त्र; म्हणाले, “उपमुख्यमंत्र्यांनी साप पोसलेत”

Manoj Jarange Patil vs Ajit Pawar : मनोज जरांगे पाटील म्हणाले, “छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानत आहेत. त्यामुळे ज्या जाती कधीच मराठ्यांविरोधात नव्हत्या त्यांना मराठ्यांविरोधात फितवण्याचं काम करत आहेत आणि अजित पवार याकडे डोळेझाक करत आहेत. …वाचा सविस्तर
13:42 (IST) 8 Oct 2025

नंदुरबारमध्ये हे तर भलतेच कारस्थान…अनुसूचित जाती आयोग संतप्त होण्याचे कारण काय ?

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला बालकल्याण, अर्थ, बांधकाम आणि कृषी अशा खात्यांच्या प्रमुखांना आयोगासमोर म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याची तंबी देण्यात आली आहे. …अधिक वाचा
13:22 (IST) 8 Oct 2025

रिक्षा प्रवाशांना लुटणारा चोरटा अटकेत; चोरलेल्या मोबाइलची संकेतस्थळावर विक्री; ३० मोबाइल जप्त

या प्रकरणी फैजान मोहम्मद गौस शेख (रा. जामा मशीदजवळ, आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर गुन्हे करणाऱ्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले. …अधिक वाचा