Maharashtra Breaking News Live Updates, 21July 2022 : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता, नैसर्गिक न्यायाचं तत्व न पाळता निर्णय घेतल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

पावसाने राज्यात सर्वत्र हजेरी लावली असली तरी संततधार कमी झाली आहे, काही ठिकाणी तर पावसाने विश्रांती घेतली आहे. विदर्भातील पूर आता ओसरत आहे.

आज देशाला नवे राष्ट्रपती मिळणार असून बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्यात आलेले यशवंत सिन्हा यांनी लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी मतदान करण्यासंदर्भात आवाहन देखील केलं होतं. त्यामुळे आता नेमकी मतमोजणी झाल्यानंतर निकाल काय लागणार? याकडे लक्ष लागलं आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. त्यानंतर आज (गुरुवार) सोनिया गांधी या चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात हजर होणार आहेत. तर, दुसरीकडे ईडी कडून सुरू झालेल्या या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने ईडी व मोदी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

अशा विविध घडामोडींचे अपडेट्स हे एका क्लिकवर..

Live Updates

Latest Maharashtra News Today : राज्यातील राजकीय घडामोडी, पावसाचे ताजे अपडेट आणि इतर बातम्या एका क्लिकवर…

13:35 (IST) 21 Jul 2022
आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का!

अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पर्यावरण ऱ्हासाच्या कारणामुळे आरेमधील प्रस्तावित कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. तसेच, हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. मात्र, आता हा निर्णय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिरवला असून आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरची स्थगिती त्यांनी उठवली आहे. त्यामुळे आता कारशेड आरेमध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तब्बल अडीच वर्ष स्थगित असलेल्या कारशेडचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

वाचा सविस्तर

13:33 (IST) 21 Jul 2022
पुणे : पीएमआरडीएच्या क्षेत्रात नगर नियोजनाच्या २७ योजना

म्हाळुंगे माण नगररचना योजनेच्या (टाउन प्लॅनिंग – टीपी स्कीम) धर्तीवर २७ नगर नियोजन योजना राबविण्यात येणार असून यासाठी २०१९ मध्ये १२ गटांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नगर नियोजनांतर्गत हे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

13:27 (IST) 21 Jul 2022
एसपीपीयू विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांमध्ये लक्षणीय घट ; गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेपाच हजार कमी अर्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांमध्ये यंदा लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास साडेपाच हजार कमी अर्ज आले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी विद्यापीठाच्या विविध शाखांतील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र मिळून एकूण १७४ अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा

13:20 (IST) 21 Jul 2022
पुणे : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातआणण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे समन्वय – शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा नियमित आढावा घेणे, शाळाबाह्य आढळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे, पालकांना मार्गदर्शन करणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसंबंधी कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.

सविस्तर वाचा

13:10 (IST) 21 Jul 2022
National Herald case : सोनिया गांधींना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलवल्याच्या निषेधार्थ, पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. आज(गुरुवार) सोनिया गांधी चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात हजर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलन पुकारले असून, पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर देखील केंद्र सरकार विरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. वाचा सविस्तर बातमी…

12:39 (IST) 21 Jul 2022
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला सातही तलावांमध्ये ८८.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सातही तलावांमध्ये सध्या १२ लाख ८२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:37 (IST) 21 Jul 2022
पत्नी नांदायला येत नसल्याने पतीचा विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्येतून पतीने चक्क वीज वाहक खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न तासगावमध्ये केल्याची घटना काल (बुधवार) रात्री घडली. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या या विद्युत खांबावरील सर्कसमुळे मार्गावरील वाहतुकही खोळंबली होती. वाचा सविस्तर बातमी…

12:29 (IST) 21 Jul 2022
चंद्रपूर : माजरी पोलीस ठाणे २४ तासांपासून पाण्यात

अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडल्यानंतर वर्धा नदीला पूर आला आहे. भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनेक गावे पुराखाली आहेत. माजरी येथील पोलीस ठाण्यात पाणी शिरले असून पोलीस कर्मचारी ठाण्यातील कागदपत्रे व साहित्य सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. वाचा सविस्तर बातमी…

12:28 (IST) 21 Jul 2022
नागपूर : पुराच्या पाण्यातून माकडांना वाचवण्यासाठी ‘हरितसेतू’ची निर्मिती

माकडांना पुराच्या पाण्यातून सोडवण्यासाठी वनखात्याने स्वयंसेवींच्या मदतीने ‘हरितसेतू’ उभारला आहे. या सेतूच्या सहाय्याने ते बाहेर पडतील, अशी अपेक्षा आहे. नागपूरपासून १५-२० किलोमीटर अंतरावरील गोरेवाडालगतच्या माहूरझरी गावालगत तलावात गेल्या काही दिवसांपासून अति उच्चदाब विजेच्या मनोऱ्यावर सात माकडे अडकून पडली आहेत. वाचा सविस्तर बातमी…

12:27 (IST) 21 Jul 2022
“…म्हणजे मागणी करण्याआधीच बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय झाला होता”; विनायक राऊतांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ जुलैला त्यांचा गटनेतेपदाबाबत मागणी केली, मात्र लोकसभा अध्यक्षांनी १८ जुलैलाच हा निर्णय घेतला. त्यामुळे बंडखोरांना निवडण्याचा निर्णय आधीच झाला होता,” असा आरोप विनायक राऊत यांनी केला. तसेच लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता, नैसर्गिक न्यायाचं तत्व न पाळता निर्णय घेतल्याचंही राऊत यांनी म्हटलं. ते गुरुवारी (२१ जुलै) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी…

12:27 (IST) 21 Jul 2022
शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंचा ठाणे जिल्हा दौरा

शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांकडून समर्थन मिळत असून शिवसेनेच्या गडातील पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे गुरुवारी सकाळी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची भिवंडी व शहापूर येथे निष्ठा यात्रा होणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:26 (IST) 21 Jul 2022
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने मूकबधीरांची फसवणूक; एक कोटींची रक्कम न्यायालयात जमा

गुंतवणुकीच्या आमिषाने मूकबधीरांची फसवणूक करणाऱ्या मूकबधिर आरोपींच्या विरोधात न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील मूकबधीर आरोपींकडून एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून न्यायालयात जमा करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातम्या…

12:25 (IST) 21 Jul 2022
पुणे : धरणक्षेत्रात पावसाची उघडीप; पाणीसाठा ६७ टक्क्यांवर

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाने उघडीप दिली. चारही धरणांमध्ये गुरुवारी सकाळपर्यंत तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या धरणांमधील पाणीसाठा १९.७४ अब्ज घनफूट (टीएमसी) ६७.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:24 (IST) 21 Jul 2022
Pune municipal election : खुल्या गटातील उमेदवारांच्या जागांची अदलाबदल

इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) आरक्षणासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने आगामी महापालिका निवडणुकीत खुल्या गटातील उमेदावरांच्या जागांची अदलाबदल होणार आहे. महापालिकेच्या १७३ जागांपैकी ४७ जागा ओबीसींसाठी आरक्षित असतील. वाचा सविस्तर बातमी…

12:22 (IST) 21 Jul 2022
“शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाहीत, तर…”; रामदास आठवलेंचे खळबळजनक विधान

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पाडल्याचा आरोप केला आहे. शरद पवारांनी नाही तर संजय राऊतांनीच शिवसेना फोडली असल्याचा आरोप आठवलेंनी केला आहे. एवढचं नाही तर उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली असल्याची टीकाही आठवलेंनी केली आहे.

सविस्तर वाचा

12:19 (IST) 21 Jul 2022
“जब वक्त बुरा चल रहा हो, तो…”, संजय राऊतांचं सूचक ट्वीट

सरकारचं भवितव्य आणि राज्यातील राजकीय स्थैर्य या दोन्ही बाबतीत संभ्रमावस्था असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्या १२ तासांत दोन ट्वीट करत शायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे बंडखोरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

सविस्तर वाचा

12:15 (IST) 21 Jul 2022
आदित्य ठाकरे २१ ते २३ जुलै या काळात ठाणे, नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर

शिवसेनेतील आमदार-खासदारांच्या बंडाळीनंतर पक्षसंघटना टिकवण्यासाठी युवा सेना नेते आदित्य ठाकरे अखेर मुंबईबाहेर पडत असून २१ ते २३ जुलै या काळात ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. भिवंडी, नाशिक, मनमाड, नेवासा येथे ते मेळावे घेणार आहेत.

सविस्तर वाचा

12:14 (IST) 21 Jul 2022
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी कुणी मिळेल का?

राज्यातील पहिली हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची नोंद झाली आहे. राज्यात मंत्रालयानंतर अशाप्रकारची इमारत केवळ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची असल्याचा लौकिक आहे. मात्र, या इमारतीच्या स्वच्छतेचा ठेका घेण्यासाठी कंपनीच मिळत नसल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा

महाराष्ट्र लाइव्ह अपडेट्स