आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागा लढवणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ( १ डिसेंबर ) कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या वैचारिक मंथन शिबिरात ही घोषणा केला. बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं. यावरून खासदार सुप्रिसा सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एबीपी माझा’शी संवाद साधताना सुप्रिया सुळेंनी म्हटलं, “मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी भारताची आणि महाराष्ट्रातील नागरिक आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. कोण कुठून लढणार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मी मनापासून याचं स्वागत करते, कारण ही लोकशाही आहे.”

हेही वाचा : “जयंत पाटलांनी प्रकाश सोळंकेंना प्रदेशाध्यक्षपदाचा शब्द दिला होता, पण…”, अजित पवारांचा गौप्यस्फोट

“माझ्याविरोधात कुणीतरी लढलच पाहिजे”

“आमची नाती एका जागेवर आहेत आणि राजकारण वेगळं आहे. प्रोफेशन आणि नात्यात कधीच गल्लत करायची नसते. मी लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा केली आहे. लोकशाहीत कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. यात काहीही गैर नाही. माझ्याविरोधात कुणीतरी लढलंच पाहिजे, हा माझा आग्रह राहिला आहे. बाकी महाराष्ट्र आणि बारामतीतील मायबाप जनता ठरवेल,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा :“२००४ मध्ये भाजपाबरोबर जाणार होते, पण…”; शरद पवारांवरील प्रफुल्ल पटेलांच्या आरोपावर जयंत पाटील म्हणाले…

“ही लढाई नाही आहे”

कुटुंबातील व्यक्तीच लोकसभा निवडणुकीला तुमच्याविरोधात उभे राहिलं तर काय करणार? या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी सांगितलं, “मी लोकप्रतिनिधी आहे. मी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आली आहे. ही लढाई नाही आहे. दोन वेगळे विचार आहेत. लोकसेवा आपला विचार असेल, तर लढाई वगैरे काही नसतं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on ajit pawar loksabha election baramati constituency ssa