Entertainment News 14 May 2025 : ‘रेड २’, ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’ असे अनेक सिनेमे या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घेऊयात. याशिवाय सर्वत्र ‘कान्स २०२५’ सोहळ्याची देखील चर्चा सुरू आहे. भारत-पाकिस्तानमधील तणामुळे आलिया भट्टने कान्सबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मनोरंजन विश्वातील या सगळ्या घडामोडींची सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिकवर…
Entertainment News Today 14 May 2025
कादर खान ते अमजद खान; बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांचा आहे बलुचिस्तानशी संबंध
अनुष्का सेनवर रागावला नील नितीन मुकेश? नेमकं काय घडलं? नेटकरी म्हणाले, “काहीतरी मोठं…”
Cannes मध्ये उर्वशी रौतेलाचा अतरंगी लूक, पॅरट क्लचने वेधले लक्ष, किंमत ऐकून व्हाल थक्क
Video : आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे…; ६८ वर्षांच्या पूर्णा आजींची लयभारी एनर्जी! ‘ठरलं तर मग’च्या सेटवर केली ‘अशी’ धमाल
…अन् अंतरा लीलाच्या कानाखाली देणार; अंतराची स्मृती परतली? ‘नवरी मिळे हिटलरला’ मध्ये ट्विस्ट, पाहा
‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर पाहताच रितेश देशमुखकडून पत्नी जिनिलीयाचं कौतुक; म्हणाला, “असामान्य…”
Uorfi Javed : उर्फी जावेदने शेअर केलेली भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यंदाच्या कान्स २०२५ सोहळ्यात ती पदार्पण करणार होती मात्र, तिचा व्हिसा नाकारल्यामुळे उर्फीची मोठी संधी हुकली आहे.
उर्फी लिहिते, “मी आयुष्याच्या कठीण टप्प्यातून जात आहे. अनेक ठिकाणी मला रिजेक्शन फेस करावं लागलं आहे. बिझनेस ठप्प आहे…मला कान्सला जाण्याची संधी मिळाली पण, तिथे जाणं माझ्या नशिबात नव्हतं आणि माझा व्हिसा रिजेक्ट झाला. मी आणि माझी टीम निराश झालो आहोत. माझ्या कान्स एन्ट्रीसाठी आम्ही खूप तयारी करत होतो पण, व्हिसा रिजेक्ट झाल्यावर आमचं मन खरंच दुखावलं. पण, हा प्रवास थांबणार नाहीये…आणि माझ्यासारखं रिजेक्शन ज्या लोकांना मिळालं आहे त्यांनीही आयुष्यात कधीच थांबू नका. एक नकार म्हणजे जगाचा अंत नसून, आयुष्यात मिळालेला तो नकार तुम्हाला अधिक मेहनत घेण्यासाठी प्रेरित करतो.”
“मराठी इंडस्ट्रीत अनोळखी असल्यासारखी वागणूनक…;” अभिजीत सावंतचं भाष्य, नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…
२५ वर्षांनी चित्रपटगृहांत पुन्हा प्रदर्शित होणार ‘धडकन’; कुठे व कधी पाहता येणार चित्रपट?
“मला मराठीची ताकद…”, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर म्हणाले, “एकच दणका…”
“दिवस भरलेत तुझे…”, शिवा जगदीशला घरातून धक्के मारून बाहेर काढणार अन्…; मालिकेत पुढे काय होणार? पाहा
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आलिया भट्टने घेतला मोठा निर्णय; अभिनेत्री ‘कान्स’मध्ये सहभागी होणार नाही?
नैराश्याला कसे सामोरे जावे? गश्मीर महाजनी म्हणाला, “स्वत:वर दया करणं…”
“तो जाणकार आहे; पण…”, विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
सितारे जमीन पर ‘या’ हॉलीवूड चित्रपटाची कॉपी? ट्रेलर प्रदर्शित होताच आमिर खान झाला ट्रोल…
‘हम साथ साथ है’ चित्रपटावेळी सोनाली बेंद्रेपुढे दिग्दर्शकाने ठेवलेली ‘ही’ अट; अभिनेत्री म्हणाली, “तर त्यांनी त्यावर..”
“मालिका उगाच खेचण्यापेक्षा…;” ‘नवरी मिळे हिटलरला’बद्दल वल्लरी विराजचं वक्तव्य, म्हणाली…
“भाई, शो केव्हा सुरू होणार?” ‘त्या’ वादानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर समोर आला समय रैना, पापाराझींचा प्रश्न ऐकताच म्हणाला…
‘सितारे जमीन पर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित! दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवणार आमिर खान, पाहा…
सई ताम्हणकरच्या ‘गुलकंद’ चित्रपटाने १३ दिवसांत जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला, समोर आली आकडेवारी
Gulkand Marathi Movie Box Office Collection : सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुलकंद’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३ दिवसांत ४.४५ कोटींचा गल्ला जमावला आहे. ही कमाई अलीकडच्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांच्या तुलनेत फारच चांगली आहे.
Cannes 2025 : आलिया भट्टने घेतला महत्त्वाचा निर्णय! कान्सच्या रेड कार्पेटवर उपस्थित राहिली नाही कारण…
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने मोठा निर्णय घेतला आहे. १४ मे रोजी ती कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेणार होती. मात्र, ती नियोजित तारखेनुसार कार्यक्रमाला हजर राहिलेली नाही. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, आलियाची टीम सध्या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. अभिनेत्री काही दिवसांनी या सोहळ्याला उपस्थित राहील.
रितेश देशमुखच्या Raid 2 चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा! १३ दिवसांत कमावले तब्बल…
Raid 2 Box Office Collection : रितेश देशमुख व अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेड २’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३ दिवसांत १२९.८५ कोटींची कमाई केली आहे.
सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पर्ण पेठे, आशुतोष गोवारीकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘आता थांबायचं नाय’ सिनेमा यंदा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
‘आता थांबायचं नाय’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गेल्या १३ दिवसांत ३.७७ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय सिनेविश्वातील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचं आणि दिग्दर्शक शिवराज वायचळ याचंही कौतुक केलं आहे.
मराठीसह बॉलीवूडमध्ये मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? सर्वत्र कौतुक होणाऱ्या सिद्धार्थ जाधव अन् भरत जाधव यांच्या ‘आता थांबायचं नाय’ सिनेमाने १३ दिवसांत किती कोटी कमावले जाणून घ्या…