Premium

Video : शाहरुखचा कॅमिओ असलेला ‘टायगर ३’च्या चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ लीक; पाहा भाईजान व किंग खानचा डॅशिंग अंदाज

व्हिडीओ लीक झाल्यामुळे शाहरुख-सलमानचा लूक व्हायरल

salman-and-shahrukh
‘टायगर ३’च्या चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ लीक (संग्रहित छायाचित्र)

अभिनेता सलमान खानचे आगामी चित्रपट खूप चर्चेत आहेत. गेले अनेक महिने त्याचे चाहते ‘टायगर ३’ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याच्या चाहत्यांचं लक्ष या चित्रपटाकडे वेधलं गेलं आहे. या चित्रपटात सलमान खानबरोबर किंग खान अर्थातच शाहरुख खानही कॅमिओ करताना दिसणार आहे. ‘टायगर ३’ च्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आधी सलमान खान आणि नंतर शाहरुख खान दिसत आहेत. लांब केस आणि हलकी दाढी असलेला शाहरुख खान पठाण लूकमध्ये दिसत आहे. शाहरुख खानने तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची कार्गो पॅन्ट घातली असून त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या दुखापतीच्या खुणांवरून हा अ‍ॅक्शन सीन असल्याचे समोर आले आहे. तर सलमान खान तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट घालून दबंग स्टाइलमध्ये फिरताना दिसत आहे.

शाहरुख-सलमानच्या अ‍ॅक्शन सीनसाठी ‘टायगर ३’चे निर्माते तब्बल ३० कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सने दिली आहे. अद्यापही या शूटिंगबद्दल निर्मात्यांनी अधिकृतपणे काही माहिती दिलेली नाही. ‘टायगर ३’ चे दिग्दर्शन मनीष शर्मा करीत आहेत. या चित्रपटात सलमानबरोबर कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसतील.

हेही वाचा- १६ डिग्री तापमानात शूटिंग अन् ४० तास पाणी न प्यायल्याने…; ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सांगितली भयानक परिस्थिती

सलमानचा ‘एक था टायगर’ २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर, ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या ‘टायगर’ सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘टायगर’ चित्रपट यशराज फिल्म्स ‘स्पाय युनिव्हर्स’चा सुद्धा एक भाग आहे. ‘टायगर ३’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shah rukh khan shoots for his cameo with salman khan for tiger 3 as they arrive on the sets in madh island in viral video dpj

First published on: 02-06-2023 at 13:34 IST
Next Story
‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा आहे ‘या’ मराठी पदार्थाच्या प्रेमात, खुलासा करत म्हणाली…