आयपीएलच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून, रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा सामना पार पडला. सामन्यादरम्यान अचानक एक श्वान मैदानात घुसल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली. पोलीस आणि इतर लोक त्या धावत्या श्वानाला पकडण्यासाठी पाय मधे टाकून त्याला अडविण्याचा प्रयत्न करत होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या जेव्हा गोलंदाजीसाठी सज्ज झाला तेव्हा श्वान मैदानात घुसला. त्यामुळे सामना थोडा वेळ थांबविण्यात आला. हार्दिक पांड्याने कुत्र्याला आपल्याकडे बोलावले असता, स्टेडियममधील ग्राउंड स्टाफने पाठलाग करून, कुत्र्याला मैदानातून हाकलून दिले.

‘स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. श्वानाला अथकपणे लाथ मारल्यामुळे आणि त्याचा पाठलाग केल्याबद्दल त्यांनी ग्राउंड स्टाफला फटकारले. हा व्हिडीओ आपल्या स्टोरीवर शेअर करीत, वरुण धवनने आपला संताप व्यक्त केला. “श्वान काही फुटबॉल नाही. श्वान कोणाला नुकसान पोहोचवत नाही किंवा तो चावतही नाही आहे. बेपर्वाईनं वागण्यापेक्षा याबाबत एक चांगला मार्ग योजणं आवश्यक आहे,” अशा शब्दांत वरुणने श्वानाबरोबर गैरवर्तन करणाऱ्यांना फटकारले.

हेही वाचा… गौतमी देशपांडे पती स्वानंदबरोबर व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “त्याला बालीला जायचं होतं पण…”

सामन्यादरम्यानचा श्वानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरनेसुद्धा कमेंट करीत आपला राग व्यक्त केला आहे. “हा व्हिडीओ म्हणजे आजच्या काळातील मानवतेच्या स्थितीचं हे वर्णन आहे. हे खूप लज्जास्पद आहे.”

दरम्यान, या व्हिडीओमागची सत्य परिस्थिती सांगत, एका नेटकऱ्याने स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेबाबत भाष्य केले. तो म्हणाला, “स्टेडियममध्ये तो सामना मी लाइव्ह पाहत होतो. मी येथे काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. पहिल्यांदा मैदानात येऊन श्वानानं खेळात व्यत्यय आणला आणि तो स्वत:हून बाहेर पडला. पुढच्या चेंडूला तो पुन्हा आला आणि त्यानं स्टेडियमध्ये एक फेरफटका मारला. तो आनंदानं हे सगळं करीत होता म्हणून त्याला कोणी अडवलं नाही. पुन्हा तिसऱ्यांदा तो आत आला आणि आजूबाजूला प्रदक्षिणा घालायला लागला. खेळ सुरू होणार होता म्हणून लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; पण तो खूप वेगात धावत होता.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan got angry as dog was kicked and chased in cricket ground during ipl dvr