अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर ही जोडी २५ डिसेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकली. गौतमी आणि स्वानंदचा शाही विवाह सोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला. गौतमीच्या मेंदी, संगीत, हळद आणि लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

गौतमीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या हनिमूनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कोकणातला आहे. सूर्यास्त, शांतता व एकांतात दोघंही समुद्रकिनारी आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षण व्यतीत करताना दिसतायत. या व्हिडीओला कॅप्शन देत गौतमीनं लिहिलं, “त्याला बालीला जायचं होतं. त्याऐवजी मी त्याला कोकणात घेऊन आले.” या व्हिडीओत दोघंही गप्पा मारताना दिसतायत. या व्हिडीओला गौतमीनं ‘शाम भी कोई’ हे गाणं जोडलं आहे.

Dhruv Rathi
युट्यूबर ध्रुव राठीला जीवे मारण्याची धमकी; एक्स पोस्टवर म्हणाला, “या सगळ्यामागे…”
MP Swati Maliwal
अरविंद केजरीवालांना अटक झाली तेव्हा स्वाती मालिवाल अमेरिकेत का होत्या? खुलासा करत म्हणाल्या “आप कार्यकर्त्यांनी…”
Hamas men confess
“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य
devendra fadnavis on rahul gandhi video
“रिक्षा किंवा टॅक्सीचालकांना निबंध लिहायला का लावत नाही?” म्हणणाऱ्या राहुल गांधींना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
sonali tanpure post
“पोर्श कार अपघातानंतर ‘त्या’ गोष्टी पुन्हा आठवल्या”; आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत!
pfizer whistleblower
“मी आत्महत्या करणार नाही, जीवाचं बरंवाईट झाल्यास..”, फायजरच्या व्हिसल ब्लोअर मेलिसा यांचा व्हिडीओ व्हायरल
parveen shaikh
मुंबईतील मुख्याध्यापिकेकडून हमासचं समर्थन, शाळा प्रशासनाने बडतर्फ केल्यानंतर म्हणाल्या, “राजकीय हेतूने…”
somaiya school principal parveen shaikh sack over hamas posts
पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट : सोमय्या शाळेने मुख्याध्यापिकेला नोकरीवरून काढले

“तुम्ही यापैकी कोणती जागा निवडाल?” असं कॅप्शन या व्हिडीओला देत गौतमीनं चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. ‘बाली की कोकण’, असा पोल तिने या व्हिडीओसोबत शेअर केला आहे. गौतमी आणि स्वानंदच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. “ताईंच्या अशाच इच्छा पूर्ण होऊ दे.. ती खूश तर मी खूश,” अशी गौतमीची चाहती म्हणली. “मी बालीला जाऊन आलो आहे आणि तुम्हाला सांगतो कोकण बालीपेक्षा काही कमी नाही,” असं एकानं कमेंट करीत लिहिलंय.

हेही वाचा… प्रियांका चोप्राने पती व मुलीसह भारतात साजरी केली धुळवड, मन्नारा चोप्रा अन् कुटुंबियांचे व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, गौतमी आणि स्वानंदच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे गौतमी प्रसिद्ध झाली. तर भाडिपा या मराठी सीरिज व कॉन्टेन्ट बनविणाऱ्या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलचा स्वानंद व्हाईस प्रेसिडेंट आहे. भाडिपाच्या वेब सीरिज आणि स्टॅण्डअप कॉमेडी कार्यक्रमात स्वानंदचा सहभाग असतो. गौतमी आणि स्वानंद अनेकदा कॉमेडी व्हिडीओज शेअर करताना दिसतात.