Mumbai Pune Nagpur news: राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. ठराविक भाग वगळता अजूनही इतर भागात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे परिसराला आज दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात जात असतात. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाच्या ८ आगारांमधून १७५ विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या संबंधित बातम्यांसह मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 23 June 2025

13:19 (IST) 23 Jun 2025

वाहतूक प्रकल्प पाहणीसाठी आलेले गडकरी कोंडीमुळे माघारी

पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. …सविस्तर वाचा
13:13 (IST) 23 Jun 2025

जळगाव: अमळनेर रेल्वे स्थानकावरील मालधक्का प्रवाशांसाठी त्रासदायक

धरणगावसह अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबार ही काही महत्वाची स्थानके या मार्गावर आहेत. …वाचा सविस्तर
12:07 (IST) 23 Jun 2025

माणुसकीला काळिमा… कर्करोगाने आजारी आजीला नातवानेच टाकले कचऱ्यात

त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरे पोलिसांना ९ तास वणवण फिरावे लागले होते. सध्या कूपर रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. …सविस्तर वाचा
12:06 (IST) 23 Jun 2025

लोकलच्या दर्शनी भागावर लागणार कॅमेरे, रेल्वे रुळांवरील प्रत्येक दृश्य होणार कैद

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या मार्गावर होणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. …सविस्तर वाचा
11:32 (IST) 23 Jun 2025

विक्रोळी पुलावर तीन मार्गिका, पालिकेच्या नियोजनाचे पुन्हा हसे, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी दुभाजकाचाही अभाव

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकावरील पूल १४ जूनपासून सुरू झाला मात्र या पुलावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी मिळून तीन मार्गिका हा समाजमाध्यमावर चेष्टेचा विषय झाला आहे. …वाचा सविस्तर
11:20 (IST) 23 Jun 2025

मुंबई-गोवा वंदे भारतच्या शेकडो फेऱ्या रद्द

आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत आता पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावेल. …अधिक वाचा
11:16 (IST) 23 Jun 2025

अमरावतीनंतर अकोल्यातील विमानतळाचा प्रश्न मार्गी? मुख्यमंत्र्यांचा शब्द अन्…

अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये घेतला. …सविस्तर वाचा
11:16 (IST) 23 Jun 2025

अधिकारक्षेत्र निश्चित करण्यासाठी वाघ काय करतात..?

वाघ सुगंधाचा वापर करून त्यांचा प्रदेश चिन्हांकित करण्यात तज्ज्ञ असतात. …अधिक वाचा
10:46 (IST) 23 Jun 2025

वाणिज्य वकिलातीच्या सुरक्षेस तैनात चार पोलिसांचे निलंबन, अधिकाऱ्याच्या भेटीवेळी अनुपस्थित राहणे भोवले

मुंबईः वाणिज्य वकिलातीच्या सुरक्षेसाठी तैनात असताना कर्तव्याच्या वेळात अनुपस्थित असलेल्या चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकाऱ्याने अचानक तेथे भेट दिली. त्यावेळी रात्रपाळीला तैनात दोन पोलीस शिपाई व सकाळी कर्तव्यावर येणारे दोन पोलीस शिपाई यांपैकी कोणीच उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याप्रकरणी तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.

सविस्तर वाचा…

10:45 (IST) 23 Jun 2025

राज्यातील ‘या’ भागात आज दक्षतेचा इशारा

मुंबई : राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. ठराविक भाग वगळता अजूनही इतर भागात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे परिसराला आज दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

10:45 (IST) 23 Jun 2025

मुंबई : गोरेगावच्या चित्रनगरीत आग

मुंबई – आज पहाटे गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील हाथी गेटजवळील अन्नपूर्णा सेटवर आग लागल्याची घटना घडली. ही आग मराठी बिग बॉस सेटच्या मागील भागात असलेल्या तंबूमध्ये लागली.

सविस्तर वाचा…

मुंबई, नागपूर, पुणे जिल्ह्यातील बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर…