मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर आणि ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. तर, पश्चिम रेल्वेवरही रविवारी दिवसकालीन ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग कुठे : विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर कधी : सकाळी ८ ते दुपारी १.३० पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. त्यामुळे रविवारी जलद मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होतील.

ट्रान्सहार्बर मार्ग

कुठे : ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाऊन कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत.
परिणाम : वाशी/नेरूळ ते ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा रद्द करण्यात येईल. ठाणे स्थानकातून वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ पर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील. यामुळे, ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय रेल्वे सेवा रद्द केल्या जातील आणि काही चर्चगेट उपनगरीय रेल्वे सेवा वांद्रे/दादर स्थानकांवर अंशतः रद्द केल्या जातील.