मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरूस्तीची कामे, विविध अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे. मात्र रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नाही.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या येणार आहेत. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्ग
कुठे : पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ – दुपारी ४.०५ दरम्यान
परिणाम : सकाळी १०.३३ ते दुपारी ४.४९ दरम्यान पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल आणि सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.१२ दरम्यान सीएसएमटीवरून पनवेल / बेलापूर येथे जाणारी डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ दरम्यान ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान पनवेलला जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरू असेल. ब्लॉक काळात पोर्ट मार्गिका सुरू असेल.
पश्चिम रेल्वे
कुठे : मुंबई सेंट्रल – माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १२.१५ ते दुपारी ४.१५ दरम्यान
परिणाम : ब्लाॅक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल सांताक्रूझ – चर्चगेटदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नसेल.