Mumbai Pune Nagpur News Updates 09 june 2025: मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जणाऱ्या लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात लोंबकळत होते. त्याचवेळी लखनौला जाणारी पुष्पक एक्सप्रेस लोकलच्या बाजूने जात होती. या एक्सप्रेसला घासून लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी खाली पडले असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तसेच,कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानाचा पारा चाळीशीपार पोहोचला आहे.

या घडामोडींची तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या..

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 09 june 2025

00:50 (IST) 10 Jun 2025

बदलापूर झाले कोंडीपूर, रविवार ठरला कोंडीवार; भुयारी मार्ग बंद असल्याने उड्डाणपुलावर भार

बदलापूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचसोबत शहरात वाहनांची संख्याही वाढली आहे. …वाचा सविस्तर
00:43 (IST) 10 Jun 2025

राज्यात शुक्रवारनंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता

नैऋत्य मोसमी वारे मागील १२ दिवसांपासून एकाच जागेवर आहेत. सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. …अधिक वाचा
00:22 (IST) 10 Jun 2025

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे पुण्यात आज शक्तिप्रदर्शन

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्धापनदिनाची जोरदार तयारी केली आहे. …सविस्तर बातमी
00:14 (IST) 10 Jun 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारत गौरव पर्यटन ट्रेनला हिरवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदचिन्हांवरून गौरव यात्रा

भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव ही पर्यटन रेल्वे चालवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. …अधिक वाचा
23:35 (IST) 9 Jun 2025

८४ वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडाचे प्रत्यारोपण, शहरातील पहिला प्रयोग

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कमाल चौक ते दिघोरी उमरेडपर्यंत उड्डाणपूल उभारत आहे. …सविस्तर बातमी
22:43 (IST) 9 Jun 2025

पनवेल: खारघरमध्ये पाकिस्तानी दाम्पत्याचा मृत्यू

खारघर पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहे. या दाम्पत्याला १० आणि सहा वर्षांची दोन मुले आहेत. …वाचा सविस्तर
22:23 (IST) 9 Jun 2025

“टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुहृदयसम्राटांची शिवसेना”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

आमची शिवसेना हिंदुह्रदयसम्राटांची आहे, टोमणेसम्राटांची नाही, असा टोला त्यांनी लगावला. …वाचा सविस्तर
22:15 (IST) 9 Jun 2025

मुंबईतील भगिनींचे कुंकु ‘सिंदूर’ नाही का? प्रवासी संघटनेचा संतप्त सवाल

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मुंबई आणि मुंबईकर आहेत. असे असूनही दररोज लोकल अपघातात मुंबईकर आपल्या रेल्वे प्रवासी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. …अधिक वाचा
22:11 (IST) 9 Jun 2025

मुंबई : पावसाला सुरूवात झाल्यानंतर खड्डे भरण्यास सुरूवात

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होत असते. त्यामुळे दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून खड्डे भरण्यासाठी निविदा मागवून कंत्राट दिले जाते. …अधिक वाचा
22:04 (IST) 9 Jun 2025

रेल्वेत मोबाईल चोरांचा सुळसुळाट, दोन दिवसांत ४६ मोबाईल लंपास

रेल्वे परिसरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे. …अधिक वाचा
21:59 (IST) 9 Jun 2025

मुंबई : दिवसा रेकी, रात्री चोरी; चोरांच्या टोळीला अटक

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उपनगरात रात्रीच्या वेळी बंद घरात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. …वाचा सविस्तर
21:55 (IST) 9 Jun 2025

जे.जे. रुग्णालयात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) तिसऱ्या वर्षांत तो शिक्षण घेत होता. त्याने राहत्या खोलीतील पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. …सविस्तर वाचा
21:28 (IST) 9 Jun 2025

स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल २०२६ मध्ये येणार

मुंब्रा येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री, रेल्वे मंडळाचे अधिकारी आणि इंटिग्रल कोच फॅक्टरीशी (आयसीएफ) सविस्तर बैठक झाली. …सविस्तर बातमी
20:26 (IST) 9 Jun 2025

डोंबिवली : पेंढरकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य विरूपाक्ष कुलकर्णी यांचे निधन

येथील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य विरूपाक्ष कुलकर्णी यांचे सोमवारी दुपारी प्रदीर्घ आजाराने येथे निधन झाले. …सविस्तर बातमी
20:17 (IST) 9 Jun 2025

मोबाईल चोरीच्या संशयावरून झालेल्या वादातून मित्रांच्या पोटात चाकू मारला; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, आरोपीला अटक

फैजान शेख, मोहम्मद हसनेन व आसिफ खान तिघेही चांगले मित्र असून अॅन्टॉपहिल परिसरात राहतात. बकरी ईद निमित्त तिघेही परिसरात भेटले होते. …अधिक वाचा
20:08 (IST) 9 Jun 2025

बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून दुर्मीळ वन्यजीव ताब्यात; मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई, प्रवाशाला अटक

मुंबई विमानतळावर बँकॉक येथून आलेल्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यामुळे सीमाशुल्क विभागाने त्याला अडवले. …सविस्तर बातमी
19:54 (IST) 9 Jun 2025

संत निवृत्तीनाथ पालखीचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान, संस्थानकडून सर्व तयारी पूर्ण

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ संस्थानकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. …वाचा सविस्तर
19:47 (IST) 9 Jun 2025

नाशिक : संत निवृत्तीनाथ पालखीमुळे शहरात वाहतूक मार्गात बदल

त्र्यंबकेश्वरहून मंगळवारी निघणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यामुळे शहर परिसरात १२ ते १४ जून या कालावधीत काही ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. …सविस्तर बातमी
19:43 (IST) 9 Jun 2025

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व नावनोंदणीसाठी उद्या शेवटची संधी

सदर प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी न केल्यामुळे प्रवेश यादीत नाव येऊनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत होती. …सविस्तर वाचा
19:40 (IST) 9 Jun 2025

विस्तृत अधिकारांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला बळ कसे मिळाले ? कुंभमेळा निधी वापराचे अधिकार प्राधिकरणाकडे

प्रयागराजच्या धर्तीवर कायमस्वरुपी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करुन अध्यादेशाद्वारे त्याला कायदेशीर अधिकार बहाल करण्यात आले. …अधिक वाचा
19:22 (IST) 9 Jun 2025

मुंबई : गोराईमधील बॉस्कोवाडी येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याला भेगा, कामाच्या दर्जाबाबत प्रश्न

गोराई येथील रस्त्यावर काही महिन्यातच भेगा पडल्याचा आरोप वाचडॉग फाऊंडेशन या संस्थेने केला आहे. …अधिक वाचा
19:14 (IST) 9 Jun 2025

प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेश्याव्यवसायात ढकलले, ब्रम्हपुरीचा कुख्यात आरोपी जेरबंद

२०१७ मध्ये पीडितेचा विवाह झाला होता. तिला ६ व २ वर्षांची दोन मुले आहेत. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने ३ मार्च २०२४ रोजी पतीने घटस्फोट घेतला. …वाचा सविस्तर
18:58 (IST) 9 Jun 2025

महाराष्ट्रातील निवडणूक घोटाळा… राहुल गांधींनी सांगितलेली कामठीतील बोगस…

कामठीतील ३५ हजार मतदार वाढल्याचाही घोळही पुढे आणले गेले. राहुल गांधीचे सर्व आरोप खरे आहे, असे भोयर म्हणाले. …अधिक वाचा
18:46 (IST) 9 Jun 2025

‘आयसर’साठी दीड लाख अर्ज, उपलब्ध जागांमध्ये वाढ; प्रवेश परीक्षेलाही वाढता प्रतिसाद

यंदा (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) सुमारे २३०० जागांसाठी सुमारे १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला. …सविस्तर बातमी
18:41 (IST) 9 Jun 2025

ऐना प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरकारी साहित्य विक्रीचा प्रयत्न माकपने उधळला; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

डहाणू तालुक्यातील ऐना प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासनाच्या मालकीचे जुने साहित्य बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न मार्क्सवादी/ लेनिनवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. …सविस्तर वाचा
18:34 (IST) 9 Jun 2025

‘हा अस्पृश्यतेसारख्या प्रथेला जन्माला घालण्याचा प्रकार’, ‘सारसबाग बंद’वरून मुस्लिम सत्यशोधक मंडळाची टीका

मंडळाचे अध्यक्ष डाॅ. शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे भूमिका मांडली. …वाचा सविस्तर
18:30 (IST) 9 Jun 2025

पाच वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

घराच्या अंगणात खेळत असलेल्या चार वर्षीय नऊ महिने वयोमानाच्या मयंक पांडुरंग कोलेकर याला काहीतरी चावल्याचे जाणवले. …वाचा सविस्तर
18:22 (IST) 9 Jun 2025

मुंबई लोकल दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील युवक! मुंबई पोलीस दलात होता कार्यरत

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विकीने शिक्षण घेत व सराव करीत मुंबई पोलीस दलात नोकरी मिळविली होती. …सविस्तर बातमी
17:58 (IST) 9 Jun 2025

सूरजागड खाण पारिसरातील एक लाख झाडे तोडण्यास शासनाची परवानगी, वाढीव उत्खननालाही हिरवा कंदील

खाण परिसरातील ९०० हेक्टर जंगलावरील तब्बल एक लाख झाडे तोडण्याला देखील वन्यजीव संरक्षणाच्या अटीसह परवानगी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

17:46 (IST) 9 Jun 2025

Mumbra Thane Train Accident : मुंब्रा अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत

मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून मृत पावलेल्या पाच प्रवाशांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहिर केली आहे. तर, जखमींना ५० हजार ते दोन लाखांपर्यंतची मदत करण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी

मुंबई पुणे नागपूर पाऊस ब्रेकिंग लाईव्ह न्यूज टुडे