Pune Breaking News Live Updates, 01 August 2025 : मालेगाव बॉम्बस्फोटानंतरच ‘भगवा दहशतवाद’चा उल्लेख, स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यावर भगव्या दहशतवादावरून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली, कुदळवाडीतील लघुउद्योजकांच्या अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर आता या ठिकाणी औद्योगिक झोन विकसित करुन उद्योजकांचे पुनवर्सन करण्याची उद्योजकांची मागणी आहे. दरम्यान, आता ऑगस्ट महिन्यात आणि मुख्यत्वेकरून पहिल्या दोन आठवड्यात पुन्हा एकदा पाऊस सरासरी पेक्षा कमी राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.

Live Updates

Mumbai Pune Nagpur Latest News Live Updates in Marathi : मुंबई, पुणे, मुंबई-महानगर, नागपूरच्या महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

14:32 (IST) 1 Aug 2025

राष्ट्रीय महामार्गावर कोंडीचे विघ्न; मुंबई, ठाण्याच्या वाहिनीवर कोंडी ; प्रवाशांचे हाल

पावसाळा सुरू होताच या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. …अधिक वाचा
14:25 (IST) 1 Aug 2025

हिंजवडी: अजित पवारांविरोधात ग्रामस्थ आक्रमक; रस्त्यावरून न्यायालयात जाण्याचा इशारा!

अजित पवारांनी योग्य मार्ग न काढल्यास आगामी काळात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं आजच्या ग्रामसभेत ठराव झाला आहे. …सविस्तर वाचा
14:04 (IST) 1 Aug 2025

तळेगावमधील ‘ती’ १५३ एकर जमीन शासनाचीच ! गुणवत्तेवर निवाडा करण्याचा नांदेड अपर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

शुक्रवारपासून (१ ऑगस्ट) सुरू झालेल्या महसूल दिनानिमित्त जिल्हा प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवत असतानाच बोरगावकर यांचा वरील प्रकरणातील महत्त्वपूर्ण आदेश समोर आला आहे. …वाचा सविस्तर
14:02 (IST) 1 Aug 2025

शालार्थ घोटाळा… जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ शिक्षकांची सुनावणी

शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती जळगाव जिल्ह्यापर्यंत पसरल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पडताळणी न करता परस्पर ड्राफ्ट स्वीकारून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याची चौकशी आता केली जात आहे. …सविस्तर वाचा
13:52 (IST) 1 Aug 2025

धक्कादायक! बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची फेरतपासणी जिल्हा बोर्डाकडूनच

जिल्हा बोर्डातच २१ कर्मचाऱ्यांची फेर तपासणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय या २१ पैकी केवळ दोनच कर्मचारी बोगस असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. …वाचा सविस्तर
13:31 (IST) 1 Aug 2025

मुख्यमंत्री म्हणतात, मतांसाठी हिंदू दहशतवाद शब्दाची निर्मिती

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले तसेच ते विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार अशी चर्चा होती. …अधिक वाचा
13:21 (IST) 1 Aug 2025

राजन विचारेंच्या वाढदिवसाला नरेश म्हस्केंच्या शुभेच्छा, म्हणाले… आज नाही…कधीतरी नंतर….

शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्याविरोधात एक खरमरीत पत्र लिहीले. तसेच, दावा केला की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून म्हस्के हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. …अधिक वाचा
13:20 (IST) 1 Aug 2025

कर्जत दूध संघाच्या अध्यक्षपदी मंगेश जगताप; दादासाहेब खराडे उपाध्यक्ष

कर्जत दूध संघाच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. …अधिक वाचा
13:16 (IST) 1 Aug 2025

‘म्हाडा’तही झोपु प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती; गृहनिर्माण धोरणात शिक्कामोर्तब

सध्या झोपु प्राधिकरणाशी संबंधित सर्व अपीलांची सुनावणी शिखर तक्रार निवारण समितीपुढे होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. …सविस्तर बातमी
13:13 (IST) 1 Aug 2025

मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेचा अचानक संप, हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय

मिरा-भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा खासगी कंत्राटदाराच्या मदतीने चालवली जाते. सध्या महापालिकेच्या ताफ्यात ७५ डिझेल व ५५ इलेक्ट्रिक अशा एकूण १२९ बसगाड्या आहेत. …वाचा सविस्तर
12:41 (IST) 1 Aug 2025

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले “ मला‘या’ गोष्टीची कायम खंत राहील…

डॉ. भागवत आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर असल्याने व कार्यक्रम संस्कृत विद्यापीठाचा असल्याने या कार्यक्रमाला महत्व होते. …अधिक वाचा
12:34 (IST) 1 Aug 2025

पालिकेच्या सीएनडी वेस्ट प्रकल्पाचा मार्ग मोकळा; तांत्रिक मंजुरी मिळाल्याने कामाला गती मिळणार

सुरवातीला या प्रकल्प उभारणीसाठी जागेचा शोध सुरू होता.मात्र जागाच उपलब्ध  होत नसल्याने अखेर पालिकेने प्रकल्प वसई पूर्वेच्या गोखीवरे येथील कचराभूमीवरच पाच एकर जागेत उभारण्याचा निर्णय घेतला होता. …अधिक वाचा
12:28 (IST) 1 Aug 2025

उच्च शिक्षण प्रवेशाचा विद्यार्थी व पालकांवर प्रचंड मानसिक ताण! आत्महत्यांच्या प्रमाणात मोठी वाढ…

‘इंडियन जर्नल ऑफ सायकिअट्री’च्या २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार १५ ते २४ वयोगटातील विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३४ टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, अपयशाची भीती, आणि शैक्षणिक खर्च यामुळे सतत मानसिक तणावाखाली असल्याचे निदर्शनास आले. …सविस्तर बातमी
12:17 (IST) 1 Aug 2025

तुमच्या आसपास बेवारस वाहन आहे का? त्याचे काय करायचे ते वाचा…

रस्त्यांवर बऱ्याच कालावधीसाठी बेवारस पडून असलेली वाहने लक्षात आल्यास नागरिकांना कंत्राटदारांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर वाहनाचे छायाचित्र व गुगल लोकेशनसह तक्रार करता येणार आहे. …अधिक वाचा
12:05 (IST) 1 Aug 2025

कबुतरांना खायला घालणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध गुन्हे नोंदवा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

या न्यायालयीन आदेशाचा चुकीचा अर्थ काढू नये, नागरिकांच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही, असेही न्यायमूर्ती. गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले. …वाचा सविस्तर
11:55 (IST) 1 Aug 2025

जमीन मोजणी अन् लक्ष्मी दर्शन…

जमिनीचा मोजणी अहवाल वरिष्ठांना सादर करण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी करीत यातील तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कळवण भूमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक विजय गवळीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. …सविस्तर वाचा
11:54 (IST) 1 Aug 2025

पुण्यात बुजविले चक्क दहा हजाराहून अधिक खड्डे …पण खड्डयातील ‘कसरत’ कायम !

असमान रस्ते, रस्त्यांवरील खचलेली झाकणे, खड्डे चुकविताना होणारी वाहनचालकांची कसरत या समस्यांचा सामना नागरिकांना आजही करावा लागत असून, महापालिकेने मात्र एक एप्रिलपासून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. …वाचा सविस्तर
11:52 (IST) 1 Aug 2025

बनावट ओळखपत्रावरील तीन शिक्षकांना अटक, एसआयटी सक्रिय

या घोटाळा प्रकरणात सायबर शाखेने बुधवारी रोहिणी विठोबा कुंभार (माध्यमिक) आणि सिद्धेश्वर श्रीराम काळुसे (प्राथमिक) यांना पदाचा गैरवापर करीत राज्य सरकारची १०० कोटी रुपयांची फसवूणक केल्याचा ठपका ठेवत अटक केली. …सविस्तर वाचा
11:35 (IST) 1 Aug 2025

तुर्भे नाक्यावर एनएमएमटी इलेक्ट्रिक बसचा भीषण अपघात; सहा जण जखमी

या अपघातामुळे एनएमएमटीच्या बस देखभालीतील त्रुटींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. …सविस्तर वाचा
11:29 (IST) 1 Aug 2025

गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन मुलीची ओळख उघड करण्याचा अट्टहास नको; उच्च न्यायालयाने पोलिसांना बजावले,ओळख उघड केल्याशिवाय गर्भपात करू देण्यास परवानगी

गर्भपात करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलींचे नाव आणि ओळख उघड करण्यासाठी पोलिसांकडून होणारी जबरदस्ती मुलगी आणि डॉक्टरांचा छळच आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. …अधिक वाचा
11:04 (IST) 1 Aug 2025

मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण; शिल्पकाराकडून जप्त केलेल्या उपकरणांच्या न्यायवैद्यक अहवालाची स्थिती काय, उच्च न्यायालयाची मालवण पोलिसांना विचारणा

या प्रकरणी दोन हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र आधीच दाखल झाले आहे, त्यामुळे, आपटे याचा जप्त केलेला लॅपटॉप आणि मोबाइल ताब्यात ठेवण्याचे कारण नाही, असा दावा आपटे यांच्या वतीने वकील गणेश सोवनी यांनी केली. …वाचा सविस्तर
10:58 (IST) 1 Aug 2025

पुण्यातील कात्रज उद्यानातील १६ चितळांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना नोटीस, कारवाई होणार !

महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील १६ चितळांच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी उद्यान अधीक्षकांसह प्राणी संग्रहालयाच्या संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. …सविस्तर वाचा
10:57 (IST) 1 Aug 2025

जळगावात अडीच कोटींचा रस्ता हरवला; पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “माहिती घेतो…”

जिल्ह्यात मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची कंत्राटे घेणाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. काही रस्त्यांची लोकार्पण होण्याआधीच वाताहत झाली असताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील एक रस्ता अक्षरशः हरवला आहे.  …सविस्तर बातमी
10:57 (IST) 1 Aug 2025

शहीद हेमंत करकरे यांच्या नावे मालेगावातील रस्त्याचे नामकरण कसे ?

शहरातील भिकू चौक भागात २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणच्या रस्त्याचे पंधरा वर्षांपूर्वीच शहीद हेमंत करकरे मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. …वाचा सविस्तर
10:57 (IST) 1 Aug 2025

पुणे महापालिकेत भाजप मंत्री, पदाधिकाऱ्यांची वाढली गर्दी ! काय आहे कारण ?

महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना अंतिम करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. …अधिक वाचा
10:50 (IST) 1 Aug 2025

माजी आमदार झिशान सिद्दीकीला धमकी देणाऱ्याला अटक

झिशान सिद्दीकी यांच्या ई-मेल आयडीवर २१ एप्रिलला धमकीचा ई-मेल आला होता. दोन दिवसांत त्यांना अनेक ई-मेल पाठवण्यात आले होते. त्यात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने १० कोटी रुपयांच्या खंडणीचा, तसेच दाऊद टोळीच्या नावाचा उल्लेख केला होता. …सविस्तर बातमी
10:38 (IST) 1 Aug 2025

८ जणांना गंडवणारी लुटेरी दुल्हन नवव्या पतीसोबत डॉलीच्या टपरीवर चहा पिताना जेरबंद

आठ जणांना फसवल्यानंतरही समाधान न झाल्याने ही लुटेरी दुल्हन नवव्या पती सोबत चहाचे झुरके मारत होती. …सविस्तर वाचा
10:21 (IST) 1 Aug 2025

ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कोकण आणि खानदेशातील काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. …अधिक वाचा
10:20 (IST) 1 Aug 2025

अतिक्रमण कारवाईनंतर आता चिखलीत औद्योगिक झोन विकसित करण्याच्या हालचाली; प्रस्ताव पाठविण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली, कुदळवाडीतील लघुउद्योजकांच्या अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर आता या ठिकाणी औद्योगिक झोन विकसित करुन उद्योजकांचे पुनवर्सन करण्याची उद्योजकांची मागणी आहे. …सविस्तर वाचा
10:19 (IST) 1 Aug 2025

‘भगवा दहशतवादा’चा उल्लेख मालेगाव स्फोटानंतरच, निकालानंतर आरोप- प्रत्यारोप सुरू

मालेगाव स्फोटातील आरोपींना दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या पथकाने कसून तपास करीत अटक केली होती. …सविस्तर बातमी

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह १ ऑगस्ट २०२५