Mumbai, Pune , Nagpur Breaking News Updates, 05 August 2025 : देशातील ‘रिपाइं’च्या ऐक्यासाठी व दलित एकजुटीसाठी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व ‘बसप’ अध्यक्षा मायावती यांनी ‘रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया’चे नेतृत्व करावे, असे आवाहन ‘रिपाइं’ अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच बहुप्रतिक्षित अजनी-पुणे स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे, याच महिन्यात तिचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. अशा विविध क्षेत्रातील मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर शहर आणि परिसरातील महत्वाच्या विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Mumbai Pune Nagpur Latest News  Updates in Marathi : महत्त्वाच्या घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

18:22 (IST) 5 Aug 2025

गणेशभक्तांसाठी रात्रभर लोकल, मेट्रो सुरू ठेवण्यासाठी पाठपुरावा करणार – मंगलप्रभात लोढा

भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार सुरू असल्याची माहिती लोढा यांनी जनता दरबारात दिली. …वाचा सविस्तर
18:21 (IST) 5 Aug 2025

अंतिम मुदतीनंतर ६९५ महाविद्यालयांना एफआरएकडून शुल्कवाढीस मान्यता…विद्यार्थी संघटनेची मान्यता रद्द करण्याची मागणी

एफआरएने ३० ऑक्टोबरनंतर शुल्क वाढीस मान्यता दिलेल्या ६९५ महाविद्यालयांचे प्रस्ताव रद्द करून त्यांना मागील शैक्षणिक वर्षाच्या शुल्क मान्यतेप्रमाणे शुल्क आकारणी करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी विनंती प्रधान सचिवांना पत्राद्वारे केली आहे. …अधिक वाचा
18:06 (IST) 5 Aug 2025

गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील सखूबाई गाणे प्रदर्शित

‘आतली बातमी फुटली’ हा मराठी चित्रपट १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार हे ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. …वाचा सविस्तर
18:03 (IST) 5 Aug 2025

वरळी बीडीडी पुनर्विकास… ५५६ रहिवाशांची प्रतीक्षा आठवड्याभरात संपणार; १८० चौरस फुटांच्या घरातून थेट…

म्हाडाकडून घराचा ताबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात ताबा देण्यात येईल असे जाहीर केले आहे. …अधिक वाचा
17:56 (IST) 5 Aug 2025

Raksha bandhan-2025 : ॲपल फोन राखीपासून भेटवस्तू राखीपर्यंत; बाजारात आकर्षक राख्यांची धूम

रक्षाबंधननिमित्त बाजारात गेल्या आठवड्याभरापासून राख्या उपलब्ध झाल्या आहेत. यंदा राख्यांमध्ये विविध प्रकार बाजारात आलेले पाहायला मिळत आहेत. …सविस्तर बातमी
17:48 (IST) 5 Aug 2025

Ganeshotsav 2025 : ठाण्यातील गणेश भक्तांसाठी खुशखबर.., ठाणे महापालिका आयुक्त गणेश मंडळांच्या बैठकीत म्हणाले..,

ठाणे शहरात गणेश मुर्ती विसर्जनामुळे तलावांचे पाणी प्रदुषित होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येतात. या सर्वच व्यवस्थेची माहिती देण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी गणेश मंडळाची बैठक घेतली. …सविस्तर वाचा
17:33 (IST) 5 Aug 2025

टिटवाळ्यात महापालिका, पोलिसांची शाळा परिसरातील पान टपऱ्यांवर कारवाई

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक पान टपरी चालक नियमितच्या पान विक्री बरोबर प्रतिबंधित गुटखा सदृश्य वस्तू विक्री करत असल्याचे पोलिसांनी वेळोवेळी शहराच्या विविध भागात घातलेल्या छाप्यांवरून उघड केले आहे. …अधिक वाचा
17:24 (IST) 5 Aug 2025

वसईत राजकीय उलथापालथ सुरू; शिवसेना, बविआ नेते भाजपात

मंगळवारी प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गट,  शिवसेना शिंदे गट तसेच बहुजन विकास आघाडीच्या नेते आणि माजी नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला. …सविस्तर बातमी
17:13 (IST) 5 Aug 2025

परिमंडळ ७ च्या पथकाकडून दीड कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

गेल्या वर्षभरात पूर्व उपनगरांतील परिमंडळ ७ अंतर्गत येणाऱ्या घाटकोपर, विक्रोळी, पार्क साईट, कांजूरमार्ग, नवघर, मुलुंड आणि भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे दागिने, रोकड आणि मोबाइल चोरीला गेले होते. …सविस्तर वाचा
17:08 (IST) 5 Aug 2025

खंडणीप्रकरणी कुख्यात चेंबूर अण्णासह दोघांना अटक

मुख्य आरोपी अजय मारीमुत्तु पेरिस्वामी ऊर्फ चेंबूर अण्णाविरोधात २२ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात खंडणी व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
16:51 (IST) 5 Aug 2025

कल्याण डोंबिवली पालिका शाळांमधील अडीच हजार विद्यार्थी गणवेश, रेनकोटच्या प्रतीक्षेत

कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारित ६१ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण सुमारे साडे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. …वाचा सविस्तर
16:34 (IST) 5 Aug 2025

धारावी पुनर्विकास प्रकल्प…डीआरपीकडेच प्रकल्पाचा आराखडा नाही; आराखड्यात सुधारणा करणे शिल्लक

डीआरपीकडे आराखड्याची प्रत प्राप्त झाली नसल्याचे सांगतानाच २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी आराखड्यात सुधारणा करण्यास कळविले होते. त्यानुसार अद्ययावत आराखडा अद्याप प्राप्त झालेला नाही, असेही सांगण्यात आले. …सविस्तर बातमी
16:20 (IST) 5 Aug 2025

Ganeshotsav 2025 : यंदा पारसिक खाडीत ठराविक उंचीच्या मुर्तींचे होणार विसर्जन…

ठाणे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत कारण सांगितले. …अधिक वाचा
15:43 (IST) 5 Aug 2025

लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या ६० वर्षांच्या काकाला अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. …सविस्तर वाचा
15:23 (IST) 5 Aug 2025

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशाच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न; रिक्षा चालकांकडून गटाने प्रवाशाला दमदाटी

या घडल्या प्रकाराबाबत प्रवाशाने कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांच्याकडे तक्रार केली आहे. …अधिक वाचा
15:21 (IST) 5 Aug 2025

जामनेरमध्ये शरद पवार गटाची खेळी… मराठा समाजानंतर आता बंजारा समाजाला संधी

जिल्ह्यासह तालुकास्तरावरील प्रमुख पदांवर मराठा आणि बंजारा समाजाला मुद्दाम झुकते माप देण्याची खेळी शरद पवार गटाने खेळली आहे. ज्यामुळे मंत्री महाजन यांच्यासह त्यांचे समर्थक चांगलेच कोड्यात पडले आहेत. …सविस्तर वाचा
15:13 (IST) 5 Aug 2025

मला मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे -किसन कथोरे; कल्याण जिल्हा होणारच, फडणविसांनी शब्द दिल्याचा पुनरूच्चार

किसन कथोरे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी आले होते. कल्याण जिल्हा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असेही कथोरे यावेळी म्हणाले. …अधिक वाचा
15:06 (IST) 5 Aug 2025

शेतकऱ्यांचा ‘वाशीम शेती शिल्प’ ब्रँड, मुख्यमंत्री म्हणाले, ‘स्थानिक उत्पादनांना…’

वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मेहनतीने गुणवत्तापूर्ण उत्पादनाचे प्रतीक ठरलेल्या ‘वाशीम शेती शिल्प’ या स्थानिक कृषी ब्रँड तयार केला. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. …सविस्तर बातमी
14:58 (IST) 5 Aug 2025

पावसाचे पाणी रोखण्यासाठी केईएम रुग्णालयाचे कर्मचारी सज्ज

पाणी तुंबण्याच्या घटना रोखण्यासाठी जूनमध्ये १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यके पाळीमध्ये पाच कर्मचारी तैनात असणार असून, हे कर्मचारी तिन्ही पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. …सविस्तर बातमी
14:52 (IST) 5 Aug 2025

एक मिनिट ३८ सेकंदात रेल्वेगाडीची प्रतीक्षा यादी १,१०० पार…कोकणातील नियमित, विशेष रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादीची क्षमता पूर्ण

गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १८ जुलै रोजी २५० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची घोषणा केली. …अधिक वाचा
14:42 (IST) 5 Aug 2025

शिवसेनेच्या (ठाकरे) शाखेने स्वखर्चाने केले रस्त्याचे कॉंक्रीटीकरण; निधी मिळत नसल्यामुळे शिवडीतील शिवसेना शाखेचा पुढाकार

शिवडी पूर्व येथील इंदिरा नगरस परिसरातील या अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण शिवसेना (ठाकरे) शाखा क्रमांक २०६ च्या वतीने करण्यात आले आहे. …अधिक वाचा
14:39 (IST) 5 Aug 2025

रस्त्यावर अडचण, एका फोनवर सुटणार समस्या; उल्हासनगर वाहतूक पोलिसांची नवी हेल्पलाइन सेवा सुरू

कोणत्याही प्रकरच्या वाहतूकीच्या अडचणींवर मात करण्यासाठी आता उल्हासनगर वाहतूक विभागाने वाहतूक हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. …वाचा सविस्तर
14:28 (IST) 5 Aug 2025

समृध्दी महामार्गाच्या भिवंडी वडपे ते कसारा मार्गावर एक किमी अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे; सुसाट वाहन चालकांना लगाम लावण्याचा प्रयत्न

सीसीटीव्ही कॅमेरे महामार्गावर लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वेगाची मर्यादा ओलांडून वाहने चालविणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना या माध्यमातून लगाम घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्याने सांगितले. …अधिक वाचा
13:47 (IST) 5 Aug 2025

सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘महापूर’ पुन्हा रंगभूमीवर, नाटकातील अस्सलपणा जपण्याचा युवा कलाकारांचा प्रयत्न

पुण्यात झालेल्या यशस्वी प्रयोगांनंतर ‘महापूर’ नाटकाचा भव्य प्रीमियर मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. …सविस्तर वाचा
13:06 (IST) 5 Aug 2025

सीबीआय आणि सीआयडीच्या तपासात विसंगती; माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून दिलासा

सीबीआय आणि सीआयडी यांचे निष्कर्ष वेगवेगळे असल्यामुळे प्रकरणात आणखी गोंधळ निर्माण झाला असून, तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. …सविस्तर वाचा
12:30 (IST) 5 Aug 2025

कावड यात्रेसाठी गेलेल्या दोन तरुणांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू

श्रावणी सोमवार निमित्ताने नालासोपारा ते तुंगारेश्वर येथील महादेव मंदिर अशी कावड यात्रा काढण्यात आली होती. यात नालासोपारा येथील सात ते आठ तरुणांचा गट ही सामील झाला होता. …सविस्तर बातमी
12:23 (IST) 5 Aug 2025

गायमुख, मुंबई अहमदाबाद मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासाचा वेळ दुप्पट

गेल्या काही आठवड्यांपासून गायमुख घाट आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. रस्त्यावरील खड्डे प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे. …अधिक वाचा
12:21 (IST) 5 Aug 2025

सेंद्रिय खतांनी फुलवली शेती ! जीवामृत आणि बीजामृतांचा प्रयोग करून पिकविली फळबाग, कल्याणमधील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

कल्याण तालुक्यातील कोसले गावातील शेतकरी श्रीराम पालवी यांनी पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करून आपली शेती फुलवली आहे. तर …अधिक वाचा
12:16 (IST) 5 Aug 2025

डोंबिवलीच्या प्रवेशव्दारावर भूमिगत वीज वाहिनीवर मातीचा उंचवटा केल्याने वाहतुकीला अडथळा

ठेकेदाराने भूमिगत वाहिनीवर मातीचा भराव टाकून रस्ता सुस्थितीत न करता ओबडधोबड केला आहे.उंचवट्या रस्त्यामुळे या भागातून वाहने संथगतीने धावत असल्याने डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. …वाचा सविस्तर
12:07 (IST) 5 Aug 2025

ठाण्यातील १५ लाखांचे घर थेट ३३ लाख ८० हजारात; २० टक्के योजनेतील विकासकांकडून विजेत्यांची आर्थिक फसवणूक सुरूच

म्हाडाच्या विविध मंडळाच्या सोडतीतील २० टक्के योजनेतील घरांसाठी मंडळाकडून जी किंमत आकारली जाते, त्या किंमतीपेक्षा भरमसाठ किंमत विकासकांकडून आकारली जात आहे. …सविस्तर वाचा

मुंबई पुणे नागपूर न्यूज