Pune Breaking News Updates, 07 August 2025 : राखी पौर्णिमाचा सण तोंडावर आलाय. मुख्यमंत्र्यांच्याच शहरातल्या लाडक्या बहिणी सुरक्षीत नसल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी समोर आला. नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या. तर दुसरीकडे भिवंडी येथे मेट्रो मार्गिका निर्माण कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्याने एका प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी सळई शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता ठाणे शहरातील धोकादायकरित्या मेट्रो मार्गिकेच्या सुरु असलेल्या कामांचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. तसंच भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार कुख्यात गुंड अबू सालेम याने २५ वर्षे प्रत्यक्ष तुरुंगवास भोगणे अपेक्षित आहे, परंतु शिक्षेतील माफीचा अथवा सवलतीचा कालावधी समाविष्ट केल्यास सालेमला ६० वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्यानंतरच त्याची सुटका करण्यात येईल, असा दावा सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात केला.
तेव्हा मुंबई शहर, उपनगर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल.
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi
‘महादेवी’साठी हत्तीच्या प्रतिकृतीसह दुचाकी रॅली; विविध सामाजिक संघटना, नागरिक, युवकांचा सहभाग
भारतात दोन लाखांहून अधिक रुग्ण मूत्रपिंडप्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत! अवयवदानाचे प्रमाण भारतात अत्यल्प…
पुणे : “आम्ही देखील अरेरावीच्या भाषेने उत्तर देऊ”, मनसेच्या आंदोलनानंतर उपायुक्त माधव जगताप यांचा इशारा
भजीसोबत उशिराने आला कांदा, हॉटेलमध्ये झाला राडा; उल्हासनगरातील प्रकार, दोघांवर गुन्हा दाखल
एकाच पदावर दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा ‘बेस्ट’ गोंधळ, फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष उघड
स्वच्छता कामगारांना वाढीव वेतन, घरे द्यावीत; महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर
बँकॉकहून आलेला १४.५ कोटींची हायड्रोपोनिक गांजा जप्त; तस्करी करणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावर अटक
ज्योतिर्लिंग विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सचिवांची नियुक्ती
महादेवी हत्तीवरून कोल्हापुरात नेत्यांचीच धावपळ
Video : दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही म्हणून डोक्यात घातल्या विटा; जखमी अत्यवस्थ
सातारा : खंबाटकी बोगद्याजवळ ट्रक उलटला
पालिकेचे विद्यार्थी स्वातंत्र्यदिनाला जुन्या शालेय गणवेशातच; शैक्षणिक वस्तू, साहित्यांचे पैसे थेट लाभार्थी खात्यात वर्ग करण्याचे पत्र २५ जुलैला
पालिकेचे विद्यार्थी स्वातंत्र्यदिनाला जुन्या शालेय गणवेशातच; शैक्षणिक वस्तू, साहित्यांचे पैसे थेट लाभार्थी खात्यात वर्ग करण्याचे पत्र २५ जुलैला
पीजीपी वसाहतींचा पुनर्विकास शिर्के समुहाकडे; आर्थिक निविदेत शिर्के समुहाची बाजी
उत्तराखंड दुर्घटना… मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावातील १३ तरुणांशी अखेर…
बोरीवलीत दोन गटांत झालेल्या हाणामारीत ४ जण जखमी
मालमत्तेतील हिस्स्यासाठी उसवलेली भावा-बहिणींच्या नात्यांची वीण पुन्हा जुळू लागली, न्यायालयातील दावे मागे घेण्यासाठी अनेकांचा पुढाकार
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सागर नाठे यूपीएससी उत्तीर्ण, पोहोचला देशसेवेच्या शिखरावर…
खराडी पार्टी प्रकरण : डॉ. प्रांजल खेवलकरांचा जामिनासाठी अर्ज
येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या डाॅ. खेवलकर यांनी त्यांचे वकील पुष्कर दुर्गे आणि ऋषीकेश गानू यांच्यामार्फत सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
टीसीआयएल कंपनीद्वारे राज्यातील बस स्थानकांवर एकाच ठिकाणावरून नियंत्रण… एआय आधारित कॅमेऱ्यांची यंत्रणा
एसटी महामंडळाच्या विभागीय सुरक्षा तथा दक्षता समितीने प्रत्येक एसटी स्थानकावर पाहणी करून सीसीटीव्हीची ठिकाणे आणि संख्या निश्चित करून तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन द्या; कबीर कला मंचच्या रमेश गायचोर यांची उच्च न्यायालयात मागणी
आठवड्याची मुलाखत : संस्कृत अध्यापनाची वेगळी दिशा
काँग्रेसमध्ये ज्येष्ठांविरोधात दुसऱ्या फळीतील नेत्यांचा शड्डू, गटबाजी प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात; समन्वयक सुनील केदार यांनी…
सांगलीत ३५ हजार मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटिसा, मालमत्ता कराची ९४ कोटींची थकबाकी
मुंबई – गोवा महामार्ग, पनवेल ते इंदापूर प्रवास डिसेंबरपासून अतिजलद
मालवणमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी तीन नारळ लढवण्याच्या स्पर्धा; बक्षिसांची खैरात
सुस्थितीतले रस्तेही केबलसाठी खोदले; खड्डे न बुजवता नवीन खड्डे तयार करत असल्याचा नागरिकांचा आरोप
पालघर : आधीच खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यामुळे त्रस्त असलेल्या पालघरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सध्या शहरात सुरू आहे. शहरातील मुख्य वाहतुकीचा सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता केबल टाकण्यासाठी बेदरकारपणे खोदला जात आहेत.
मिरा भाईंदर कबुतरखाने होणार बंद? महापालिकेकडून हालचाली सुरू
भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
एक हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला तीन वर्ष सक्तमजुरी, न्यायालयाकडून १५ हजारांचा दंड
पुणे : जुगार खेळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला विशेष न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज ७ ऑगस्ट २०२५