Nagpur News Live Updates, 23 July 2025: मुंबई शहर आणि उपनगरात येत्या काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

जगातील नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने गेल्या आठवड्यात भारतातील त्यांचे पहिले शो रुम मुंबईत सुरू केले. मात्र, शो रुमवरील देवनागरी लिपीतील टेस्ला हे नाव हिंदीत आहे की मराठीत, यावरून हिंदी – मराठी भाषिकांमध्ये वाद सुरू आहे. संबंधित नाव हिंदीत असल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर केल्या जात असून त्यावर मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या घडामोडींसह मुंबई,  मुंबई महानगर, नागपूर आणि पुणे शहर परिसरातील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates in Marathi

10:42 (IST) 24 Jul 2025

नवी मुंबईत ‘क्लस्टर’ला गती, वाशीतील दोन प्रकल्पांसाठी महापालिकेचा हिरवा कंदील

नवी मुंबई महापालिका हद्दीत पहिल्या ‘क्लस्टर’ प्रकल्पांना परवानगी देण्याची प्रक्रिया महापालिका स्तरावर सुरू झाली आहे. …वाचा सविस्तर
20:48 (IST) 23 Jul 2025

विधानसभेतील हिंदी आमदारांची भाषणे ‘नोंदीविना’; लघुलेखकाची पदे रिक्त असल्याचा आमदारांना फटका

विधानसभेतील २८८ आमदारांपैकी अबु आझमी, रईस शेख, अमीन पटेल, तमील सेल्वन, साजिद पठाण, सना मलिक, मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे सात आमदार सभागृहात हिंदी भाषेचा वापर करतात. …सविस्तर वाचा
20:29 (IST) 23 Jul 2025

राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे

राज्यातील प्रत्येक नागरिकाला २०३५ पूर्वी शास्वत, सुरक्षित व पर्यावरण स्नेही निवास मिळावा यासाठी या उद्देशाने नव्या गृहनिर्माण धोरणाची आखणी करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
20:21 (IST) 23 Jul 2025

राज्यात सहा महिन्यांत ६० जेष्ठ नागरिकांची हत्या

आर्थिक लाभ, मालमत्ता हडप करणे, कौटुंबिक वाद, मानसिक ताण, गैरसमज आणि सामाजिक असुरक्षितता या सारख्या कारणांमुळे राज्यात जेष्ठ नागरिकांच्या हत्येचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. …वाचा सविस्तर
19:39 (IST) 23 Jul 2025

गडकरींच्या पत्नी म्हणाल्या, १३ ‘डी.लिट’ मिळाल्या पण, लोकमान्य टिळक पुरस्कारामुळे नितीनजी आता मोदींच्या रांगेत…

पुरस्काराची घोषणा झाल्यावर गडकरी यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी एक वृत्तवाहिणीशी बोलताना या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. …सविस्तर वाचा
18:41 (IST) 23 Jul 2025

रात्री बँकेत शिरला दोन फूट लांबीचा विषारी नाग; सकाळी कर्मचारी येताच…

नियमित प्रमाणे सकाळी बँकेतील कर्मचारी हरीश सोलंकी यांनी बँक उघडताच कॅबिन मध्ये त्यांना साप दिसला. हे बघुन कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. …सविस्तर वाचा
18:41 (IST) 23 Jul 2025

रात्री बँकेत शिरला दोन फूट लांबीचा विषारी नाग; सकाळी कर्मचारी येताच…

नियमित प्रमाणे सकाळी बँकेतील कर्मचारी हरीश सोलंकी यांनी बँक उघडताच कॅबिन मध्ये त्यांना साप दिसला. हे बघुन कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. …सविस्तर वाचा
18:25 (IST) 23 Jul 2025

Video : वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ; पुराच्या पाण्यात अख्खा ट्रकच वाहून गेला…

एचपी कंपनीचे सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पिंप्री सरहद येथे घडला. …वाचा सविस्तर
18:17 (IST) 23 Jul 2025

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीसाठी स्वतंत्र कंपनी

देशप्रेमाची जागृती वाढवावी. भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन व्हावा. या उद्देशाने क्रांतिवीर चापेकर बंधू संग्रहालयाची निर्मिती चापेकर वाडा येथे केली आहे. …अधिक वाचा
18:08 (IST) 23 Jul 2025

‘एफआरपी’ची मोडतोड कराल तर याद राखा…कोणी दिला इशारा?

‘एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा. शेतक-यांशी गाठ आहे,’ अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना बुधवारी सज्जड इशारा दिला. …वाचा सविस्तर
17:53 (IST) 23 Jul 2025

ताहुलीच्या डोंगरावर चार पर्यटक भरकटले, पोलिसांच्या सतर्कतेने सर्वांना शोधण्यात यश, चौघे सुखरूप

ताहुलीच्या डोंगरावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चौघा जणांना जंगलाचा फेरा पडला आणि ते सर्व त्यात भरकटले.पाच तास सलग राबवलेल्या शोध मोहिमेनंतर या चौघांना शोधण्यात पोलिसांना …सविस्तर वाचा
17:32 (IST) 23 Jul 2025

धनकवडीत टोळक्याची दहशत; १८ वाहनांची तोडफोड, टोळक्याला रोखणाऱ्या दोघांना मारहाण

शहर परिसरात आठवडाभरात वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. …वाचा सविस्तर
17:11 (IST) 23 Jul 2025

हलक्यात घेऊ नका… जळगावमध्ये शिंदे गटाचा भाजपला इशारा

महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग दिल्यानंतर सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा मनोदय भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी नुकताच व्यक्त केला. …अधिक वाचा
17:08 (IST) 23 Jul 2025

भरधाव ट्रकचा अचानक टायर फुटला अन् खासगी बसवर वेगाने आदळला; भीषण अपघातात दोन ठार, २० प्रवासी जखमी…

टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन खासगी बसवर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर ते नागपूर द्रुतगती महामार्गावर पेडगाव गावाजवळ बुधवारी घडली. …वाचा सविस्तर
17:08 (IST) 23 Jul 2025

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात दिवसा ढवळ्या तलवारीने दोघांवर हल्ला, हल्लेखोर शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याची चर्चा

आकाश भालेराव (३०) आणि सुरज हजारे (३०) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. पार्किंगच्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे. …सविस्तर वाचा
17:01 (IST) 23 Jul 2025

अंगणवाडी सेविका, बालवाटिका शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती… अध्यापन आता अधिक सुलभ होणार!

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) मैत्री बालमनाशी ही हस्तपुस्तिका दोन भागात तयार केली आहे. …अधिक वाचा
16:41 (IST) 23 Jul 2025

नागपुरात पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या नावावर ३ हजार रुपयांची वसूली; भाजपचा नेता म्हणतो…

हा गंभीर प्रकार असून त्यांनाही नागरिकांचे २ ते ३ हजार रुपये घेण्याचे आधिकार दिले कुणी? हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. …सविस्तर वाचा
16:28 (IST) 23 Jul 2025

पंतप्रधान मोदींनंतर आता नितीन गडकरी ठरले या पुरस्काराचे मानकरी; योगायोग की मोदींच्या निवृत्तीनंतर गडकरी…

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. …वाचा सविस्तर
15:32 (IST) 23 Jul 2025

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय

कोट्यवधींची संपत्ती व महागडी वाहने असताना ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र त्यांनी मिळवल्याचा आक्षेप होता. …अधिक वाचा
15:24 (IST) 23 Jul 2025

आखाडी अमावस्या जोरात… अडीचशे किलो चिकनचे मोफत वाटप… आधार कार्ड ची सक्ती!

नेरुळ येथील सेक्टर २, ४ आणि २१, २२, २३, २४, २५ जुई पाडा गाव, जुईनगर या नागरिकांसाठी हा कार्यक्रम होता. सकाळी ९ ते दुपारी १२ या तीन तासांसाठी हा उपक्रम होता. …सविस्तर बातमी
15:22 (IST) 23 Jul 2025

सूफी संतांच्या पवित्रस्थळी गडकरींचा भावनिक क्षण… काय घडलं तिथं?

सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचा १०३ वा वार्षिक उरूस ताजाबाद शरीफ येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. …वाचा सविस्तर
15:09 (IST) 23 Jul 2025

डोंबिवलीत एमआयडीसीत कपड्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला भीषण आग

सुरूवातीला आगीचे स्वरुप सौम्य होते, पण कपडा असलेल्या भागात आग पसरताच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच कंंपनीतील कर्मचारी, कामगार काही क्षणात कंपनीतून सुरक्षितपणे बाहेर पडले. …सविस्तर वाचा
14:23 (IST) 23 Jul 2025

जळगावमध्ये चांदी एक लाख २० हजाराच्या उंबरठ्यावर…

जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत पोहोचले होते. …सविस्तर बातमी
13:49 (IST) 23 Jul 2025

‘वडाळा – गेट वे भुयारी मेट्रो ११’साठी २,२०० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड, तर ७९६ बांधकामांवर हातोडा

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘वडाळा – गेट वे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो ११’ मार्गिकेचे संरेखन आणि पर्यावरणीय, सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध केला आहे. …सविस्तर बातमी
13:33 (IST) 23 Jul 2025

ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार! येत्या २४ तासात…

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये २२ ते २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. …सविस्तर बातमी
13:17 (IST) 23 Jul 2025

ठाणे रेल्वे स्थानक आधुनिकीकरणाचा अद्याप निर्णय नाही.., ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा ९४९ कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे तो कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे. खासदार नरेश म्हस्के …सविस्तर बातमी
13:03 (IST) 23 Jul 2025

‘नॅशनल सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मिशन’ अंतर्गत ६ कोटी नागरिकांची सिकलसेल तपासणी! ‘सिकल सेल ॲनिमिया’ निर्मूलनाच्या दिशेने मोठी वाटचाल…

भारताने ‘नॅशनल सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मिशन’ अंतर्गत एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठला असून ६ कोटींहून अधिक नागरिकांची सिकल सेल ॲनिमियासाठी तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. …वाचा सविस्तर
13:02 (IST) 23 Jul 2025

इंस्टाग्रामवर आधी मैत्री, नंतर घडले असे…नागपुरातील अल्पवयीन तरुणीवर यवतमाळात सामूहिक अत्याचार

या प्रकरणात नागपुरातील दोन तर यवतमाळातील तीन अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. …वाचा सविस्तर
12:55 (IST) 23 Jul 2025

आम्हाला पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान हवे आहे; कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात येणाऱ्या मूर्तींची उंची आठफुटांपर्यंत वाढवणे शक्य ?

उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश …सविस्तर बातमी
12:53 (IST) 23 Jul 2025

२५६ कोटींच्या ड्रग्स निर्मितीत छोटा शकीलच्या भावाचे फंडींग?; ड्रग्स निर्मितीत दाऊद टोळीच्या सहभाग उघड

पाकिस्तानात लपून बसलेला छोटा शकीलचा भाऊ अन्वर बाबू मुंबईत ड्रग्स निर्मितीत मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा (फंडिंग) करीत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. …सविस्तर बातमी

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २३ जुलै २०२५