Mumbai Live News Updates, 29 July 2025 : सक्तवसुली संचलालयाने (ईडी) वसई – विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी तेथील महापालिकेतील सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांच्या निवास्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात मुंबई, नाशिक, वसई-विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे. बहुसंख्य छापे या अधिकाऱ्याच्या संबंधित ठिकाणांवर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान , राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळ्यात स्थापन विशेष तपास पथक पाळेमुळे खणत आहे. पथकाने आतापर्यंत घोटाळ्यात सहभागी २४ अधिकारी, मुख्याध्यापकांना अटक करीत प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. तर, विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर महाविद्यालये, विद्यापीठांनी त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. राज्य शासन, विद्यापीठाने निश्चित केलेल्या शुल्काप्रमाणे महाविद्यालयांनी अभ्यासक्रम शुल्काबाबत माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच, शुल्क निश्चितीबाबतची कागदपत्रे महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच राज्यात गेल्या आठवड्यात सक्रीय झालेल्या पावसाने रविवारपर्यंत जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी सकाळपासून सर्वत्र पावसाचा जोर ओसरला. दरम्यान, राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल.
Pune Mumbai Nagpur Latest News Updates in Marathi : मुंबई-महानगर, पुणे- नागपूरच्या ताज्या घडामोडी…
शाळा शिकस्त, विद्यार्थ्यांना वर्ग नाहीत, प्रशासनाकडून पत्रांना केराची टोपली
१८८ पैकी केवळ ९ सौर प्रकल्प पूर्ण; शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे आव्हान
मुंबईकरांची तहान भागणार… कोणत्या धरणात किती पाणी, वाचा…
अमृता फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाला जलाभिषेक, ५५ नद्यांचे पवित्र जल आणि…
पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर… बारावीच्या निकालात वाढ, दहावीच्या निकालात घट!
रणरागिणी ! महिलेची एकाकी झुंज, जखमी पण चोरांना पिटाळले.
देहूरोडचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याबाबत संरक्षणमंत्र्यांना साकडे; महापालिकेचे म्हणणे काय?
पिंपरी : देहूरोड कटक मंडळ आर्थिक संकटांचा सामना करत असून केंद्र सरकारकडूनही अपेक्षित आर्थिक साहाय्य मिळत नाही. त्यामुळे पुणे आणि खडकी कटक मंडळाचा पुणे महापालिकेत समावेश केल्याप्रमाणे देहूरोड कटक मंडळाचाही पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली.
तरच मिळणार शिष्यवृत्तीचा लाभ… महाविद्यालये, विद्यापीठांना उच्च शिक्षण संचालकांचे निर्देश काय?
पुणे : विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर महाविद्यालये, विद्यापीठांनी त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत.
काल निरोप समारंभ आणि आज ईडीचे छापे
…तरच २२ टीएमसी पाणी देऊ, पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे वक्तव्य !
पुणे : ‘पुणे महापालिकेला १४ टीएमसी (दशलक्ष घनफूट) पाण्याचा कोटा मंजूर असतानाही महापालिका २२ टीएमसी पाणी उचलत असल्याचा दावा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना ‘नाफा’ जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकेतील सॅनहोजे येथे सन्मान
बारामती पोलिसांची अवजड वाहनांवर कारवाई; १४ वाहने जप्त
बारामती: बारामती शहर व परिसरात प्रमाणापेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि वाहनांवर कारवाई करून १४ वाहने जप्त करण्यात आले आहेत. या वाहनमालकांवर खटले दाखल करून ते बारामतीतील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद, वेगवेगळ्या घटनेत १९ लाखांचा ऐवज लांबविला
पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. विश्रांतवाडी, वारजे माळवाडी भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १९ लाख रुपयांचा ऐवज लांबविला, तसेच कात्रज भागातील एका टायर विक्री दुकानातून चोरट्यांनी ५८ हजार रुपयाचे टायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे महापालिका आयुक्तांनी कोणाकडे मागितले ३०० कोटी रुपये?
जिल्हा बँक निवडणुकीची रणनीती ‘स्थानिक’मध्ये वापरण्याचा डाव
व्हिडिओ : प्रेरणादायी! जिद्द, चिकाटी व समर्पणाचे उत्तम उदाहरण – कर्करोगाशी लढा, ७९ टक्के दिव्यांगत्व तरी २७ वर्षांत २० हजारांवर सापांना..
घोडबंदरच्या वाघबीळ उड्डाणपूलावर भला मोठा खड्डा, सळया देखील बाहेर आल्या
राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या खासदारावर केली टीका म्हणाले, बच्चा नया है…
Jitendra Awhad : ” हा इतरांसारखा गद्दार नाही, कारण,…” जितेंद्र आव्हाडांची शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा नेत्यावर स्तुतीसुमने
अखेर स्वच्छता कामगारांच्या लढ्याला यश… महानगरपालिका प्रशासन आणि स्वच्छता कामगारांमध्ये करार; १ ऑगस्टला विजयी मेळावा
राज्यातील रक्तपेढ्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन… केंद्र सरकारकडून जुलै – ऑगस्टदरम्यान तपासणी
शालार्थ ओळखपत्र घोटाळा ; नागपूर एसआयटीकडून आता राज्यभरात तपास, पथकाची अधिकार कक्षा वाढवली, पोलीस उपायुक्त झा यांची नियुक्ती
नागपूर. राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळ्यात स्थापन विशेष तपास पथक पाळेमुळे खणत आहे. पथकाने आतापर्यंत घोटाळ्यात सहभागी २४ अधिकारी, मुख्याध्यापकांना अटक करीत प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. मात्र घोटाळ्याची राज्यभरातील व्याप्ती पाहता तपास पथकाची अधिकार कक्षा वाढवण्यास पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी हिरवा कंदिल दाखवला.
तरच मिळणार शिष्यवृत्तीचा लाभ… महाविद्यालये, विद्यापीठांना उच्च शिक्षण संचालकांचे निर्देश काय?
पुणे : विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर महाविद्यालये, विद्यापीठांनी त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. राज्य शासन, विद्यापीठाने निश्चित केलेल्या शुल्काप्रमाणे महाविद्यालयांनी अभ्यासक्रम शुल्काबाबत माहिती भरणे आवश्यक आहे.
वसई-विरार महापालिकेच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याच्या निवास्थानासह ईडीचे १२ ठिकाणी छापे
मुंबई : सक्तवसुली संचलालयाने (ईडी) वसई – विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी तेथील महापालिकेतील सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांच्या निवास्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात मुंबई, नाशिक, वसई-विरार येथील ठिकाणांचा समावेश आहे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज २९ जुलै २०२५