Mumbai Breaking News Today 11 July 2025 : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्याची मोठी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. ऐन अधिवेशनाच्या गडबडीत उपमुख्यमंत्र्यांनी अचानक दिल्ली गाठल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे महायुतीमधील अंतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याचा दावा केला आहे.

या बरोबरच राज्यभर विविध ठिकाणी मुसळधार पावसानेही हजेरी लावल्याचे दिसत आहे. दरम्यान, मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यातील राजकीय व इतर महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Latest News Updates in Marathi

14:29 (IST) 11 Jul 2025

भाईंदरमध्ये विद्युत वाहनांच्या शोरूमला आग, १६ दुचाकी जळून खाक

भाईंदर पूर्व येथील कॅबिन रोड परिसरात एका दुचाकी विद्युत वाहनांच्या शोरूममध्ये गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली. …सविस्तर बातमी
14:29 (IST) 11 Jul 2025

पनवेल : खारघर पुलावर अपघात, तरुण ठार

खारघर येथील हिरानंदाणी कॉम्प्लेक्स इमारतीसमोरील उड्डाणपुलावर हा गंभीर अपघात घडला. …वाचा सविस्तर
14:12 (IST) 11 Jul 2025

डोंबिवलीत शिंदे गट, काँग्रेसमधील दोनशे कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाने शहराच्या विविध भागात कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करण्यासाठी हे पक्ष प्रवेश करून घेतले आहेत. …सविस्तर बातमी
14:08 (IST) 11 Jul 2025

औरंगजेबाच्या कबरीवरून विश्व हिंदू परिषदेची भूमिका बदलली; आता म्हणाले, “त्याचे राजकारण करू नका…”

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील मंदिरांच्या जमिनीवर कथित अतिक्रमण केल्याचा मुद्दा विहिंपने उपस्थित केला आहे. …अधिक वाचा
13:56 (IST) 11 Jul 2025

अमेरिकेतील स्पर्धेत मुंबई अग्निशमन दलाची उल्लेखनीय कामगिरी…

बर्मिंगहॅम येथे २८ जून ते ६ जुलैदरम्यान ही स्पर्धा पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ७० हून अधिक देशांतील ५ हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. …वाचा सविस्तर
13:56 (IST) 11 Jul 2025

कडोंमपा आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावरून डॉ. दीपा शुक्ला यांच्या निलंबनाची मनसेची मागणी

शहरात डेंग्युने बळी जात असताना प्रशासन थंड बसले असल्याने मनसेच्या कल्याणमधील कार्यकर्त्यांनी गुरूवारी पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. …वाचा सविस्तर
13:37 (IST) 11 Jul 2025

नऊ हजार घरे… इच्छुक मात्र केवळ ५३…माहूलमधील घरांसाठी अत्यल्प प्रतिसाद

मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरात माहूल येथे प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधली आहेत. यापैकी काही घरांमध्ये प्रकल्पबाधित राहतात. मत्र बहुतांश घरे ही रिकामी आहेत. …सविस्तर बातमी
13:36 (IST) 11 Jul 2025

नागपूरला पुराचा फटका, भाजपला मतांचा धक्का?

दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे शहरातील पन्नासाहून अधिक वस्त्या पाण्यात बुडाल्या. प्रमुख रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. …वाचा सविस्तर
13:21 (IST) 11 Jul 2025

गिरणी कामगारांना मुंबईत घरे, सरकार सकारात्मक

गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. …सविस्तर बातमी
13:12 (IST) 11 Jul 2025

बदलापूर नगरपालिका हद्दीत सांडपाण्याची सुविधा नसणे धक्कादायक…उच्च न्यायालयाचे ताशेरे

कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात गटार व्यवस्था आणि सांडपाणी सुविधांच्या अभावाबद्दल नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. …अधिक वाचा
12:54 (IST) 11 Jul 2025

२५६ कोटींच्या ड्रग्स निर्मिती प्रकरणी फरार आरोपीचे युएईमधून प्रत्यार्पण

सीबीआयच्या इंटरनॅशनल पोलीस कोऑपरेशन विभागाने अबूधाबी येथील नॅशनल सेंट्रल ब्युरोच्या मदतीने ही कारवाई केली. कुब्बावाला मुस्तफा याला शुक्रवारी दुबईहून विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. …सविस्तर बातमी
12:38 (IST) 11 Jul 2025

गुजरातमध्ये ४० वर्षे जुना तर महाराष्ट्रात उद्घाटनापूर्वी उड्डाणपूल खचला

विकासाच्या नावाखाली नागपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. मात्र बांधकामाचा दर्जा खालावला आहे. …सविस्तर बातमी
12:27 (IST) 11 Jul 2025

गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचा रोवणी महोत्सव, पावसाने समाधान

गोंदिया जिल्ह्यात धान पीक हेच प्रमुख पीक आहे. धान या पिकावरच जिल्ह्याची अर्थव्यवस्था आणि वार्षिक गणिते अवलंबून आहेत. …सविस्तर वाचा
12:23 (IST) 11 Jul 2025

विमान रद्द… सायबर भामट्याने साधली संधी…परतावा देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

या महिलेने गुगलवरून विमान कंपनीचा ग्राहक सेवा क्रमांक मिळवला होता. मात्र बनावट क्रमांकावरील सायबर भामट्याने त्यांना ‘एपीके’ फाईल डाऊनलोड करायला सांगून त्यांच्या बॅंकेतील रक्कम लंपास केली. …सविस्तर वाचा
12:23 (IST) 11 Jul 2025

शिष्यवृत्ती परीक्षा… महापालिका शाळांतील ९५४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

दरवर्षी या परीक्षेत महानगरपालिकेचे हजारो विद्यार्थी सहभागी होतात. ही परीक्षा यंदा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात आली होती. …सविस्तर बातमी
12:23 (IST) 11 Jul 2025

भर रस्त्यात तरूणीचा विनयभंग…अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध सुरू

या घटनेमुळे घाबरलेली तरुणी घरी परत गेली. तिने पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. …सविस्तर बातमी
12:23 (IST) 11 Jul 2025

विकासकांच्या मालमत्तेवर टाच…झोपु योजनेतील रहिवाशांचे ६४६ कोटी रुपये घरभाडे थकीत…

घरभाडे वसुलीसाठी झोपु प्राधिकरणाकडून अभय योजनाही राबविण्यात आली. मात्र त्यानंतरही अनेक विकासकांनी घरभाडे थकविले आहे. …वाचा सविस्तर
12:22 (IST) 11 Jul 2025

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवर लवकरच दोन मेट्रो गाड्या वाढणार? एमएमएमओसीएलने…

दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकांवरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने नुकताच तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. …सविस्तर बातमी
12:22 (IST) 11 Jul 2025

बेस्ट बसचा भीषण अपघात चालक, वाहकासह आठ जण जखमी

बेस्ट उपक्रमातील वडाळा आगारातील मातेश्वरी कंपनीची भाडेतत्त्वावरील बस दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. …सविस्तर बातमी
12:22 (IST) 11 Jul 2025

धक्कादायक हॉटेलमधील सूपमध्ये झुरळ सापडले; हॉटेल मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध गु्न्हा

याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २७५ अन्वये (ग्राहकांना भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
12:22 (IST) 11 Jul 2025

भर वर्गात शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग…पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून ४० वर्षीय शिक्षकाविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …अधिक वाचा
12:20 (IST) 11 Jul 2025

‘बिल गेट्स’ला चहा पाजणाऱ्या ‘डॉली चायवाला’चा मोठा निर्णय, आता ‘हे’ काम करणार

‘डॉली की टपरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या चहाच्या गाड्यावर रोज शेकडो ग्राहक येतात. …सविस्तर बातमी
12:17 (IST) 11 Jul 2025

महाराष्ट्रीयन पंतप्रधान होण्यासाठी डोंबिवलीतील निवृत्त प्राध्यापकाचा महाराष्ट्रभर जनजागृती दौरा

प्राध्यापक शिवा अय्यर असे या प्राध्यापकाचे नाव आहे. मागील दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी समाज जागृतीचे अनेक उपक्रम राबविले आहेत. …सविस्तर वाचा
12:10 (IST) 11 Jul 2025

नवी मुंबई : शहरावर १३९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ! ९० टक्के कॅमेरे कार्यरत असल्याचा पालिकेचा दावा

नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही यंत्रणेचे काम सुरू करण्यात आले होते. …सविस्तर बातमी
12:01 (IST) 11 Jul 2025

गडकरींच्या दरबारात गेला दुभाजकाचा वाद, आमदारांची मात्र चुप्पी

वर्षभरापासून आर्वीतील राजकीय मुद्दे गाजत आहे. आता त्यात महामार्गावरील दुभाजकाच्या मुद्द्याची भर पडली असून त्यालाही राजकीय किनार आहेच.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 11 Jul 2025

नागपूर: ‘स्मार्ट सिटीचा मेकअप’ उतरला… आता डबके आणि चिखलाचा पूर

रविवार पासून लागलेली संततधारेची झड आणि मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कोट्यवधींची उधळपट्टी करीत केलेल्या स्मार्ट सिटीवरचा मेकअप बुधवारी चांगलाच उतरवला.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 11 Jul 2025

शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला मुख्यमंत्र्यांचा ‘ग्रीन सिग्नल’, आंबोलीतील ३० किमी बोगदा टळणार?

आमदार केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुधारित आखणीमुळे इको-सेन्सिटिव्ह (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील) आणि बागायतीच्या भागातून जाणारा महामार्ग टाळता येणार आहे.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 11 Jul 2025

वसमतच्या दोन भाविक महिलांचा कर्नाटकातील अपघातात मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

वसमत तालुक्यातील चार ते पाच भाविक महिला गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी गाणगापूर येथे गेल्या होत्या. …वाचा सविस्तर
11:45 (IST) 11 Jul 2025

विज्ञानाच्या गोडीसाठी पनवेल पालिकेचे खारघरमध्ये ‘अंतराळ संग्रहालय’

‘अंतराळ संग्रहालया’साठी पनवेल महापालिका ४१ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. लवकरच या अंतराळ संग्रहालयाच्या उभारणीबाबत निविदा प्रक्रिया सुरू होईल. …सविस्तर बातमी
11:28 (IST) 11 Jul 2025

DCM Eknath Shinde News: महायुतीतील अंतर्गत कुरघोड्यांमुळे एकनाथ शिंदे दिल्लीत? आमदार रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले, “फक्त शिंदेंकडेच…”

Eknath Shinde Delhi Visit: एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे.

सविस्तर वाचा…

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ११ जुलै २०२५